लिंग
नामाच्या रूपावरून नामाने दर्शित पदार्थाविषयी पुरुषत्व, स्त्रीत्व किंवा नपुसंकत्व याचा बोध होतो तेव्हा त्याला नामाचे ‘लिंग’ असे म्हणतात.
लिंगभेद व त्याचे प्रकार |
लिंगभेदावरून नामाचे एकूण ३ लिंगे आहेत.
(१) पुल्लिंगी
(२) स्त्रीलिंगी
(३) नपुंसकलिंगी
(१) पुल्लिंगी
प्राणीवाचक व वस्तुवाचक नामातील पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला ‘पुल्लिंगी’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : मुलगा, घोडा, बैल, चंद्र, सूर्य, दिवा, कालवा, चिमणा, मुंगळा, पर्वत इ.
तो हा शब्द पुरुषांसाठी वापरत असल्याने शब्दाचा तो ने उल्लेख होत असल्यास पुल्लिंगी होतो.
उदाहरणार्थ : तो मुलगा, तो घोडा, तो बैल, तो चंद्र, तो दिवा, तो कालवा,
(२) स्त्रीलिंगी
प्राणीवाचक व वस्तुवाचक नामातील स्त्री किंवा मादीजातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना ‘स्त्रीलिंगी‘ असे म्हणतात
उदाहरणार्थ : मुलगी, मेंढी, पाटी, इमारत, भाकरी, चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी इ.
ज्या शब्दाचा उल्लेख ती लावून करण्यात येतो तो शब्द स्त्रीलिंगी होतो. ती हा शब्द स्त्री जातीसाठी वापरला
जातो
उदाहरणार्थ : ती मुलगी, ती मेंढी, ती पाटी, ती इमारत, ती भाकरी, ती घोडी, ती चिमणी इ.
(३) नपुंसकलिंगी
ज्या नामाच्या रूपावरून पुरुष किंवा स्त्री यांपैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्यांना ‘नपुंसकलिंगी’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : पुस्तक, घर, मेंढरू, दगड, शहर, दौत इ.
सर्वसामान्य पणे नपुंसकलिंगी चा उल्लेख ते या शब्दाने करतात.
उदाहरणार्थ : ते पुस्तक, ते घर, ते मेंढरू, ते शहर इ.