म्हणी व त्यांचे अर्थ
- आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे
- आकारे रंगती चेष्टा – बाह्य लक्षणांवरून अंतर्गत वागणुकीचे चित्र स्पष्ट होते.
- आपली पाठ आपणास दिसत नाही – स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही.
- अर्थीदान महापुण्य – दान नेहमी सत्पात्री करावे.
- आगीतून उठून फुफाट्यात पडणे – एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे.
- अळी मिळी गुप चिळी – आपले रहस्य गुपित ठेवण्यासाठी दुसऱ्याला चप करणे.
- आलिया भोगासी असावे सादर – तक्रार न करता आलेली परिस्थिती स्वीकारणे.
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी व्यक्तीस अजून अनुकूल परिस्थिती निर्माण करणे.
- उचलली जीभ लावली टाळूला – विचार न करता बोलणे
- आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला – दुसऱ्याला आपण ज्या दोषाबद्दल हसतो तोच दोष नेमका आपल्याजवळ असणे.
- आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन – अपेक्षा केली त्यापेक्षा जास्त मिळणे
- असतील शिते तर जमतील भुते – पैस्यामुळेच चार व्यक्ती आपल्या भोवती असतात.
- अचाट खाणे मसनात जाणे – खाण्यापिण्यात अतिरेक घातक ठरतो.
- अग अग म्हशी मला कोठे नेशी – आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारणे.
- अन्नसत्री जेवून मिरपूड मागणे – अगोदरच एखादे काम फुकट करून वर मिजास खोरी करणे.
- अडली गाय फटके खाय – अडचणीत सापडनाऱ्याला आणखीच हैराण करणे.
- आपला हात जगन्नाथ – आपली उन्नती आपल्या कार्तुत्वावरच अवलंबून असते.
- आधीच तारे त्यात शिरले वारे – आधीच मर्कट आणि त्यात त्याने मद्यपान करणे.
- मनी नाही भाव देवा मला पाव – कर्म न करता फळ मागणे.
- देव देवळात चीत खेटरात – एका कामास जाणे पण दुसरेच काम करणे.
- कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी – सर्वांचेच दिवस येतात समान स्थिती कधीच राहत नाही.
- कुठे जाशी भोगा तो तर तुझ्यापुढे उभा – नको असलेली संकट समोर येणे.
- कावळा बसायशी आणि फांदी तुटायशी – परस्पर संबंध नसतांना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे.
- कडी चोर तो माडी चोर – शुल्लक अपराधाचा घडलेल्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.
- काळ आला होता पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचावणे.
- उंदराला मांजर साक्षी – सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे.
- काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही – संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते.
- करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय – मुळातच लहान वस्तू कितीही प्रयत्न केले तरी मर्यादेपेक्षा वाढत नाही.
- कसायाला गाय धार्जीणी – भांडखोर व अनीतिमान गुंडांपुढे गरीब माणसे नमतात.
- काप गेले पण भोके राहिली – वैभव गेले पण खणा मात्र राहिल्या.
- करीन ती पूर्व – मी करीन तेच योग्य असे वागणे.
- उडत्या पाखराची पिसे मोजणे – अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
- एका माळेचे मणी – सगळेच सारखे
- उठता लाथ बसता बुक्की – एकसारखा नेहमी मार देणे.
- एकाची जळते दांडी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी – दुसऱ्याचा अडचणीतही स्वतःचा फायदा पाहणे.
- एक ना धड भाराभर चिंध्या – सगळेच अपूर्ण
- एका म्यानात दोन तलवारी राहत नाही – दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाही.
- उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये – कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये.
- आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? – जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थच.
- गरजवंताला अक्कल नसते – गरजेपोटी दुसऱ्याचे निमाटपणे सहन करणे.
- गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य – अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते.
- कोळसा जितका उगाळावा तितका काळाच – वाईट गोष्टीचा किती उहापोह केला तरी ती वाईटच
- कोरडया बरोबर ओले जळते – निष्कारण निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे.
- माकडाच्या हातात कोलीत – विध्वंसतोशी माणसाच्या हातात कारभार सोपविणे.
- गाड्याबरोबर नळ्याची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा देखील फायदा होतो.
- गरज सरो वैद्य मरो – आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे.
- खाऊन माजावे टाकून माजू नये – पैशाचा , संपत्तीचा गैरवापर करू नये.
- खाणे जाणे तो पचवू जाणे – एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास समर्थ असणे.
- गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता – मुर्खाला कितीही उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो.
- कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा – आपल्या ताब्यातील वस्तूवर आपलाच हक्क दाखविणे.
- काट्याचा नायटा करणे – राईचा पर्वत करणे.
- खऱ्याला मरण नाही – खरे कधी लपत नाही.
- गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी – एखाद्या गोष्टीची अनुकुलता असुन चालत नाही तर सोबतच तिचा फायदा क्षमता असावी.
- गाढवास गुळाची चव काय – ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्याचे महत्व निरर्थक असते.
- खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे – बोलताना एक बोलायचे आणि प्रत्यक्ष कृती वेगळीच करायची.
- खोट्याच्या कपाळी गोटा – खोट्यापणाने वाईट काम करणाऱ्या माणसाचे शेवटी नुकसान होते.
- कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच – मुर्खाला किती समजावले तरी व्यर्थच.
- काकडीची चोरी फाशीची शिक्षा – अपराध लहान पण शिक्षा मोठी.
- काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही – खरी मैत्री किरकोळ कारणाने भंग होत नाही.
- भरवशाच्या म्हशीला टोणगा – जेथे खात्री वाटली तेथेच निराशा होऊन बसणे
- भोक नको पण कुत्रा आवर – एखाद्यावर उपकार करता नाही आले तरी चालेल पण
त्याच्या कार्यात अडथळा आणू नये - मन राजा मन प्रजा – हुकूम करणारेही आपलेच मन व ते तोडणारेही आपलेच मन
- मस्करीची होते तुस्करी – थट्टेचा परिणाम कित्येकदा भयंकर वाईट होतो
- मरावे परी कीर्तिरूपी उरावे – आपण जगात नसलो तरी कोर्ती राहील तसे काम करावे
- मनाऐवदी ग्वाही त्रिभुवणात नाही – मनासारखा खरे सांगणारा
साक्षीदार साऱ्या दुनियेत नाही - भरल्या गाड्यास सप जड नाही – मोठ्या कामात एखादे छोटे काम सहज होते.
- भांडणाचे तोंड काळे – भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो.
- मान सांगावा जणा नी अपमान सांगावा मना – मान हा लोकांना तर अपमान हा स्वतःला
सांगावा. - मनास मानेल तोच सौदा – आपल्याला आवडेल तीच गोष्ट करणे.
- मनाची नाही पण जनाची तरी – एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी
जनास काय वाटेल त्याचा विचार करावा. - मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – कोणाच्याही चांगुलपणाचा फायदा घेऊ
नये. - भटाला देई ओसरी भट हातपाय पसरी – कोणी केलेल्या उपकाराचा गैरफायदा
उठवणे. - म्हशीचे शिंगे म्हशीला जड नसतात – आपली माणसे आपल्याला
नकोशी होत नाही. - भित्या पाठी ब्रह्मराक्षस – ज्या गोष्टीस आपण भितो तीच गोष्ट पुढे येऊन उभे
राहणे - मानला तर देव नाही तर धोंडा – कोणालाही महत्त्व देणे किंवा न देणे आपल्यावर
अवलंबून असते. - मुंगी होऊन साखर खावी हत्ती होऊन लाकडे मोडू नये –
नम्रतेने वागून आपला फायदा करून घ्यावा. - मारणाऱ्याचा हात धरवतो पण बोलणाऱ्याचे तोंड नाही –
दांडग्या व्यक्तीस आवर घालणे सोपे पण बोलणाऱ्यास नाही. - मातीचे कुल्ले लावण्याने लागत नाही – परक्याला आपला म्हणून तो आपला होत नाही.
- मुंगीला मुताचा पर – जे पैशाने , शक्तीने कमी त्याला थोडासा खर्च व श्रमही जास्त
वाटतात. - मिळमिळीत सौभाग्यापेक्षा झळझळीत वैधव्य बरे – दुबळा पती असल्याने लाभणाऱ्या सौभाग्यापेक्षा
पराक्रमी थोर पुरुषाची विधवा असणे भाग्याचे. - नासली मिरी जोंधळाला हार जात नाही – कर्तृत्ववान माणूस खालावला तरी नादानापेक्षा योग्यच ठरतो.
- पळणाऱ्यास एक वाट शोधणान्यास बारा वाटा – लबाडी करणे सोपे पण ती शोधणे
फार कठीण असते. - पदरी पडले पवित्र झाले – कोणतीही गोष्ट एकदा स्वोकारली तर तिला नावे ठेऊ नये.
- बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले – बोलण्याप्रमाणे कृती करणारा
वंदनीय ठरतो. - फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय – राजाचा चुकीचा न पटणारा आदेशही मान्य करावा लागतो.
- बोलाचाच भात बोलाचीच कढी – संगळ बोलणचं खर दुसर काहीच नाही.
- फुटका डोळा काजळाने साजरा करावा – दोष जेवढा झाकता येईल तेवढाच झाकावा.
- बापा परी बाप गेला आणि बोंबलतांना हात गेला – एखादी नुकसानीची भरपाई न
होता दुसरेच मोठे नुकसान होणे. - बाजारात तुरी भट भटणीला भारी – उगाचच कल्पनेचा आधार घेऊन भांडण करणे.
- बोलणाऱ्याचे तोंड दिसते पण करणाऱ्याची कृती दिसत
नाही – रागावणाऱ्याचे शब्द सर्वांना ऐकू येतात पण वाईट कृती करणाऱ्याचे कृत्य
कोणालाच चटकन दिसून येत नाही. - बुगड्या गेल्या पण भोके राहिले – उत्तम स्थिती गेली पण तिच्या खणा मागे
राहिल्या. - फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचणे – जेथे वैभव भोगले तेथेच वाईट दिवस.
- बैल गेला आणि झोपा केला – विशिष्ट वेळेची गोष्ट ही वेळ निघून गेल्यावर करणे.
- बाप से बेटा सवाई – वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार असणे.
- बाराभाईची शेती काय लागेल हाती – अनेक भागीदार झाल्याने खरे तर नफ्याऐवजी
नुकसान होते. - बडा घर पोकळ वासा – नाव मोठे पण लक्षण खोटे.
- बुडत्याला काडीचा आधार – संकटात दुसऱ्याचे थोडे साह्य सुध्दा महत्त्वाचे वाटते.
- फुल ना फुलाची पाकळी – पूर्ण मोबदल्याऐवजी थोडासा का होईना मोबदला देणे.
- बापाला बाप म्हणेना चुलत्याला काका कसा म्हणेल – जवळच्यांचा मान न ठेवणारा दुसऱ्याचा
मान का ठेवील. - म्हातारीने कोंबडे झाकले तरी उजाडायचे राहत नाही – जी गोष्ट व्हायचीच असेल व
ती होऊ नये म्हणून प्रयत्न केले तरी ती झाल्याशिवाय राहत नाही. -
आग सोमेश्वरी बेब रामेश्वरी – एकीकडे संकट आले असताना दुसरीकडे उपाय
करणे. -
दैव देते कर्म नेते – दैवाने लाभलेली गोष्ट वाईट वागणुकीमुळे टिकत
नाही. -
कोल्हा काकडीला राजी – क्षुद्र मनुष्य मामुली गोष्टीत खुश असतो.
-
खाई त्याला खवखवे – जो गुन्हा करतो त्याच्या मनात ते डाचत असते.
-
वट राजाची वागणूक कैकाड्याची – श्रीमंतीचा आव आणायचा पण
दारिद्र्यासारखे राहायचे. -
अति शहाणा त्याचा बैल रिकामा – वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा नुकसानकारक
ठरतो. -
उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगात थोडीशी कुवत असुन देखील जास्त दिमाख
दाखवणे. -
जशी देणावळ तशी धुणावळ – जसा पैसा द्याल तसे काम होईल.
-
दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसाच्या ठिकाणीही उणीवा असतात.
-
पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा – थोड्या मोबदल्यात जास्त काम करून घेणे.
-
आधी पोटोबा मग विठोबा – स्वार्थ साधून घेऊन दुसऱ्याला मदत करणे.
-
आंधळे दळते कुत्रे पोठ खाते – एकाच्या कामाचा दुसराच फायदा घेतो.
-
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – दुसऱ्याची वस्तू देतांना औदार्य दाखविणे.
-
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली – झाला तर फायदा,
तोटा तर नाहीच -
डोळ्यात केर आणि कानात फुंकर – रोग एक उपाय वेगळाच.
-
अति तिथे माती – कोणत्याही गोष्टी अतिरेक हानिकारक असतो.
-
आयजीच्या जीवावर बायजी उदार – दुसऱ्याचा पैसा खर्च करून स्वतः मोठेपणा
मिरवणे. -
अडला हरी गाढवाचे पाय धरी – वेळप्रसंगी मूर्खाची विनवणी करणे.
-
काना मागून आली अन तिखट झाली – मागून येऊन मोठेपण मिरवणे.
-
दही खाऊ का, मही खाऊ – हे करावे का ते करावे हे न कळणे.
-
नाचता येईना अंगण वाकडे – आपला दोष परिस्थितीवर टाकणे.
-
कोड्यांचा मांडा करून खाणे – मिळेल ते गोड मानून खाणे.
-
आगीतून फुफाट्यात – लहानातून मोठ्या संकटात पडणे.
-
एकादशीच्या घरी शिवरात्र येणे – संकटात आणखी संकट येणे.
-
अंथरून पाहून पाय पसरणे – ऐपतीच्या मानाने खर्च करावा.
-
तरुणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे – उलटा प्रकार आढळून
येणे. -
इच्छा तेथे मार्ग – प्रयत्न केल्यावर यश प्राप्ती होते.
-
रात्र थोडी सोंगे फार – थोड्या वेळात पुष्कळ काम करणे.
-
इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी अडचणीत.
-
कामापुरता मामा – गरजेपुरते गोड बोलणे.
-
खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी – विलासी जीवनाचीच निवड करणे.
-
नाव मोठे लक्षण खोटे – दिखावा मोठा, प्रत्यक्षात उलट परिस्थिती.
-
हाताच्या काकणाला आरसा कशाला – प्रत्यक्ष स्पष्ट असणाऱ्या गोष्टीस
पुरावा नको असतो. -
गोगलगाय आणि पोटात पाय – एखाद्याचे खरे वागणे न दिसणे.
-
खायला काल नि धरणीला भार – निरुद्योगी माणूस सर्वांनाच जड होतो.
-
झाकली मुठ सव्वालाखाची – मौज पाठवून स्वतःची लाज रखने.
-
घर ना दार देवळी बिऱ्हाड – बायको पोरे नसणारा एकटा मनुष्य.
-
घोडे मैदानाजवळ आहे – निकालाची वेळ जवळच आली आहे.
-
कणगीत दाना भिल उताणा – गरजेपुरते आहे म्हंटल्यावर उद्याची काळजी न
करणे. -
पाचामुखी परमेश्वर – पुष्कळ लोक बोलतात ते खरे.
-
सुतासाठी मणी फोडणे अयोग्यच – क्षुल्लक गोष्टीसाठी मौल्यवान वस्तुचा
नाश करणे चूक आहे. -
दाखवले सोने हसे मुल तान्हे – मौल्यवान वस्तूचे सर्वांना आकर्षण असते.
-
या बोटावरची थुंकी त्या बोटावर घेणे – बनवाबनवी करणे.
-
भीड भिकेची बहिण – भीड बाळगून उगाचाच नकार देऊ शकलो नाही तर शेवटी
आपल्यावर भिक मागण्याची वेळ येते. -
पाचही बोटे सारखीच नसतात – सर्व माणसांचे स्वभाव सारखे नसतात.
-
बाप दाखव नाही तर श्राद्ध कर – अपराध केला नाहीतर तसे सिद्ध करा किंवा
अपराध काबुल करा. -
घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते – आपल्याला कर्मानुसार भोगावे लागते.
-
कोळीला नारणी अनघर चंद्रमौळी – अत्यंत दारिद्रयाची अवस्ता येणे.
-
हा सूर्य हा जटाद्रथ – प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध
करणे. -
दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते पण जवळून तिचे
खरे स्वरूप कळते. -
आवळा देऊन कोहळा काढणे – शुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून
घेणे. -
सुंठीवाचून खोकला गेला – उपचाराशिवाय आजार गेला.
-
शेळी जाते जीवनिशी खाणारा म्हणतो आतड – एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या
श्रमाची त्यागाची किमत न करता त्यातील उणिवा काढणे. -
भुकेला कोंडा निजेला धोंडा – अगदी साधेपणाने राहणे.
-
चिंता परा ते येई घरा – दुसऱ्याचे वाईट चिंतले की ते आपल्यावरच उलटते.
-
ताकास तूर लागू न देणे – कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता लागू न देणे.
-
प्रयत्नांती परमेश्वर – प्रयत्नाने कठीण गोष्टही साध्य होते.
-
पुढे तिखट मागे पोचट – दिसायला मोठेपण प्रत्यक्षात नसणारे.
-
चोर सोडून संन्यासाला सुळी देणे – अपराधी सोडून न अपराध्याला शिक्षा करणे.
-
मेल्या म्हशीला मणभर दुध – एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे.
-
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही – अपार कष्टावाचून मोठेपण मिळत नाही.
-
हात ओला तर मित्र भला – फायदा असेपर्यंत सारे भोवती गोळा होतात.
-
मन जाणे पापा – आपण केलेले पाप आपल्याला निश्चितच समजते.
-
जावे त्यांच्या वंशाला तेव्हा कळे – दुसऱ्याच्या अडी अडचणीच्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही.
-
विटले मन आणि फुटले मोती साधत नाही – दुभंगलेली मन जोडली जाणे कठीण.
-
बावळी मुद्रा, देवळी निद्रा – दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर व्यक्ती.
-
लहान तोंडी मोठा घास घेणे – स्वतःच्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे.
-
भिकेची हंडी शिक्यास चढत नाही – हलक्या प्रतीच्या प्रयत्नांनी उच्च प्रतीचे साकार होत नाही
-
नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे – एखाद्यास लुटून दुसर्याची भर करणे.
-
नावडतीचे मीठ अळणी – नावडत्या माणसाचे सर्व दोषयुक्त वाटणे.
-
लेकी बोले, सुने लागे – एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
-
तळे राखील तो पाणी चाखील – कामगिरीतून फायदा वठविणे
-
वासरात लंगडी गाय शहाणी – अज्ञानी लोकांत शिकलेला शहाणा ठरतो.
-
दृष्टीआड सृष्टी – आपल्या डोळ्याआड घडलेली गोष्ट.
-
बुडत्याचा पाय खोलात – हरणारा अधिक हरत जातो.
-
घरोघरी मातीच्या चुली – सर्वत्र सारखी परीस्थिती असणे.
-
साखरेचे खाणार त्याला देव देणार – चांगल्या इच्छा करणाऱ्याला चांगलेच मिळत राहणार.
-
कुडी तशी पुडी – शरीराप्रमाणे आहार असणे.
-
नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा – नाव मोठे पण वागणूक कमी प्रतीची असणे.
-
चोराच्या मनात चांदणे – गुन्हा करणाऱ्याला अपराधी वाटणे.
-
उधारीचे पोते सत्वा हातरिते – उधार घेतलेल्या गोष्टी ठरेलालाच.
-
भाकरी असा ताका नोकरी नाका – थोडे खायला असल्यावर जास्तीसाठी कष्टाची तयारी नसणे.
-
अधिक सुन पाहुण्याकडे – अधिक सवलतीचा अधिक कामासाठी उपयोग करणे.
-
थेंबे थेंबे तळे साचे – छोट्या साठ्वनितून मोठा संग्रह होतो.
-
सरड्याची धाव कुंपणापर्यंत – कमजोर माणसाचे काम मर्यादित असते
-
दुभत्या गायीच्या लाथा गोड – फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे.
-
अहो रुपम अहो ध्वनि: – स्वता:त उणिवा असलेल्या दोन व्यक्ती एकमेकांचे कौतुक करतात.
-
ज्याच हाती ससा तो पारधी – ज्याच्या हाती मेद्देमाल असतो, कार्याचे श्रेय त्यालाच मिळते.
-
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपलेच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होणे.
-
पायाला पंढरपूर आळशाला गंगा दूर – श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्त होत नाही.
-
आयत्या बिळावर नागोबा – दुसऱ्याच्या श्रमांचा फायदा उठवणे.
-
विशी विद्या तिशी धन – योग्य वयात योग्य ती कामे व कर्तुत्व करणे.
-
हाजीर तो वजीर – जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.
-
उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग – अतिशय उतावळेपणाने होणाऱ्या.
-
एक हाताने टाळी वाजत नाही – भांडणाचा दोष एक पक्षाकडेच असत नाही.
-
ऐकावे जनाचे करावे मनाचे – सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे.
-
दाम करी काम – पैशाने सर्व कामे साध्य होतात.
-
चढेल तो पडेल – उत्कर्षासाठी धडपडनाऱ्याला अपयश आले तर त्यात कमीपणा येत नाही.
-
कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात – क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही.
-
खान तशी माती – आई बाबा प्रमाणे मुले.