नफा व तोटा |
आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक व्यवहारामध्ये नफा आणि तोटा ही संकल्पना आपल्याला रोज उपयोगी येत असते. कोणताही व्यवसाय चालवण्याकरिता किंवा तो किती फायदेशीर आहे हे माहिती करण्यासाठी आपण नफा आणि तोटा या दोन सज्ञांचा नेहमी वापर करत असतो. नफा आणि तोटा म्हणजे काय हे आता आपण बघूया.
नफा म्हणजे काय ?
एख्याद्या व्यवहारात आपल्याला झालेला फायदा म्हणजे थोडक्यात नफा होय. जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी असते तेव्हा नफा होत असतो.
तोटा म्हणजे काय?
एखाद्या व्यवहारात झालेले नुकसान म्हणजे तोटा होय.जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा तोटा होत असतो.
नफा आणि तोटा काढण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहित असणे आवश्यक असतात. त्या गोष्टी आपण जाणून घेऊया.
- खरेदी किंमत
- विक्री किंमत
- छापील किंमत (MRP)
- सुट
नफा आणि तोटा सूत्र (Nafa Tota Formula in Marathi)
- नफा काढण्याचे सूत्र
- तोटा काढण्याचे सूत्र
- शेकडा नफा काढण्याचे सूत्र
- शेकडा तोटा काढण्याचे सूत्र
शेकडा तोटा = एकूण तोटा / खरेदी किंमत × १००
- खरेदी किंमत काढण्याचे सूत्र
खरेदी किंमत = १०० × विक्री किंमत / १०० + शेकडा नफा
खरेदी किंमत = १०० × विक्री किंमत / १०० – शेकडा तोटा
- विक्री किंमत काढण्याचे सूत्र
विक्री किंमत = १०० + शेकडा नफा × खरेदी किंमत / १००
विक्री किंमत = १०० + शेकडा तोटा × खरेदी किंमत / १००
- सुट काढण्याचे सूत्र
सुट = छापील किंमत – विक्री किंमत
- शेकडा सुट काढण्याचे सूत्र
शेकडा सुट = (सुट / छापील किंमत) × 100
संबंधित प्रश्न उत्तरे
(१) नफा म्हणजे काय?
उत्तर: एख्याद्या व्यवहारात आपल्याला झालेला फायदा म्हणजे थोडक्यात नफा होय.
(२) तोटा म्हणजे काय ?
उत्तर: एख्याद्या व्यवहारात आपल्याला झालेले नुकसान म्हणजे थोडक्यात तोटा होय.
(३) ना नफा ना तोटा तो बिंदू म्हणजे काय?
उत्तर: ना नफा ना तोटा तो बिंदू म्हणजे मुद्दल व्यवहार होय म्हणजेच ज्या किमतीत वस्तू खरेदी केली त्याच किमतीत वस्तू विकली अशा वेळेस खरेदी किंमत आणि विक्री किंमत ही समान असते.
(४) नफा तोटा काढण्याचे सूत्र कोणते?
उत्तर: नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत