अलंकार व त्याचे प्रकार | Alankar In Marathi Grammar
अलंकार म्हणजे काय ?
अलंकार म्हणजे दागिना , ज्याप्रकारे मनुष्याला सुंदर देखणे दिसण्यासाठी दागिन्याची किंवा चांगल्या कपड्यांची गरज असते त्याप्रमाणे भाषेला सुद्धा शोभा आणण्यासाठी आपण भाषेचे जे काही गुणधर्म वापरतो त्यास ‘अलंकार’ असे म्हणतात.
कधी दोन गोष्टीतील साम्य दाखवून कधी विरोध दाखवून कधी नाद निर्मिती करून तर कधी शब्दांमध्ये विस्तार करून तर कधी कधी एखाद्या कल्पनेला विस्तारून अक्षररचनेत निर्माण होणाऱ्या नादामुळे भाषेला शोभा येते म्हणजेच आपण भाषेला अलंकार चढवतो.
भाषेला शोभा आणण्यासाठी आपण जे काही भाषेचे गुणधर्म वापरतो त्या गुणधर्मामुळे अलंकाराचे २ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
- शब्दालंकार
- अर्थालंकार
१. शब्दालंकार
ज्या विशिष्ट शब्दरचनेमुळे गद्याला किंवा पद्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास ‘शब्दालंकार’ असे म्हणतात
शब्दालंकारचे आणखी ३ उपप्रकार पंडतात ते पुढीलप्रमाणे
(i) अनुप्रास अलंकार
जेंव्हा गद्यामध्ये किवा पद्यामध्ये एकाच शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती करून वाक्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास ‘अनुप्रास अलंकार’ असे म्हणतात.
उदा. १. कड्यावरुनी या उड्या प्रथम हकुनी त्या गड्या
२. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझा घरी
पहिल्या उदाहरणामध्ये ड्या ची पुनरावृत्ती करून वाक्यामध्ये शोभा वाढवली गेली त्याच प्रकारे दुसऱ्या वाक्यात देखील ज, रा, री या शब्दांची पुनरावृत्ती करून वाक्याची शोभा वाढवली गेली अशा अक्षरांची पुन्हा पुन्हा हाताळणी करून वाक्याला जे सौंदर्य आणले जाते त्या सौंदर्य निर्मितीला अनुप्रास अलंकार असे म्हणतात
(ii) यमक अलंकार
कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे दुसऱ्या चरणात पुन्हा त्याच क्रमाने परंतू भिन्न अर्थाने आल्यास त्यास ‘यमक अलंकार’ म्हणतात
उदा. १. जाणावतो तो ज्ञानी पूर्ण समाधानी नि:सन्देह मनी सर्वकाळ ||
२. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा घडो विषम सर्वता नावडो
वरील उदाहरणांमध्ये पहिल्या उदाहरणात नी हे अक्षर पुन्हा पुन्हा आले असुन या अक्षरामुळे वक्यातील पंक्तीला अधिक सौंदर्य प्राप्त झाले. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये डो हे अक्षर वेगवेगळ्या अर्थाने यमक जोडून आणून यमक अलंकार तयार झाला आहे.
(iii) श्लेष अलंकार
एका वाक्यात किंवा चरणात एकच शब्द दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमककृती साधल्या जाते तेव्हा ‘श्लेष अलंकार’ होतो.
उदा १. हे मेघा तु सर्वांना जीवन देतोस.
२. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही.
वरील दोन्ही उदाहरणे बघितले असता पहिल्या उदाहरणामध्ये जीवन हा शब्द पाणी व आयुष्य अशा दोन अर्थाने आला आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये मित्राच्या या शब्दाला पण सूर्याच्या आणि स्नेहाच्या असे दोन अर्थ आहे. म्हणून हे दोन्ही उदाहरणे श्लेष अलंकारामध्ये मोडतात.
२. अर्थालंकार
ज्या विशिष्ट शब्द रचनेमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो किंवा वाक्याला शोभा येते त्या गुणधर्माला ‘अर्थालंकार’ असे म्हणतात.
अर्थालांकारातील काही महत्वाच्या संकल्पना
- (अ) उपमान – ज्याच्याशी कवी एखाद्या गोष्टीची तुलना करतो ती गोष्ट.
- (ब) उपमेय – ज्याची कवी तुलना करतो तो
- (क) साधर्म्य – दोन गोष्टीतील सारखेपणा
- (ड) साम्यवाचक शब्द – दोन गोष्टीतील सारखेपणा दाखविणारा शब्द
उदा तिचे मुख चंद्रासारखे होते.
मुख – उपमेय
चंद्रा – उपमान
सारखे – साम्यवाचक शब्द
(i) उपमा अलंकार
ज्या वस्तूविषयी बोलायचे असते ती आणि तिच्या भिन्न गोष्टीची एकमेकांसोबत तुलना करून त्या दोन गोष्टीत साम्य पहिले जाते व ते सुंदर रीतीने दर्शविले जाते त्यास आपण ‘उपमा अलंकार’ असे म्हणतो.
उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी यांसारखी साम्यवाचक शब्द वापरले जातात.
उदा. (१) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे.
(ii) रूपक अलंकार
(iii) अतिशयोक्ती अलंकार
(iv) स्वभावोक्ती अलंकार
(v) अन्योक्ती अलंकार
(vi) उत्प्रेक्षा अलंकार
(vii) अपन्हुती अलंकार
(viii) अनन्वय अलंकार
(ix) व्यतिरेक अलंकार
(x) अर्थान्तरन्यास अलंकार
(xi) चेतन गुणोक्ती अलंकार
(xii) दृष्टांत अलंकार
(xiii) सार अलंकार
(xiv) व्याजोक्ती अलंकार
(xv) व्याजस्तुती अलंकार
(xvi) असंगती अलंकार
(xvii) ससंदेह अलंकार
(xviii) विभावना अलंकार
(xix) विरोधाभास अलंकार
(xx) भ्रांतीमान अलंकार
(xxi) विशेषोक्ती अलंकार
(xxii) पर्यायोक्ती अलंकार
अशा प्रकारे, आज आपण मराठी व्याकरण्यातील ‘अलंकार व त्याचे प्रकार’ (Alankar and Its Types in Marathi) या विषयाची सविस्तर माहिती, व्याख्या आणि उदाहरणे अभ्यासली आहेत. स्पर्धा परीक्षा मग ती MPSC असो, पोलीस भरती असो किंवा तलाठी भरती, या सर्व परीक्षांमध्ये अलंकारावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. आम्हाला आशा आहे की या नोट्समुळे तुमची या विषयाची तयारी अधिक पक्की झाली असेल.
तुमच्या अभ्यासात सातत्य ठेवा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत हा लेख नक्की शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणत्याही विषयावर नोट्स हव्या असल्यास खाली कमेंट करून नक्की कळवा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न / उत्तरे (FAQs)
प्रश्न १: मराठी व्याकरणात अलंकार म्हणजे काय?
उत्तर: ज्या गुणधर्मांमुळे भाषेला शोभा येते किंवा भाषेचे सौंदर्य वाढते, त्याला ‘अलंकार’ असे म्हणतात. जसे दागिने घातल्याने माणसाचे सौंदर्य वाढते, तसेच अलंकारांमुळे भाषेचा डौल वाढतो.
प्रश्न २: अलंकाराचे मुख्य प्रकार किती व कोणते आहेत?
उत्तर: मराठी व्याकरणात अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात:
१. शब्दालंकार: शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
२. अर्थालंकार: शब्दांतून निघणाऱ्या अर्थामुळे जेव्हा भाषेला शोभा येते.
प्रश्न ३: शब्दालंकाराचे उपप्रकार कोणते?
उत्तर: शब्दालंकाराचे मुख्य तीन उपप्रकार आहेत:
अनुप्रास अलंकार: एकाच अक्षराची पुनरावृत्ती.
यमक अलंकार: कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी सारखे शब्द येणे.
श्लेष अलंकार: एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जाणे.
प्रश्न ४: उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय फरक आहे?
उत्तर: उपमा अलंकारात दोन वस्तूंमधील साम्य दाखवण्यासाठी ‘गत’, ‘सारखा’, ‘सम’, ‘सदृश’ यांसारखे शब्द वापरतात.
उत्प्रेक्षा अलंकारात उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवले जाते (उदा. जणू, जणू काय, गमे, वाटे).
प्रश्न ५: स्पर्धा परीक्षेसाठी (MPSC) अलंकार हा विषय महत्त्वाचा आहे का?
उत्तर: हो, MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या मराठी व्याकरण विभागात ‘अलंकार व त्याचे प्रकार’ यावर किमान १ ते २ प्रश्न हमखास विचारले जातात.