नमस्कार विध्यार्थी मित्रमैत्रिणिनो आजच्या लेखामध्ये आपण मराठी व्याकरणामधील भाग व्याक्य आणि वाक्याचे प्रकार हा अभ्यासणार आहे. त्यामध्ये सुरवातीला आपण वाक्य म्हणजे काय हे बघूया त्या नंतर वाक्याचे किती प्रकार पडतात ते जाणून घेऊया त्या सर्व प्रकार सविस्तर पणे समजून घेऊन त्या सर्व प्रकारावरील उदाहरणेही बघूया. तर चला वेळ न करता सुरु करूया आजचा टॉपिक व्यक्य व त्याचे प्रकार(vaky ani tyache prkar)
वाक्य व त्याचे प्रकार |
वाक्य म्हणजे काय?
शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते.
म्हणजेच;
” जेव्हा शब्दांची रचना करून जो अर्थपूर्ण शब्दसमूह तयार होतो त्यास ‘वाक्य’ असे म्हणतात”
वाक्यांचे एकूण १२ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
(१) विधानार्थी वाक्य (vidhanarthi vakya)
ज्या वाक्यात केवळ एखादे साधे विधान केलेले असते त्यास ‘विधानार्थी वाक्य’ असे म्हणतात.
विधानार्थी वाक्याची उदाहरणे
तो खूप हुशार आहे.
तो जेवण करतो.
रमेश खूप काम करतो.
(२) प्रश्नार्थक वाक्य
ज्या वाक्यात एखादा प्रश्न विचारला असतो व प्रश्न कर्त्यास प्रश्न करताना काही उत्तर अपेक्षित असे तेव्हा त्यास ‘प्रश्नार्थक वाक्य’ असे म्हणतात
प्रश्नार्थक वाक्यांची उदाहरणे
संधी कोण बर सोडेल ?
तुम्ही कोठे गेला होता ?
(३) उद्गारवाचक वाक्य
ज्या वाक्यातील आनंद, आश्चर्य, दु:ख इ. पैकी एखादी भावना प्रकट झालेली असते व वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेले असते तेव्हा त्यास ‘उद्गारवाचक वाक्य’ असे म्हणतात.
उद्गारवाचक वाक्यांची उदाहरणे
शाब्बास ! चांगले गुण मिळाले तुला
अरेरे ! त्याला फारच लागले आहे
(४) होकारार्थी वाक्य
ज्या वाक्यातील क्रियापद हे होकारार्थी असते त्यास ‘होकारार्थी वाक्य’ असे म्हणतात. त्यालाच ‘करणरुपी वाक्य’ असेही म्हणतात
होकारार्थी वाक्यांची उदाहरणे
आज बाजारात फारच गर्दी होती.
ती मुलगी खूप देखणी आहे.
(५) नकारार्थी वाक्य
ज्या वाक्यातील क्रियापद हे नकारार्थी असते त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. यालाच ‘आकरणरुपी वाक्य’ असेही म्हणतात.
नकारार्थी वाक्यांची उदाहरणे
हे काही सोपे काम नाही.
तो हुशार मुलगा नाही.
आज क्रीडांगण मोकळे नव्हते.
(६) स्वार्थी वाक्य (Swarthi Vakya)
ज्या वाक्यातील क्रीयापदावरून फक्त काळाचाच बोध होतो व या वाक्यात स्वतःचाच असा मूळ अर्थ स्पष्ट होतो त्यास ‘स्वार्थी वाक्य’ असे म्हणतात.
स्वार्थी वाक्यांची उदाहरणे
सर्वजण समारंभासाठी एकत्र जमली.
मि चित्रपट पाहतो.
(७) आज्ञार्थी वाक्य
ज्या वाक्यातील क्रीयापदावरून आज्ञा, अनुज्ञा, विनंती, प्रार्थना, उद्धेश, अथवा आशीर्वाद देणे असा अर्थबोध होतो त्यास ‘आज्ञार्थी वाक्य’ असे म्हणतात.
आज्ञार्थी वाक्यांची उदाहरणे
मुलांनी नियमित अभ्यास करा.
परमेश्वरा त्याला चांगली बुद्धी दे.
(८) विधार्थी वाक्य
ज्या वाक्यातील क्रीयापदावरून शक्यता, योग्यता, कर्तव्य, इच्छा, आशा इ. अर्थबोध होतो त्यास ‘वीधार्थी वाक्य’ असे म्हणतात.
वीधार्थी वाक्यांची उदाहरणे
कृपया निरोप पोहोचवावा.
त्याने ते केलेले असेल.
जमेल त्याने ते काम करावे.
दररोज अभ्यास करावा.
(९) संकेतार्थ वाक्य
ज्या वाक्यातील क्रीयापदावरून अटीचा किंवा संकेताचा अर्थबोध तेव्हा त्यास ‘संकेतार्थ वाक्य’ असे म्हणतात
संकेतार्थ वाक्यांची उदाहरणे
तु जर हे काम केलेस तरच तुला पगार मिळेल.
जर तो आला तरच मि जाईन.
(१०) केवल वाक्य
ज्या वाक्यात एकच उदेद्श व एकच विधान असते त्यास ‘केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य’ असे म्हणतात.
केवळ वाक्यांची उदाहरणे
संजय परीक्षेत प्रथम आला.
संजय खेळत असतांना पडला.
(११) मिश्र वाक्य
दोन किंवा अधिक केवळ वाक्ये एकत्र येऊन तयार झलेल्या वाक्यास ‘मिश्र वाक्य’ असे म्हणतात. यातील एक वाक्य मुख्य व दुसरे वाक्य गौण असुन ते मुख्य वाक्यावर अवलंबून असते या वाक्यात जो-तो, ती, जेव्हा-तेव्हा, जर-तर, जसे, म्हणून, कारण वगैरे हे उभयान्वयी अव्यय जोडलेली असतात.
मिश्र वाक्यांची उदाहरणे
जे चकाकते ते सोने नव्हे.
जो अभ्यास करेल तोच पास होईल.
जेव्हा पासून पडला तेव्हा शेतकरी आनंदी झाले.
(१२) संयुक्त वाक्य
एका पेक्षा अधिक मुख्य वाक्य असतात व ती प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली असतात, तेव्हा त्यास ‘संयुक्त वाक्य’ असे म्हणतात.
संयुक्त वाक्यांची उदाहरणे
रेखा गावाला गेली आणि कामाला लागली.
संतोष नागपूरला पोहोचला पण त्याने फोन केला नाही.
देह जोवो अथवा राहो.
नक्की वाचा !!