नमस्कार मित्रानो आज आपण भारताच्या इतिहासामधील इतिहासाची साधने हा टॅापिक बघणार आहे. भारताचा इतिहास म्हंटला की त्या मध्ये मुख्यत: तीन प्रकार पडले आहे ते म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आणि आधुनिक भारताचा इतिहास या तिन्ही कालखंडात आपल्या पूर्वजांनी काही संसाधने वापरले तयार केले आणि त्यांचा उपयोग देखील केला. आपण त्या संसाधनांचा अभ्यास केला असता आपले पूर्वज कसे होते ते कोणत्या साधनांचा उपयोग करत होते हे सर्व आपल्या लक्षात येणार आहे. तसेच त्या साधनांवरून आपल्याला त्यांचे राहणीमान त्यांचे संशोधन तसेच आपली इतिहासातील संस्कृती, चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य आपल्याला कळणार आहे. तर चला आज आपण आपल्या इतिहासाच्या साधनांबद्दल माहिती घेऊया
इतिहासाची साधने |
ज्या प्रकारे आपला इतिहास हा तीन भागात विभागला गेला आहे त्याच प्रमाणे आपल्या पूर्वजांची साधने देखील तीन प्रकारत विभागली गेली आहे. त्या तीन प्रकारचा आपण अभ्यास केल्यास आपल्याला पूर्णपणे कळेल की आपली संस्कृती काय होती आणि आपले पूर्वज आपल्या साठी काय बनवून गेले आहे किंवा आपल्यासाठी ते काय सोडून गेले आहे
इतिहासाच्या साधनांचे मुख्य तीन प्रकार पुढील प्रमाणे :
(१) भौतिक साधने
(२) लिखित साधने
(३) मौखिक साधने
आता या तीनही साधनांचा आपण अभ्यास करूया आणि ही तिन्ही साधने आपण सविस्तर पणे समजून घेऊया.
(१) भौतिक साधने
भौतिक साधनांचा विचार केला असता भौतिक साधनांमध्ये आपल्या पूर्वजांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येणाऱ्या वस्तू व त्या वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी या वरून त्यांनी उपयोगात आणलेल्या वस्तू कोणत्या काळातल्या असेल याचा अंदाज बांधता येतो. भौतिक साधनांमध्ये मुख्यत: भांडी, दागिने, धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे, घरांचे व इमारतीचे अवशेष विवध प्रकारचे नाणे, मुद्रा, पुतळे, स्मारके इत्यादींचा समावेश होतो. या सर्व साधनांवरून आपल्याला त्या काळातील बरीच माहिती मिळते
रंग व नक्षीदार भांडी दागिने या वरून आपल्याला त्या वस्तू कोणत्या काळातील असतील या गोष्टीचा अंदाज येतो.
धान्य फळांच्या बिया प्राण्यांची हाडे या वरून त्यांचा आहाराची पूर्णपणे आपल्याला माहिती मिळते
घरांचे व इमारतीचे अवशेष, वास्तू , पूल, रस्ते, पाणपोया राजवाडे, किल्ले, तुरुंग, इत्यादी वस्तू पासून आपल्याला त्या काळातील राहणीमान, न्यायालयीन व्यवस्था, दळणवळणाची साधने, इत्यादींची माहिती मिळते.
नाणे, मुद्रा यामुळे आपल्याला त्या काळातील व्यवहार व त्या काळातील शासक राजा महाराजे यांच्या विषयी माहिती मिळते.
पुतळे व स्मारके यांपासून आपल्याला त्याकाळातील राजे महाराजे त्या काळातील शासनकर्ते, न्यायव्यवस्था त्यांचे नाव जन्म-मृत्यू नोंद त्यांचे जीवनपट या विषयी आपण माहिती मिळवू शकतो.
(२) लिखित साधने
मानवजातीच्या निर्मितीच्या काळात अश्मयुगातील मनुष्याने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग व गोष्टी मुख्यत: चित्राद्वारे रेखाटून व्यक्त केल्या आहे व इतरांसमोर मांडल्या आहे. माणसाच्या उत्पत्ती च्या हजारो वर्षानंतर मानवाला लिखित कला अवगत झाली. त्यापूर्वी माणूस प्रतिके, चिन्हे, यांचा वापर करत त्यानंतर त्या प्रतिके आणि चीन्हांपासून मानवाला लिखित कला अवगत झाली.
सुरुवातीच्या काळात मानव हा खापरे, कच्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे या सारख्या साधनांच्या मदतीने लिखाण करत असे. जसे जसे अनुभव आणि ज्ञान मिळत गेले तसे तसे लिखाणपद्धतीत सुधारणा होत गेली. काही कालांतराने प्रवास वर्णने, दरबाराचे निर्णय, सामाजिक घटना, व्यवहारिक घटना,वृतांत लिहून ठेवण्याची सुरवात झाली. काही काळानंतर अनेक वाड्मयाचे प्रकार तयार होऊन ग्रंथ, गोष्टी, नाटके, काव्ये, वृत्तपत्रे, नियतकालिके, आराखडे, नकाशे सारखे लिखानकाम सुरु झाले. या सर्व गोष्टींमुळे त्या त्या काळातील इतिहास समजण्यास आपल्याला मदत होते . म्हणून या सर्व साधनांना आपण लिखित साधने म्हणून ओळखतो.
खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे, या सर्व गोष्टी अश्मयुगातील म्हणजेच प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील परिस्थिती समजण्यास आपल्याला मदत करतात
आधुनिक इतिहासात लेखन कामाची कला मानवाला पूर्णपणे अवगत झाली होती त्यामुळे माणूस वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, दस्तावेज, नकाशे, आराखडे या सारख्या गोष्टींचे लेखन करु लागला होता या सर्व लिखाणकामापासून आपल्याला त्यांचे राहणीमान, त्यांची संस्कृती, त्यांची अग्रलेख, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे ज्ञान आपल्याला होते. तसेच त्या काळातील माहिती व इतर सांस्कृतिक, आर्थिक, व राजकीय घडामोडींचे दर्शन आपल्याला होते.
(३) मौखिक साधने
मौखिक साधने म्हणजे अशी साधने जी ना कुठे लिहिल्या गेली आहे ना कोणी तयार केली याचा पुरावा आहे ती फक्त एका पिढी पासून दुसऱ्या पिढी ला तोंडी स्वरुपात शिकवल्या आणि पाठ करून देण्यात आली आहे.
अश्मयुगीन आणि मध्ययुगीन इतिहासात ओव्या, लोकगीते, लोककथा, बुद्ध व जैन साहित्य, अनेक धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीती ही मौखिक साधने म्हणून ओळखली जातात.
आधुनिक इतिहासात मानवाला सर्व कला अवगत होत्या त्यामुळे आधुनिक काळातील मौखिक साधनात स्फुर्तीगीते, पोवाडे, दृक-श्राव्य साधने, छायाचित्रे, ध्वनिमुद्रीते आणि चित्रपट या सारख्या आधुनिक साधनांचा समावेश होता
आजचा आपला इतिहासाची साधने हा टॉपीक पूर्ण झाला आहे या टॉपीक मध्ये आपण इतिहासाची साधने कोणती व त्यांचे प्रकार कोणते आहे हे सर्व अभ्यासले आहे. अशाच स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त अशा नोटस आणि टॉपीक आपण बघत असतो. माहिती आवडल्यास आपल्या ब्लॉग ला follow करा आणि काही प्रश्न असल्यास comment करायला विसरू नका. आपल्या www.mpscschool.in या ब्लॉग ला असेच भेट देत चला