प्राचीन भारतातील धर्म आणि त्यांची माहिती

 नमस्कार मित्र मैत्रिणिनो आज आपण या लेखामध्ये प्राचीन भारतातील धर्मांविषयी माहिती जाणून घेणार आहे. या मध्ये आपण सर्व प्रथम प्राचीन भारतातील धर्म उदयाची कारणे बघणार आहे. त्यानंतर बौद्ध धर्म, जैन धर्म, ज्यू धर्म, ख्रिचन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म या सर्वांबद्दल सविस्तर माहिती बघणार आहे. या सर्व धर्मांची शिकवण त्यांचे ग्रंथ, या धर्मांचा उदय कसा झाला हे सर्व जाणून घेणार आहे.

प्राचीन भारतातील धर्म आणि त्यांची माहिती, prachin bhartatil dharm, बौद्ध धर्म, जैन धर्म, ज्यू धर्म, ख्रिचन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म
प्राचीन भारतातील धर्म

Table of Contents

धर्म म्हणजे काय ?

  • धर्म या शब्दला कोणताही सामानार्थी शब्द नाही. धर्म म्हणजे थोडक्यात एक सारखे विचार करणाऱ्या लोकांचा गट.
  • वैदिक संस्कृती च्या अस्तानंतर सर्वसाधारण लोक एकसारखा विचार करणाऱ्या लोकांचा सोबत गट करून राहू लागले त्या नंतरच धर्म तयार होऊ लागले असावेत. असे म्हंटले जाते.
  • सोबत राहत असणाऱ्या लोकांचे राहणीमान, त्यांचा प्रथा, पोशाख या मुळे नंतर त्यांनी आपले एक वेगळे अस्तित्व तयार केले आणि त्यामुळेच नंतर विविध धर्म तयार झाले.
  • प्रत्येक गटांमध्ये कर्मकांडांचे प्रकार वेगवेगळे होते. त्यांचे धार्मिक विचार वेगळे होते त्यामुळे त्या गटांचे रूपांतरण धर्मा मध्ये झाले.

धर्म उदयाची कारणे

  • वैदिक काळाच्या शेवटी कर्मकांडे होम हवन आणि यज्ञाचे महत्व अधिक वाढले होते. पण त्याविषयीचे ज्ञान हे पुरोहित आणि ब्राम्हण यांच्या शिवाय कोणत्याही सर्वसामन्य मनुष्याकडे नव्हते. आणि ते त्यातही ते ज्ञान मिळवण्याची सर्वसामान्यांना मोकळीक राहिली नव्हती.
  • माणसाच्या कार्यक्षमतेच्या आधारे त्याचे स्थान न ठरवता त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला आहे याचा आधारे त्याचे समाजातील स्थान ठरवले जाऊ लागले होते.
  • होम हवन व कर्मकांडे पुजना पुरती मर्यादित न ठेवता समाजात त्याची व्यापकता वाढत जात होती असे आढळते.
  • उपनिषदांच्या आधाराने तयार झालेले भक्तीपंथ व वेगवेगळी पुराने ही सर्वसामान्यांना समजण्यास कठीण होऊ लागली होती.
  • ब्राम्हण धर्मात कर्मकांडांमध्ये पशु बळी दिला जाऊ लागला पण हे पशु शेतीसाठी आवश्यक होते म्हणून काही गटांनी अहिंसा तत्वे स्वीकारली.
  • ब्राम्हण धर्माने व्यापार आणि शहरीकरण यांना महत्व न देता वर्ण आणि कर्मकांड यांना जास्त महत्व देणे सुरु केले.

या सर्व कारणांमुळे इ.स.पुर्व. ६ व्या शतकात अनेक नवीन विचारप्रवाह निर्माण होऊन सर्वसाधारण माणसाला कळेल असे धर्म विचार मांडण्यात येऊ लागले. प्रत्येक मानव हा स्वतंत्र आहे. प्रत्येक मानवाला आपल्या प्रगती बद्दल विचार करण्याचा हक्क आहे. स्वताच्या प्रगती साठी जातीपातीचा भेदभाव महत्वाचा नसून चांगले आचरण महात्व्चे असते असे अनेक विचारवंतानी लोकांच्या मनावर ठसवले. आणि त्या नंतरच या विचारांनी अनेक धर्मांना सुरवात झाली. या सर्व विचारांची उभारणी करण्यासाठी वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य म्हत्वाचे आहे.

या सर्व विचारांच्या आधारावर अनेक धर्म उदयास आले त्यापैकी काही प्रमुख धर्म पुढील प्रमाणे

(१) जैन धर्म            (२) बौद्ध धर्म

(३) ज्यू धर्म             (४) ख्रिचन धर्म

(५) इस्लाम धर्म       (६) पारशी धर्म

तर चला आता आपण या सर्व धर्मांबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

(१) जैन धर्म   

  • भारतातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक धर्म म्हणजे जैन धर्म. जीन या शब्दापासून जैन शब्दाची उत्पत्ती झाली आहे जीन या शब्दाचा अर्थ सर्व इंद्रियांवर विजय मिळवणारा असा होतो.
  • जैन धर्मात  धर्मांचे ज्ञान देणाऱ्यास धर्मोपदेशक  किंवा तीर्थकर म्हणून ओळखले जाते. 
  • जैन धर्माच्या मन्यतेप्रमाणे एकूण २४ तीर्थकर होऊन गेले आहेत.
  • जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेव हे असुन शेवटचे तीर्थकर वर्धमान महावीर हे होते.

वर्धमान महावीर

  • महावीरांचा जन्म आजपासून सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी इ.स.पूर्व ५९९ ला झाला.
  • त्यांचा जन्म  बिहार राज्यात त्याकाळातील वृज्जी महाजनपदामधील  कुंडग्राम, वैशाली येथे एका क्षत्रिय कुटुंबात झाला. 
  • त्यांच्या वडिलांचे नाव राजा सिद्धार्थ आणि आईचे नाव राणी त्रिशला होते.
  • महावीरांनी वयाच्या 30 व्या वर्षी ज्ञानप्राप्ती साठी घरदाराचा त्याग केला आणि  त्यांनी पुढील  १२ वर्षे  तपश्चर्या करून त्यांनी ज्ञान प्राप्ती केली.
  • त्यांनी मिळवलेले ज्ञान हे ‘केवल’ आणि ‘विशुद्ध’ स्वरूपाचे होते म्हणून त्यांना ‘केवली’ असेही म्हंटले जाते. त्याचप्रमाणे त्यांनी ज्ञानप्राप्ती करून सर्व विकारांवर विजय मिळवला होता त्यामुळे त्यांना ‘महावीर’ ही म्हंटले जाते.
  • ज्ञानप्राप्ती पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुमारे ३० वर्ष लोकांना धर्म समजून सांगण्यासाठी उपदेश केला. ते उपदेश करण्यासाठी अर्धमागधी या लोकभाषेचा वापर करत असत.
  • त्यांनी सांगितलेला धर्म हा पूर्णपणे शुद्ध आचरणावर भर देणारा होता. त्यांनी शुद्ध आचरणासाठी केलेले उपदेशाचे सार हे पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांमध्ये सामावून आहे.

जैन धर्माची त्रिरत्ने

वर्धमान महावीरांनी दिलेल्या उपदेशात त्रिरत्ने यांचा समावेश होता ती त्रिरत्ने पुढीलप्रमाणे : (१) सम्यक दर्शन (२) सम्यक ज्ञान (३) सम्यक चरित्र 

(१) सम्यक दर्शन (चांगले / उत्तम विचार) :-

धर्मोपदेशकांनी दिलेल्या उपदेशाचे खरे पण जाणून घेऊन  त्यावर श्रद्धा ठेवणे.

(२) सम्यक ज्ञान (चांगले / उत्तम ज्ञान):-

धर्मोपदेशकंच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा रोज अभ्यास करून त्याचा पूर्ण अर्थ समजून घेणे.

(३) सम्यक चरित्र (उत्तम आचरण)

पंचमहाव्रतांचे पूर्णपणे आचरण करणे

 जैन धर्मातील पंचमहाव्रते

वर्धमान महावीरांनी जैन धर्मला दिलेल्या उपदेशात पंचमहाव्रते दिलेली आहे. पंचमहाव्रते म्हणजे जैनधर्मात काटेकोर पणे पाळण्याचे पाच नियम ते पुढीलप्रमाणे

(१) अहिंसा (२) सत्य (३) अस्तेय (४) अपरिग्रह (५) ब्रम्हचर्य

(१) अहिंसा 

कोणत्याही प्राणी पक्षी मनुष्य किंवा कोणत्याही सजीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे अजिबात वागू नये.  

(२) सत्य 

आपले बोलणे वागणे आणि प्रत्येक गोष्ट ही खरेपणाची असावी.

(३) अस्तेय 

स्तेय या शब्दाचा अर्थ चोरी असा होतो. अस्तेय म्हणजे चोरी न करणे 

(४) अपरिग्रह 

मनात लोभीपणा ठेऊन संपत्ती व मालमत्ता याचा साठा करण्याकडे माणसाचा काळ असतो. तर असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह.

(५) ब्रम्हचर्य

शरीराला सुखकारक आणि आनंद देणाऱ्या गोष्टींचा त्याग करून उपदेशात दिलेल्या व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रम्हचर्य

जैन साहित्य

  • आगम: संपूर्ण जैन साहित्याला आगम असे म्हणतात. आगम म्हणजे सिद्धांत हे प्रथम अर्धमागधी, नंतर प्राकृत, अपभ्रंश, आणि संस्कृत भाषेत लिहिले.
  • कल्पसूत्र : जैन धर्माचा विकास आणि प्रसार तसेच चंद्रगुप्ताचे जीवन व जि धर्म स्वीकार या बद्दल माहिती याचे रचनाकार भद्रबाहू  आणि याची भाषा संस्कृत 
  • भगवती सूत्र : जैन धर्माचा इतिहास तसेच १६ महाजनपदांचा उल्लेख यात आहे. 
  • पराशिष्ट वर्णन, न्यायावतार, स्यादवाद, मंजिरी, पुराण, पद्य पुराण, महा पुराण हे जैन धर्मातील इतर महत्वपूर्ण ग्रंथ आहे.

(२) बौद्ध धर्म । Buddha Dharma Information In Marathi

  • बौद्ध धर्म हा एक श्रद्धा परंपरेतून आणि एकसारख्या विचारधारणा व तत्वज्ञानातून तयार झालेला धर्म आहे.
  • बौद्ध धर्म हा एक प्राचीन धर्म आहे या धर्मास आपण बौद्ध धम्म किंवा बौद्ध धर्म या नावाने ओळखतो.
  • बौद्ध धर्माची स्थापना ही इ.स.पु. ६ व्या शतकात भगवान गौतम बुद्ध यांनी केली.
  • भगवान बुद्धांच्या महापारीनिर्वाहा नंतर पुढील दोन शतक सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. आणि नंतर पुढील २००० वर्षांमध्ये हा धर्म पूर्ण जगभर पसरला.
  • बौद्ध धर्म हा आपल्या उगमस्थानापासून बाहेर पडून जगभर पसरणारा पहिला धर्म आहे.
  • बौद्ध धर्म हा बंधुत्व, समता, प्रेम, समानता, करुणा, स्वातंत्र्य, प्रज्ञा, मानवीय मुल्ये, विज्ञान या सर्व तत्वांना महत्व देऊन पुढे येणारा धर्म आहे.

गौतम बुद्ध

  • गौतम बुद्धांचा कार्यकाल सर्वसाधारणपणे इ.स.पु. ५६३ ते इ.स.पु. ४८३ इतका मनाला जातो.
  • गौतम बुद्धांचा जन्म इ.स.पु. ५६३ मध्ये नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. त्यांचा वडिलांचे नाव राजा शुध्दोधऩ तर आईचे नाव राणी मायादेवी असे होते.
  • गौतम बुद्धांच्या जन्मानंतर त्यांचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले होते. सिद्धार्थ हेच त्यांचे मूळ नाव आहे.
  • त्यांच्या जन्माच्या नंतर अवघ्या एका सप्ताहात त्यांच्या आई राणी मायादेवी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांची मावशी व त्यांची सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. म्हणूनच त्यांना गौतम या नावानेही ओळखले जाते.
  • गौतम बुद्धांनी आवश्यक असे शिक्षण  घेतले नंतर यशोधरा या राजकुमारीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा मुलगा देखील झाला.
  • मानवाला दु:ख का होते या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी घरदाराचा त्याग करून ते ज्ञानप्राप्तीसाठी फिरू लागले.
  • घरत्यागानंतर त्यांनी खूप ज्ञान प्राप्त केले. खूप कठोर अशी तपस्या केली. अशीच तपस्या करतांना एका वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बिहार मधील गया शहराजवळच्या ऊरुवेला या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली इ.स.पु. ५२८ मध्ये त्यांना बोधी म्हणजे दिव्यज्ञानप्राप्ती झाली.
  • ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी उत्तरप्रदेशातील सारनाथ येथे प्रथम पंडितांना पहिला उपदेश केला. त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्म किंवा धम्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते. धम्म प्रचारासाठी जवळपास ४५ वर्षे त्यांनी चारिका(पायी फिरणे) केली.
  • गौतम बुद्धांनी इ.स.पु. ६ व्या शतकात जवळपास एक लाख लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. 
  • त्यानंतर इ.स.पु. ४८३ मध्ये ८० वर्षाचे असतांना उत्तरप्रदेशमधील कुशीनगर यथे गौतम बुद्धांचे महापारीनिर्वाण झाले.

बौद्ध धर्माची शिकवण, उपदेश आणि तत्वे

गौतम बुद्धांनी मानवी जीवनाशी निगडीत अशी चार सत्ये सांगितली त्याला आर्यसत्ये असे म्हंटले जाते.

चार आर्यसत्ये 

(१) दु:ख – मानवी जीवनातील दु:ख

(२) दु:खाचे कारण – त्या दु:खला कारण देखील असते.

(३) दु:ख निवारण – ते दु:ख दूर देखील करता येते.

(४) प्रतिपद – प्रतिपद म्हणजे दु:खला दूर करण्याचा शुद्ध आचरणाचा मार्ग या मार्गाला अष्टांग मार्ग असेही म्हणतात.

गौतम बुद्धांनी सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांनाच आपण पंचशील असे म्हणतो ते नियम म्हणजे 

पंचशील

(१) अहिंसा – कोणत्याही प्राण्याची किंवा जीविताची हत्या करू नये.

(२) कोणत्याही प्रकारची चोरी करू नये

(३) अनैतिक किंवा कामवासने पासून दूर राहणे

(४) कधी असत्य म्हणजे खोटे बोलू नये

(५) कुठलाही मादक पदार्थ किंवा कुठल्याही मोहात पडणाऱ्या मादक वस्तूंचे सेवन करू नये.

गौतम बुद्धांनी दिलेले अष्टांगिक मार्ग

(१) सम्यक दृष्टी – निसर्गाच्या नियमांनुसार वागणे आणि आर्य सात्यांचे ज्ञान ठेवणे.

(२) सम्यक संकल्प – योग्य विचार किंवा निर्धार हिंसा सारख्या तत्वांचा त्याग करणे.

(३) सम्यक वाचा – खोटे न बोलणे, चाहाडी, कठोर, किंवा निरर्थक बडबड न करणे.

(४) सम्यक कार्मान्त – चांगले कार्य म्हणजे योग्य कृत्ये करणे

(५) सम्यक आजिविका – गैरमार्गाने उदरनिर्वाह न करता तो योग्य व खऱ्या मार्गाने करणे.

(६) सम्यक व्यायाम – मनातील वाईट विचारांचा नाश करणे.

(७) सम्यक स्मृती – मन एकचित्त करून लोभ आणि वाईट विचारांचा नाश करणे आणि आपले मन योग्य पद्धतीने समजून घेणे.

(८) सम्यक समाधी – आपले मन शांत आणि एकाग्र करून ध्यान करणे आणि ध्यानाचा अनुभव घेणे.

 बौद्ध धर्माच्या प्रसाराची कारणे

  • गौतम बुद्धांची शिकवण साधी सोपी होती; धर्माचे आचरण करण्यासाठी ब्राम्हण आणि इतर खर्चिक कर्मकांडाची आवशक्यता नाही असे त्यांनी सांगितले. म्हणून गरीब आणि कनिष्ट जातीचे लोक आकर्षित झाले.
  • गौतम बुद्धांनी धर्मप्रसारासाठी पाली ही सर्वसामान्य लोकांची भाषा वापरली
  • बौद्ध धर्म हा समानतेवर आधारित धर्म होता. म्हणून शुद्रांनी आणि इतर कनिष्ट जात वाल्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
  • मुक्ती मिळवण्यासाठी वैदिक आणि खर्चिक कर्मकांडापेक्षा अष्टांग मार्गाचे आचरण केल्यास मुक्ती मिळू शकते असे गौतम बुद्धांनी सांगितले.
  • बुद्धांचे तत्व आणि व्यक्तीमत्व आकर्षक होते.
  • वैदिक धर्मात ब्राम्हणांना महत्व दिले म्हणून क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. 
  • गौतम बुद्धांच्या महापारीनिर्वाहानंतर त्यांच्या शिकवणीचे संकलन करण्याच्या विचारातून बौद्ध परिषदा भारावल्या गेल्या त्यातूनच बौद्ध धर्मग्रंथ विनय पिटिका, सुत्त पिटिका, आणि अभिधाम्म पिटिका या तीन ग्रंथनात्रीपिटिका तयार झाले. यांची सुद्धा धर्मप्रसारास मोठी मदत झाली.

बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे

  • ज्या प्रमाणे बौद्ध धर्माचा वेगाने प्रसार झाला होता त्याच वेगाने ऱ्हास देखील झाला. १२ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा जवळपास भारतातून नाहीसा झाला होता.
  • बौद्ध धर्मा मध्ये झालेले वैदिक कर्मकांडाचा शीरकाव मूर्तीपूजेला झालेली सुरुवात.
  • बौद्ध धर्मात ब्राम्ह्नांकडून वैदिक धर्मात सुधारणा करणात आल्या त्यामुळे देखील ऱ्हास होण्यास सुरुवात झाली होती.
  • बौद्ध धर्मात भ्रष्टाचार देखील वाढला होता.
  • लोकांची सर्वसामान्य पाली भाषा सोडून धर्मात संस्कृत भाषेचा उपयोग सुरु झाला होता.
  • बौद्ध धर्मात स्त्रियांना प्रवेश दिल्यामुळे भिक्षु त्यांच्याकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहू लागले होते. 
  • हून, शुंग इत्यादी शासकांनी बौद्ध धर्माच्या विरोधी भूमिका घेतली.

बौद्ध धर्मातील महत्वाची ठिकाणे

  • गौतम बुद्धांचे जन्मस्थान – लुंबिनी (नेपाळ)
  • गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचे ठिकाण – बौद्धगया (बिहार)
  • गौतम बुद्धांच्या धाम्मचक्रप्रवर्तनाचे ठिकाण – सारनाथ (उत्तरप्रदेश)
  • गौतम बुद्धांच्या महापरीनिर्वाणाचे ठिकाण – कुशीनगर (उत्तरप्रदेश)

बौद्ध धर्माची महत्वाची शिक्षण केंद्रे

(१) नालंदा  (२) विक्रमशीला    (३) वल्लभी   (४) अमरावती   (५) घंटाशाळा

बौद्ध धर्माच्या परिषदा

बौद्ध धर्माच्या एकूण चार परिषदा पार पडल्या त्याची माहिती आपण पुढील तक्त्यात समजून घेऊ शकतो.

परिषद

वर्ष

अध्यक्ष

ठिकाण

राजा

परिषदेचे उद्देश्य
/ परिणाम

पहिली

इ.स.पु. ४८७

महाकश्यप

राजग्रीह

अजातशत्रू

बौद्ध धर्माच्या
सिद्धांताचे संकलन करण्यासाठी (सुक्तपिटिका व विनय पिटिका)

दुसरी

इ.स.पु. ३८७

सब्बकामी

वैशाली

कालाशोक

बौद्ध धर्मात फुट
पडून महायान आणि हीनयान असे २ पंथ तयार झाले.

तिसरी

इ.स.पु. २५५

मोगली-पुत्र
तीस्सा

पाटलीपुत्र

अशोक

अभिधम्म ग्रंथाची
निर्मिती

चौथी

इ.स.पु. १

वासुमित्र

कुंडलवन (काश्मीर)

कनिष्क

हीनयान
प्रांथाच्या सिद्धांताला अंतिम स्वरूप देण्यात आले.

बौद्ध धर्मातील महत्वाचे ग्रंथ

  • सुत्त पीठिका – संकलन – आनंद = बुद्धांच्या उपदेशाचे संकलन
  • विनय पीठिका – संकलन – उपाली = बौद्ध भिक्शुंसाठी संघात आचरणाचे नियम
  • अभिधम्म पीठिका – संकलन – मोगलीपुत्र तीस्सा = बौद्ध तत्वज्ञानाचा उल्लेख
  • दीपवंश आणि महावंश = अशोकाच्या आदेशावरून श्रीलंकेत निर्मिती केली गेली आहे. यात अशोकाने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या ९९ भावांचा वध केल्याचा उल्लेख आहे.
  • मिलिंदपन्हो = मिलिंद आणि बौद्ध भिक्षु नागसेन यांच्यातील संवाद या ग्रंथात आहे. 
  • बुद्धचरित – लेखक – अश्वघोष – गौतम बुद्धांच्या संपूर्ण जीवनपटा उल्लेख यात आहे.

ज्यू धर्म 

  • ज्यू धर्म हा आजपासून जवळपास ३००० वर्षापूर्वी म्हणजे इ.सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात उदयास आलेला धर्म आहे.
  • ज्यू धर्माची स्थापना ही मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशात  झाली असावी. आणि नंतर ते हळूहळू केरळ मधील कोचीन पर्यंत आले असावे अशी मान्यता आहे.
  • ज्यू धर्माला स्वीकारणाऱ्यांना ज्यू किंवा यहुदी असेही म्हणतात.
  • ज्यू धर्म हा जगातील सर्वात जुना एकेश्वरवादी म्हणजे एका देवावर विश्वास ठेवणारा धर्म आहे.
  • ज्यू धर्म हा मानवाला न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दानधर्म करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान बाळगणे या गुणांची शिकवण देतो.
  • ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळाला सिनॅगॉग असे म्हंटले जाते.
  • जगामध्ये ज्यू धर्माच्या लोकांची संख्या ०.२% एवढी असुन या धर्माची सर्वात जास्त लोकसंख्या इस्राईल मध्ये आहे. आणि ज्यू धर्म हा इस्राईल चा राज्यधर्म आहे.

ख्रिचन धर्म | krischan Dharm Information In Marathi

  • ख्रिचन धर्म हा जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक धर्म असुन या धर्माला सुमारे २००० वर्षांचा इतिहास आहे.
  • ख्रिचन धर्माची सुरुवात पॅलेस्टईन म्हणजे सध्याच्या इस्राइल या देशामध्ये झाली आहे.आणि नंतर हा धर्म जगभर पसरला 
  • ख्रिचन धर्माची स्थापना ही भगवान येशू ख्रिस्तानी केली आहे.
  • येशू ख्रिस्तांच्या १२ शिष्यांपैकी एक शिष्य हे इ.स. ५२ मध्ये भारतातील केरळ मध्ये आले आणि नंतर त्यांनी केरळमध्ये त्रिचूर जिल्ह्यातील पल्लायुर येथे पहिल्या चर्च ची स्थापना केली.
  • ख्रिचन धर्माच्या शिकवणीत देव हा एकच आहे. देव हा सर्वांचा पिता आहे. तो सर्वशक्तिमान आहे. येशू ख्रिस्त ह्हे देवाचे पुत्र आहे आणि मानवाच्या मदतीसाठी आणि उद्धारासाठी ते धरतीवर आलेले होते असे मानले जाते.
  • त्याचप्रमाणे आपण सर्व मानव एकमेकांचे भाऊबंधू, भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे. आपण सर्व चुकलेल्यांना माफ केले पाहिजे ही सर्व शिकवण ख्रिस्त धर्माने दिली.
  • ख्रिचन धर्माचा मुख्य आणि पवित्र धर्मग्रंथ हा बायबल आहे.
  • ख्रिचन धर्माच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात.
  • ख्रिचन धर्मात एकूण ३ मुख्य धर्मपंथ आहे ते म्हणजे रोमन कॅथोलिक, ईस्टर्ण ऑर्थोडॉक्स, आणि प्रोटेस्टंट पंथ आणि या तीन पंथाचे आणखी भरपूर उपपंथ आहे.

इस्लाम धर्म 

  • इस्लाम धर्माची स्थापना इ.स. ६१० मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात झाली.
  • या धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी केली.
  • मुस्लीम धर्म हा एकेश्वरवाद म्हणजेच एकाच देवाला मानणारा धर्म आहे.
  • इस्लाम धर्माचे पालन व आचरण करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हंटले जाते.
  • इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा होतो. तसेच त्याचा एक अर्थ अल्ला ला शरण जाणे असाही होतो.
  • भारत आणि अरबस्तान यांच्या व्यापारी संबंधामुळे अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावर नेहमी येत असे; त्याच वेळी इ.स. ७ व्या शतकात अरबस्तानात इस्लाम धर्माचा प्रसार झाला आणि नंतर त्या व्यापाऱ्यानमार्फत इस्लाम धर्म भारतात आला.
  • २०२० नुसार जगातील लोकसंख्येत जवळपास २४.४% लोकसंख्या ही मुस्लीम धर्मीय आहेत. तसेच भारतात जवळपास २० कोटी मुसलमान राहतात. भारत हा जगातील तिसरा मुस्लीम लोकसंख्या असणारा देश आहे.
  • कलमा, रोजा, नमाज, जकात, हज या पाच गोष्टी इस्लाम धर्मामध्ये महत्वच्या मानल्या जातात.
  • इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण हा आहे.
  • इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात.

इस्लाम धर्माची शिकवण

  • मनुष्य हा शुद्ध आणि निर्दोष जन्माला येत असतो
  • मनुष्याने केलेल्या पापाची जबाबदारी दुसरा कोणीही घेऊ शकत नाही
  • मनुष्याने आपल्या पापाचा पश्चाताप केला तर त्याच्या साठी क्षमा ही भेटतेच.

इस्लाम धर्माची तत्वे

  • अल्लाह हा एकच देव असुन त्यापेक्षा मोठा कोणीही नाही.
  • महुम्मद पैगंबर हे अल्लाहचे शेवटचे प्रमुख आहे.
  • दिवसातून ५ वेळा नमाज चे पाठ (वाचन) करणे.
  • आयुष्यभरात एकदा तरी मक्केला भेट देणे.
  • आपल्या उत्पन्नातील २.५% उत्पन्न गरीब लोकांना दान करणे.

पारशी धर्म | Parsi Dharm

  • इ.स.पुर्व सहाव्या शतकात पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म आहे. या धर्माची स्थापना झरथ्रूष्ट या संतांनी केली. आणि त्यांच्या शिकवणीतूनच हा धर्म तयार झाला.
  • पारशी धर्माच्या स्थापनेनंतर जवळपास १० शतके पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. पण त्यानंतर झालेल्या युद्धांमुळे आणि इ.स. सातव्या शतकात इस्लाम धर्माच्या निर्मितीनंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरु झाला.
  • प्राचीन काळापासूनच पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे एकमेकांसोबत संबंध होते. त्यामुळेच पारशी धर्मग्रंथ अस्तेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेमध्ये साम्य दिसून येते.
  • पारशी लोक हे इराणच्या पार्स (फार्स) या प्रांतातून प्रथम भारतात आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जात असे. भारतात ते प्रथम गुजरात राज्यामध्ये इ.स. आठव्या शतकात आले असे मानले जाते.
  • या धर्मामध्ये पाणी आणि अग्नी या दोन गोष्टींना फार महत्व दिले जाते. पारशी लोकांच्या देवळामध्ये पवित्र अशी अग्नी प्रज्वलित केलेली असते.
  • पारशी धर्माच्या मंदिराला अग्यारी असे म्हंटले जाते.
  • पारशी धर्म हा पूर्ण पणे उत्तम विचार, उत्तम वाणी व उत्तम कृती या मुख्य आचरण तत्वांवर आधारित आहे.
 अश्या प्रकारे आपला आजचा लेख पूर्ण झाला या लेखामध्ये आपण प्राचीन भारतातील धर्माबद्दल माहिती बघितली. धर्मा मध्ये आपण जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिचन धर्म, इस्लाम धर्म आणि पारशी धर्म या बद्दल सविस्तर माहिती बघितली या लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की comment करून कळवा. ही माहिती स्पर्धापारीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फार उपयोगी पडणार आहे. 

संबंधित प्रश्न उत्तरे

१) धर्म म्हणजे काय ?

सारखे
विचार करणाऱ्या लोकांचा गट किंवा समूह यास धर्म असे म्हणतात.

२) जैन धर्म ग्रंथ कोणते ?

आगम, कल्पसूत्र, भगवती
सूत्र
, हे जैन धर्मातील
महत्वाचे धर्मग्रंथ आहे. त्याच बरोबर पराशिष्ट    वर्णन
न्यायावतार,स्यादवाद, मंजिरी, पुराण, पद्य पुराण, महा पुराण हे जैन धर्मातील इतर
महत्वपूर्ण ग्रंथ आहे

३) बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली ?

बौद्ध धर्माची पहिली परिषद ही इ.स.पूर्व ४८७
मध्ये
राजग्रीह येथे अजातशत्रू राजाच्या देखरेखित झाली व
त्या परिषदेचे अध्यक्ष महाकश्यप होते

४) इस्लाम धर्माचा पवित्र
ग्रंथ कोणता ?

इस्लाम धर्माचा पवित्र
ग्रंथ कुराण हा आहे.

५) पारशी धर्मात कोणत्या
देवाची उपासना केली जाते ?

पारशी धर्मात पाणी आणि
अग्नी या दोन गोष्टीची देव म्हणून उपासना केली जाते.

नक्की वाचा…!!

वैदिक साहित्य मराठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top