संधी व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | Sandhi V Tyache Prakar

संधी

आपल्या दैनंदिन जीवनात बोलताना किवा लिहिताना आपण अनेक शब्दांचा उपयोग करत असतो अशा शब्दांमध्ये काही जोड शब्द ही आपण वापरतो; अशा जोड्शब्दांमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळून त्या दोघांचा एक वर्ण तयार होतो त्यास आपण ‘संधी’ असे म्हणतो.

sandhi v tyache prakar, संधी व त्याचे प्रकार
संधी व त्याचे प्रकार

संधीचे साधारणपणे एकूण तीन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे

(१) स्वरसंधी

(२) व्यंजन संधी

(३) विसर्ग संधी

आता हे संधीचे तिनही प्रकार आपण सविस्तर पणे अभ्यासुया

(१) स्वरसंधी

एकमेकांच्या शेजारी येणारे वर्ण स्वर असतील तर त्यांना ‘स्वरसंधी’ असे म्हणतात.

स्वरसंधीचे उदाहरणे

 

पोटशब्द

जवळ येणारे स्वर व संधी

जोडशब्द

विद्या+अर्थी

आ+अ=आ

विदयार्थी

देवी+इच्छा

ई+इ=ई

देविच्छा

गंगा+उर्मी

आ+ऊ=ओ

गंगोर्मी

एक+एक

अ+ए=ए

एकेक

धारा+उष्ण

आ+उ=ओ

धारोष्ण

महीला+आश्रम

आ+आ=आ

महिलाश्रम

देव+ऋषी

अ+ऋ=अर

देवर्षी

वृक्ष+औदार्य

अ+औ=औ

वृक्षोदार्य

प्रति+एक

इ+ए=य

प्रत्येक

पितृ+आज्ञा

ऋ+आ=र+आ=श

पित्राज्ञा

(२) व्यंजन संधी

जेव्हा जवळ जवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास ‘व्यंजन संधी’ असे म्हणतात.

व्यंजन संधीचे उदाहरणे

पोटशब्द

जवळ येणारे स्वर व संधी

जोडशब्द

विपद्+काल

द्+क्=त्+क्=त्क्

विपत्काल

वाग्+ पति

ग्+प्=क्+प्=क्प्

वाक्पति

वाग्+ ताडन

ग्+त्=क+त्=क्त्

वाक्ताडन

षड्+ शास्त्र

ड्+श्=ट्+ श्=ट्श्

षट्शास्त्र

क्षुध्+ पिपासा

ध्+प्=त्+प्=त्प्

क्षुत्पिपासा

वाक्+विहार

क्+व्=ग्+व्+ग्व्

वाग्विहार

षट्+ रिपू

ट्+र्=ड्+र्=ड्र

षड्रिपू

अप्+ज

प्+ज्=ब्+ज्= ब्ज

अब्ज

षट्+मास

ट्+म्=ण्+म्

षण्मास

(३) विसर्ग संधी

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्यास ‘विसर्ग संधी’ असे म्हणतात.

विसर्ग संधी चे काही नियम आहेत ते पुढीलप्रमाणे

  • नियम १
विसर्गाच्या मागे अ हा स्वर असुन पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिळून त्याचा ओ होतो
उदा     यश: + धन = यश+उ+धन = यशोधन (विसर्गापुढे ध मृदू)
           मन: + रथ = मन+उ+रथ = मनोरथ
           अध: + वदन = अध+उ+वदन = अधोवदन
           तेज: + निधी = तेज+उ+निधी = तेजोनिधी
  • नियम २
विसर्गाच्या मागे अ या खेरीज कोणताही स्वर असेन पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो
उदा    नि:+रस = नि+र+रस = नि+रस = निरस (विसर्गाच्या पुढे र म्हणून इ दीर्घ)
          नि:+रव = नि+र+रव = नि+रव = निरव
          बही:+अंग = बही+र+अंग = बहिरंग
  • नियम ३
पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो
उदा    मन‍स् + पटल = मन:पटल
          तेजस् + कण = तेज:कण
  • नियम ४ 
पदाच्या शेवटी र् येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास त्या र चा विसर्ग होतो.
उदा    अंतर् + करण = अंत:करण
          चतुर् + सूत्री = चतु:सूत्री
  • नियम ५ 
विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो र तसाच राहून संधी होते.
उदा    पुनर् + जन्म = पुर्नजन्म
          अंतर् + आत्मा = अंतरआत्मा
  • नियम ६
विसर्गाच्या मागे अ हा स्वर असुन पुढे क् ख् प् फ् यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
उदा    प्रात: + काल = प्रात:काल
          तेज: + कुंज = तेजकुंज
          इत्: + उत्तर = इत्उत्तर
          अत्: + एव = अतैव
  • नियम ७ 
विसर्गाच्या मागे इ किंवा उ असुन पुढे क ख प फ यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष् होतो.
उदा    नि: पाप = निष्पाप
          दु: परिणाम = दुष्परिणाम
          दु: कृत्य =दुष्कृत्य
(अपवाद :- दु:+ख = दु:ख, नि: + पक्ष = नि:पक्ष)
  • नियम ८ 
विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श् होतो व त थ आल्यास स् होतो.
उदा    नि: + चल = निश्चल
          दु: + चिन्ह = दुचीन्ह
          मन: + ताप = मनस्ताप
          नि: + तेज + निस्तेज
नक्की वाचा !!
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top