नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण मधला शब्दसिद्धी व त्याचे प्रकार हा भाग बघणार आहे. या भागात आपण शब्दसिद्धी म्हणजे काय? त्यांचे प्रकार कोणते ते प्रकार कसे पडतात त्याचे सविस्तर विश्लेषण बघणार आहे. आणि ते पण अगदी सोप्या भाषेत सर्वाना समजेल असे !
शब्दसिद्धी व त्याचे प्रकार |
शब्दसिद्धी व त्यांचे प्रकार
आपल्या मराठी भाषेत असंख्य असे शब्द आहे त्या शब्दांचा स्वताचा एक अर्थ आहे. ते शब्द अक्षराचा मेल होऊन बनलेले असतात, ते शब्द कसे बनतात म्हणजेच ते कसे सिद्ध होतात त्यास आपण ‘शब्दसिद्धी’ असे म्हणतो.
आता या शब्दसिद्धी चे ७ मुख्य प्रकार पडतात; आपण आता ते सर्व प्रकार सविस्तर पणे अभ्यासुया
(१) तत्सम
संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजे ज्यांच्या रुपात काहीही फरक (बदल) न होता मराठी भाषेत आले आहे त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात.
तत्सम शब्दांचे उदाहरण
पुष्प, वन, जल, अंध, प्रीती, भीती, शिखर, कर, कविता, ग्रंथ, सूत्र, पृथ्वी, भूगोल, भगवान, मंत्र, परंतु, कार्य, अद्यापी, यथामती, कन्या, वृक्ष, पिता, धर्म, कवी, मधु, गुरु, लघु, पुत्र, सत्कार, शिशु, वृद्ध.
(२) तत्भव
काही संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रुपात बदल होऊन येतात त्यास ‘तत्भव शब्द’ असे म्हणतात.
तत्भव शब्दांची उदाहरणे
घर (गृह), हात(हस्त), गाव(ग्राम), चाक(चक्र), कान(कर्ण), पान(पर्ण), आग(अग्नी), दुध(दुग्ध), पाय(पद), भाऊ(भ्रात), सासु(स्वश्रू), सासरा(स्वसु), घास(ग्रास), कोवळा(कोमल).
(३) देशी
मराठीत काही शब्द असे आढळतात की ते तत्सम, तत्भव किंवा परीभाषीय नाहीत त्यांना ‘देशी शब्द’ असे म्हणतात.
देशी शब्दांचे उदाहरणे
गुढगा, ढेकुण, वांगी, झाड, दगड, डोके, पीठ, पोट, बाजरी, चिमणी, बोका, रेडा, खुळा, कंबर, लुगडे, जोडा, घोडा, डोळा, हाड, झोप.
(४) परभाषीय
संस्कृत सोडून इतर परकीय भाषातून मराठीत आलेले किंवा रूढ झालेल्या शब्दांना ‘परभाषीय शब्द’ असे म्हणतात.
परभाषीय शब्दांचे ११ प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे
(i) फारशी शब्द
अत्तर, अब्रू, पतलून, पेशवा, खाना, सामना, हकीकत, पोशाख, फौजू, पागा, लष्कर, स्वार, गोलंदाज, समशेर, तंबू, शामियाना, लगाम, खंदक, बुरुज, किल्ला, ईमारत, मखमल, चादर, राजाई, खुर्ची, नेज, पलंग, समई, पानदान, अगरबत्ती, अंगूर, किशमिश, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, डफ, ढोल, तबला, दिलरुबा, नगारा, शहनाई, कमल, दरबार.
(ii) अरबी शब्द
मंजुळ, मजबूत, मगरूळ, शाहीर, जाहीर, साहेब, अक्कल, हलवा, मिठाई, अर्ज, उर्फ, इनाम, खर्च, मेहनत इ.
(iii) पोर्तुगीज शब्द
बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेझ, इस्त्री, पपई, परात, पेरू, टिकाव, कर्नल, अननस, बिस्कीट, पुरावा, सबब, शिरबेज, शीर, बटवा, बंब, काडतूस, तुरुंग इ.
(iv) तेलगू शब्द
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी इ.
(v) कानडी शब्द
भाकरी, तूप, अक्का, अन्ना, कुंची, गाजर, उडीद, बुडीद, भांडे, अडकित्ता, खलबत्ता, ताई, विळी, चाकरी, पेटी, लवंग इ.
(vi) हिंदी शब्द
दाम, करोड, बात, दिल, बच्चा, और, भाई इ.
(vii) गुजराती शब्द
घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकामटेकडो इ.
(viii) इंग्रजी शब्द
मास्तर, स्टेशन, सायकल, बस, डॉक्टर, सर्कस, फाईल, फी, सिनेमा, टेलीफोन, रेडीओ, जेट इ.
(ix) काही मराठी शुद्ध शब्द
सुसृषा, दुर्वा, विवाह, मनस्थिती, धिक्कार, मतितार्थ इ.
(x) तुर्की शब्द
कालगी, बंदूक, कजाग इ.
(xi) तामिळ शब्द
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा इ.
(५) सामासिक शब्द
दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन बनलेल्या नवीन शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात.
सामासिक शब्दाची उदाहरणे
पोळपाट, ताटवाटी, नीळकंठ, श्यामवर्ण दारोदार इ.
(६) अभ्यस्त शब्द
अभ्यस्त म्हणजे त्या शब्दाची दुप्पट किंवा पुनरावृत्ती करणे
अभ्यस्त शब्दांची उदाहरणे
लाललाल, समोरासमोर, हळूहळू, जाडजूड, शेजारीपाजारी, हालचाल, ओळखपाळख, काळाबीळा, दगड्बिगड, आंबटचिंबट इ.
अभ्यस्त शब्दांचे तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
(i) पूर्णाभ्यस्त शब्द
एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोफ शब्द बनतो त्याला ‘पूर्णाभ्यस्त शब्द’ असे म्हणतात
पूर्णाभ्यस्त शब्दांची उदाहरणे
तीळतीळ, हालचाल, तुकडेतुकडे, कोणीकोणी, एकएक, हळूहळू, पुढेपुढे, मागोमाग, हायहाय, घरघर, लाललाल, मधूनमधून, समोरासमोर, वावा इ.
(ii) अंशाभ्यस्त शब्द
केव्हा केव्हा शब्द तसाच पुन्हा न येता त्यातील एखादे अक्षर बदलून व या बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो तेव्हा त्यास ‘अंशाभ्यस्त शब्द’ असे म्हणतात.
अंशाभ्यस्त शब्दांची उदाहरणे
शेजारीपाजारी, दाडबीड, बारीकसारीक, उरलासुरला, आडवातिडवा, अधिमुधी, अघळपघळ, दगडबिगड, गोडधोड, किडूकमिडूक, घरबीर, उद्याबिद्या, अक्कलहुशारी, अंमलबजावणी, दंगामस्ती इ.
(iii) अनुकरण वाचक शब्द
ज्या शब्दात एखादया ध्वनी वाचक शब्दाची पुनरुत्ती साधलेली असते त्यास अनुकरण वाचक शब्द असे म्हणतात.
अनुकरण वाचक शब्दांची उदाहरणे
बडबड, किरकिर, गुटगुटी, कडकडाट, गडगडाट, फडफडाट, कडकड, खदखदून, तुरुतुरु, लुटूलुटू, चूळचूळ, लडगड, वरवर इ.
(७) साधीत शब्द
सिद्ध शब्दापासून (जा, ए, बस, कर) करू, करता, करणारा, होकार, प्रतिकार यासारखे शब्द बनवितात त्यांना साधीत शब्द असे म्हणतात.
(i) उपसर्ग साधीत (घटीत) शब्द
मूळ धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधीत शब्द बनवितात त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. ही अक्षरे अव्यय रूप असुन धातूचा मूळ अर्थ फिरवितात. उपसर्ग हे स्वतंत्र पणे येत नाही. शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लावून जे शब्द तयार होतात त्यांना ‘उपसर्ग घटीत’ (साधीत शब्द) म्हणतात.
उपसर्ग साधीत शब्दांचे उदाहरणे
आहार, विहार, दुर्लभ, सुगम, सुगंध, प्रबल, प्रकोप, पराजय, निर्गत, पडछाया, निरोगी, नाउमेद, नाराज, बेजबाबदार, हररोज, सरदार, प्रगती, प्रहार, प्रसिद्ध इ.
(ii) प्रत्येय साधीत (प्रत्येय घाटीत) शब्द
शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून साधीत शब्द तयार होतात अश्या अक्षरांना ‘प्रत्येय साधीत’ असे म्हणतात. जन या धातुला प्रत्येय लावून जनक, जनता, जननी, हे शब्द तयार होतात. या शब्दांना ‘प्रत्येय साधीत शब्द’ असे म्हणतात.
प्रत्येय साधीत शब्दांची उदाहरणे
पाटीलकी, पेरणी, गाडीवान, गुलामगिरी, दादागिरी, उच्चेगिरी
चोर(अ), रक्षक(अ), वंदन(अन), कल्पना(अना), रमणीय(अनीय), कथा(आ), त्यागी(ई), रसिक(इक), भूत(त), श्रोता(ता), कर्तव्य(तव्य), स्तुती(ती), देय(य), गोदाई(आई), लढाऊ(आऊ), पुजारी(आरी), झोपाळू(आळू), चकचकीत(ईत), कोरीव(ईव), झंडू(ऊ), बसून(उन), भांडखोर(खोर), दळणवळण(आवळ), लिहिणारा(नारा) इ.
मूळ शब्दाला किंवा धातूला कंसातील प्रत्येय लागून तो प्रत्येय साधित शब्द तयार झाला आहे.