काळ व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | Tense And Its Type Marathi Grammar

काळ व त्याचे प्रकार:  नमस्कार विदयार्थी मित्रानो आज आपण मराठी व्याकरण मधील काळ हा विषय अभ्यासणार आहे. व्याकरण मधील काळ हा एक महत्वाचा विषय आहे कारण वाक्यातील काळाशिवाय आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ समजत नाही;  वाक्यातील काळाच्या बोधामुळे  क्रिया कधी घडली किवा घडते ते समजते म्हणून  मराठी व्याकरणात काळ हा विषय अभ्यासणे आवश्यक आहे, आज आपण या पोस्ट मध्ये काळ म्हणजे काय?, काळाचे एकूण प्रकार किती व कोणते, काळाचे उपप्रकार किती व कोणते  त्या सर्व प्रकार कोणत्या आधारावर पडतात हे सर्व काही सविस्तर उदाहरणासहीत बघणार आहे. तर चला सुरु करूया !!

kal v tyache prkar, tense and its types in marathi, kal v kalache prakar, काळ व त्याचे प्रकार, काळ मराठी व्याकरण, काळ व काळाचे प्रकार, मराठी व्याकरण काळ,
काळ व त्याचे प्रकार

काळ म्हणजे काय ?

एखाद्या वाक्यामध्ये ज्याप्रमाणे आपण क्रीयापादावरून आपल्याला क्रियेचा बोध होतो त्याचप्रमाणे आपल्याला वाक्यातील काळाचा (वेळेचा) बोध ज्या संकल्पनेवरून लक्षात येतो त्या संकल्पनेला आपण काळ असे म्हणतो.

साधारणतः वेळेच्या संकल्पनेवरून काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

(१) वर्तमानकाळ

(२) भूतकाळ

(३) भविष्यकाळ

 

(१) वर्तमानकाळ

वाक्यातील क्रीयापादावरून किंवा त्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘वर्तमानकाळ’ असे म्हणतात

उदा (१) तो पुस्तक वाचतो.

    (२) आम्ही क्रिकेट खेळतो.

    (३) तो गाणे गातो.

वरील तिन्ही उदाहरणावरून क्रिया आता घडत आहे हे लक्ष्यात येत आहे म्हणून हे वाक्य वर्तमानकाळाचे असल्याचे दिसून येत आहे.

वर्तमान काळाचे एकूण चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

(अ) साधा वर्तमानकाळ

(ब) अपूर्ण वर्तमानकाळ

(क) पूर्ण वर्तमानकाळ

(ड) रिती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

आता हे संपूर्ण प्रकार आपण सविस्तर पणे समजून घेऊया.

 

(अ) साधा वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असे समजून येते तेव्हा त्या वर्तमानकाळाला ‘साधा वर्तमानकाळ’ असे म्हणतात. 

उदा. (१) मी आंबा खातो.

    (२) कविता चहा पिते.

    (३) सुरेश टी.व्ही. पाहतो.

 

(ब) अपूर्ण वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदांच्या रूपावरून एखादी क्रिया वर्तमानकाळात अपूर्ण आहे किंवा वर्तमानकाळात सुरु आहे असा बोध होतो तेव्हा त्या वर्तमानकाळाला ‘अपूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) रमेश अभ्यास करीत आहे.

    (२) आई स्वयंपाक बनवत आहे.

    (३) राम पेपर सोडवत आहे.

 

(क) पूर्ण वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रीयापादावरून वर्तमानकाळातील क्रिया ही नुकतीच(आत्ताच)पूर्ण झालेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या वर्तमानकाळाला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) मी आंबा खाल्ला आहे.

    (२) सागर झोपला आहे.

    (३) रमेश ने अभ्यास केला आहे.

 

(ड) रिती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रीयापादावरून वर्तमानकाळात घडणारी एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत (पद्धत) दाखवली जाते तेव्हा त्या वर्तमानकाळाला रिती वर्तमानकाळ’ किंवा ‘चालू पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) रमेश रोज खेळायला जातो.

    (२) ओम दररोज अभ्यास करतो.

    (३) सुनील रोज व्यायाम करतो.

 

वर्तमानकाळाच्या या चार प्रकाराव्यतिरिक्त काही वर्तमानकाळाचे काही विसंगती (अपवाद) आहे ते पुढीलप्रमाणे

(१) ज्या वाक्यामध्ये नुकतीच झालेली क्रिया सांगताना जवळचा भूतकाळ सांगताना वर्तमानकाळाचा उपयोग केला जातो त्याला ‘संनिहित भूतकाळ’ असे म्हंटले जाते.

उदा. (१) मी जेवायला बसतोच तोच मामाचा फोन आला.

    (२) नाव घेताच अशोक हजर

 

(२) काही वाक्यात भूतकाळात घडलेल्या घटना जेव्हा वर्तमानकाळात सांगितल्या जातात तेव्हा त्याला ‘ऐतिहासिक वर्तमानकाळ’ असे म्हंटले जाते. ऐतिहासिक वर्तमानकाळाचा वापर सहसा गोष्टी किंवा पुराणिक कथा सांगण्यासाठी केला जातो.

उदा. (१) अर्जुन कृष्णाला म्हणतात.

    (२) मावळे शिवाजी महाराजांना म्हणतात.

 

(३) जेव्हा एखादे वाक्य हे अवतरण चिन्हामध्ये बोलले किंवा लिहिले जाते; तेव्हा त्याचा देखील बोध वर्तमानकाळासारखा केलेला दिसतो.

उदा. (१) डॉ. आंबेडकर म्हणतात,”शिका संघटीत व्हा, संघर्ष करा”

    (२) सुभाष चंद्र बोस म्हणतात,”तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा”

 

(४) जेव्हा एखाद्या वाक्यात त्रिकालाबाधित सत्य असलेल्या बाबी साध्या वर्तमानकाळात सांगितल्या जातात

उदा. (१) पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

(२) सूर्य पूर्वेला उगवतो.

(५)  एखाद्या वाक्यात आताच सुरु होणारी क्रिया दर्शविताना जेव्हा जवळच्या भविष्यकाळाचा वापर केला जातो तेव्हा त्यास ‘संनिहित भविष्यकाळ’ म्हणूनदेखील ओळखले जाते.

उदा. (१) तुम्ही पुढे निघा मी गाडीने येतो.

(२) तुम्ही खेळ सुरु करा मी देखील येतो.

(२) भूतकाळ

एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरून क्रिया ही पहिलेच घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात

उदा. (१) रामने जेवण केले.

(२) आरतीने सिनेमा बघितला.

वरील दोन्ही उदाहरण पहिले असता दोन्ही वाक्यात क्रिया ही घडून गेलेली आहे असा बोध होतो मानून हे वाक्य भूतकाळात मोडतात.

भूतकाळाचे देखील सर्वसाधारण पणे चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे.

(अ) साधा भूतकाळ

(ब) अपूर्ण / चालू भूतकाळ

(क) पूर्ण भूतकाळ

(ड) रिती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

आता या भूतकाळाचे उपप्रकार आपण सविस्तरपणे समजून घेऊया.

(अ) साधा भूतकाळ

एखाद्या वाक्यात क्रिया ही अगोदरच घडून गेलेली असते; त्या क्रीयेपाद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा त्यास ‘साधा भूतकाळ’ असे म्हटले जाते.

उदा. (१) सुरेशने सिनेमा पहिला.

(२) रामने पुस्तक वाचले.

(ब) अपूर्ण भूतकाळ / चालू भूतकाळ

एखाद्या वाक्याचा क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात जी क्रिया चालू होती किंवा ज्या गोष्टी बद्दल बोलत आहे ती गोष्ट घडत होती असा बोध होतो त्या भूतकाळाला ‘अपूर्ण भूतकाळ’ किंवा ‘चालू भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) रमेश आंबा खात होता.

(२) सुरेश क्रिकेट खेळत होता.

(क) पूर्ण भूतकाळ

जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरून एखादी क्रिया पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्यास ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) आम्ही सिनेमा पहिला होता.

(२) रमेशने अभ्यास केला होता.

(ड) रिती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असुन काही वेळा ती क्रिया पूर्णसुद्धा झालेली असते अशा काळाला ‘रिती भूतकाळ’ किंवा ‘चालू पूर्ण भूतकाळ’ असे म्हंटले जाते.

उदा. (१) राम दररोज ग्रंथालयात जात असे.

(२) आरती नियमित शाळेत जात होती.

भूतकाळाच्या प्रकाराच्या काही  विसंगती(अपवाद) पुढीलप्रमाणे

(१) कधी कधी एखाद्या वाक्यात चालू वर्तमान काळातील क्रिया पूर्ण होण्याच्या आधीच भूतकाळात बोलली जाते.

उदा. (१) ते पहा तुझे मामा आले.

वरील वाक्यात मामा येण्याची क्रिया चालूच असुन देखील वाक्य भूतकाळात बोलून क्रिया पूर्ण झाली असे दाखविल्या गेले आहे.

(२)  संनिहित भविष्यकाळ दर्शविण्यासाठी जसा वर्तमानकाळाचा वापर केला जातो तसाच भूतकाळाचा सुद्धा वापर केला जातो.

उदा. (१) तु अभ्यासाला बस, मी आलोच.

वरील उदाहरणामध्ये मी आलोच असे दर्शविले आहे पण तरी सुद्धा असे वाक्य हे ताबडतोब घडणाऱ्या क्रियेबद्दल वापरली जातात.

(३) एखादा संकेतार्थ असल्यास किंवा एकदा संभव असल्यास अशा वेळी देखील भूतकाळाचा उल्लेख केला जातो.

उदा. (१) अभ्यास केला असता तर नापास झाला नसता

वरील उदाहरणामध्ये एक विशिष्टप्रकारे संभव सांगितलेला दिसून येत आहे.

(४) एखादी क्रिया भविष्यामध्ये निश्चित होणार आहे या अर्थी नि:संशय भविष्यकाळ सांगितला जातो. त्यामध्ये भूतकाळाचा वापर झालेला दिसून येतो

उदा. (१) वर्गामध्ये मस्ती केली तर देशपांडे सरांनी शिक्षा केलीच म्हणून समज.

वरील वाक्यात वर्गामध्ये मस्ती केली तर देशपांडे सर शिक्षा करतातच याची खात्री दिसत आहे.

(३) भविष्यकाळ

वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे भविष्यात घडणार आहे असा बोध होतो अशा काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) मी इंजिनीअर बनेल.

(२) रमेश सिनेमाला जाईल.

वरील दोन्ही उदाहरणामध्ये पुढील घडणाऱ्या घटनांबद्दल बोललेले दिसून येत आहे म्हणून हे उदाहरणे भविष्यकाळात मोडतात.

सर्वसाधारणपणे भविष्यकाळाचे देखील चार उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

(अ) साधा भविष्यकाळ

(ब) अपूर्ण भविष्यकाळ / चालू भविष्यकाळ

(क) पूर्ण भविष्यकाळ

(ड) रिती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

आता हे चारही भविष्यकाळाचे उपप्रकार आपण सविस्तर पणे अभ्यासुया

(अ) साधा भविष्यकाळ

जेव्हा एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया पुढील काळात घडणार आहे असे दिसून येते अशा काळाला ‘साधा भविष्यकाळ’ असे म्हणतात

उदा. (१) उदया परीक्षा संपेल.

(२) राम आंबा खाईल.

(ब) अपूर्ण भविष्यकाळ / चालू भविष्यकाळ

एखाद्या वाक्याच्या क्रियापदाने दर्शवलेली कृती ही भविष्यकाळात चालू असते किंवा पूर्ण झालेली नसते तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ किंवा ‘चालू भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) राम आंबा खात असेल.

(२) सुरेश गाणे गात असेल.

(क) पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ही भविष्यकाळात असुन ती पूर्ण झाल्याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) राम ने आंबा खाल्ला असेल.

(२) मी इंजिनीअर झालेलो असेल.

(ड) रिती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखाद्या वाक्यातून क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल  असे दर्शिवले जाते तर त्या काळाला ‘रिती भविष्यकाळ’ किंवा ‘चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. (१) मी रोज शाळेत जात जाईल.

(२) नेहा रोज अभ्यास करीत जाईल.

भविष्यकाळातील काही विसंगती(अपवाद) पुढीलप्रमाणे

(१) जर एखाद्या वाक्यातून क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होत असेल तर या काळाचा वापर केला जातो

उदा. (१) उदया काय तो परीक्षेचा निकाल करेल.

(२) अशक्य गोष्ट असेल तर बऱ्याच वेळा भविष्यकाळाचा वापर केला जातो.

उदा. (१) एकदा पृथ्वीवर हिटलर आला पाहिजे.

(३) एखादा संभव दर्शविण्यासाठी देखील भविष्यकाळाचा वापर केला जातो.

उदा. (१) अभ्यास न केल्यामुळे देशपांडे सर विद्यार्थ्यांना शिक्षा करीत असतील.

(४) एखाद्या वाक्यात आपली एखादी इच्छा व्यक्त करण्यासाठी देखील भविष्यकाळाचा वापर केला जातो.

उदा. (१) राम नी नाटकात काम करायला पाहिजे होते.

(५) एखादया वाक्यात संकेत दर्शिविण्यासाठी देखील भविष्यकाळाचा वापर केला जातो.

उदा. (१) तुम्ही मदत कराल तर मी तुमचा आभारी राहील.

अश्या प्रकारे आपला आजचा विषय काळ व त्याचे प्रकार पूर्ण झाला या topic मध्ये आपण काळ म्हणजे काय?, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ या सर्वांचे उपप्रकार आणि या काळात असलेल्या काही विसंगती अभ्यासल्या आहे. अशाच नवनवीन पोस्ट साठी आपल्या  MPSC School या  ब्लॉग ला भेट देत जा चला पुन्हा भेटूया एक नवीन topic घेऊन नमस्कार !!

नक्की वाचा !!

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top