सर्वनाम व त्याचे प्रकार | Sarvnam V Tyache Prakar

सर्वनाम

नामाचा पुर्नरुच्चार टाळावा म्हणून नामाचा ऐवजी योजिलेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे  ‘सर्वनाम’  होय.
                उदारणार्थ : मी, तु, तो, हा, जो, आपण, कोण, काय, इत्यादी.
sarvanam v tyache prakar, pronoun in marathi,सर्वनाम व त्याचे प्रकार
सर्वनाम व त्याचे प्रकार
            सर्वनामाचे पुढीलप्रमाणे सहा प्रकार पडतात.
        (१) पुरुषवाचक सर्वनाम
        (२) दर्शक सर्वनाम
        (३) संबंधी सर्वनाम
        (४) प्रश्नार्थक सर्वनाम
        (५) सामान्य किवा अनिश्चित सर्वनाम
        (६) आत्मवाचक सर्वनाम
        आपण आता या सर्व प्रकारांची सविस्तर माहिती घेऊया हे प्रकार कसे पडतात आणि कोणत्या आधारावर पडतात हे आपण पुढे बघूया.

(१) पुरुषवाचक सर्वनाम

          बोलणाऱ्याच्या  ज्याच्याशी आपण बोलतो व ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीच्या  किवा वस्तूच्या नामाबद्दल होणाऱ्या सर्वनामांना ‘पुरुषवाचक सर्वनाम’ म्हणतात. 

        पुरुषवाचक सर्वनामाचे आणखी तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :

    (अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

    (ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम

    (क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

आता आपण पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार समजून घेऊया

    (अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

        बोलताना स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात  ती ‘प्रथम पुरुषवाचक सर्वनामे’ होय
                उदारणार्थ  :  मी, आम्ही, आपण, स्वतः

     (ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम 

        ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जि सर्वनामे वापरली जातात ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम’ होय.
                उदारणार्थ  :   तु, तुम्ही, आपण.

     (क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

           ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तु यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे  वापरताना ती ‘तृतीय पुरुषवाचक सर्वनाम’ होय.
            उदारणार्थ  :  तो, ती, ते, त्या.

     (२) दर्शक सर्वनाम

        जवळची किंवा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी जी सर्वनामे येतात त्यांना ‘दर्शक सर्वनाम’ असे म्हणतात.
                     उदारणार्थ  :  हा, ही, हे, तो, ती, ते.

    (३) संबंधी सर्वनाम

          वाक्यात पुढे येणारे दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाना ‘संबंधी सर्वनाम‘ असे म्हणतात.

                        उदारणार्थ  :  जो – तो, जे – जे, ते – ते, जेथे – तेथे, ज्या – त्या, जो – जी.

    (४) प्रश्नार्थक सर्वनाम

           ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी करण्यात येतो; त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनाम’ असे म्हणतात.

                     उदारणार्थ  :  कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, कधी, किती.

    (५) सामान्य किवा अनिश्चित सर्वनाम

       प्रश्नार्थक सर्वनामे ही प्रश्न विचारण्यासाठी न येता  तो कोणत्या नामाबद्दल आली आहे जे निश्चित पणे सांगता येत नाही त्यांना अनिश्चित सर्वनाम‘ असे म्हणतात.

                    उदारणार्थ  :  काय ही गर्दी !

                                        कोणी कोणास काहीही म्हणू नये !

    (६) आत्मवाचक सर्वनाम

        आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा त्यास आत्मवाचक सर्वनाम’ असे म्हणतात.

                    उदारणार्थ  :  आपण, स्वतः .

संबंधित प्रश्न उत्तरे

1) सर्वनाम म्हणजे काय ?
नामाचा पुर्नरुच्चार टाळावा म्हणून नामाचा ऐवजी योजिलेला त्याच अर्थाचा विकारी शब्द  म्हणजे  ‘सर्वनाम’  होय
2) सर्वनामाचे एकून किती प्रकार पडतात व ते कोणते ?
सर्वनामाचे पुढीलप्रमाणे सहा प्रकार पडतात. (१) पुरुषवाचक सर्वनाम (२) दर्शक सर्वनाम (३) संबंधी सर्वनाम
(४) प्रश्नार्थक सर्वनाम (५) सामान्य किवा अनिश्चित सर्वनाम (६) आत्मवाचक सर्वनाम
3) पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते ?
बोलणाऱ्याच्या  ज्याच्याशी आपण बोलतो व ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीच्या  किवा वस्तूच्या नामाबद्दल होणाऱ्या सर्वनामांना ‘पुरुषवाचक सर्वनाम’ म्हणतात.
पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे : (अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
(ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम (क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top