हडप्पा संस्कृती |Harappa Sanskriti In Marathi

 आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील हडप्पा संस्कृती बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे. त्यात आपण
हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, त्या काळातील घरे, नगररचना,  लोकजीवन, धर्म, व्यापार आणि हडप्पा संस्कृतीची ऱ्हासाची कारणे या बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया, ही माहिती आपल्याला स्पर्धापारीक्षेसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. तर चला सुरुवात करूया आजचा topic हडप्पा संस्कृती.

हडप्पा संस्कृती, हडप्पा संस्कृती माहिती, हडप्पा संस्कृती वैशिष्ट्ये, hadappa sanskruti, hadappa sanskruti mahiti, hadappa sanskruti rhasachi karane, हडप्पा संस्कृती ऱ्हासाची कारणे
हडप्पा संस्कृती

हडप्पा संस्कृती माहिती

  • इ. स. १९२१ मध्ये पंजाब राज्यातील रावी आणि सिंधू नदीच्या काठी हडप्पा या शहरात उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्या मुळे या संस्कृतीला  ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव मिळाले.
  •  हडप्पा संस्कृतीचे बहुतांश अवशेष सिंधू नदीच्या काठी (किनाऱ्यावर) आढळून आल्यामुळे याला ‘सिंधू संस्कृती’ म्हणून देखील ओळखले जाते.
  • हडप्पा येथे
    झालेल्या उत्खननासोबतच हडप्पा शहराच्या दक्षिणेला काही अंतरावर सिंधू नदीच्या
    खोऱ्यात मोहेंजोदडो येथे झालेल्या उत्खननामध्ये देखील सारखेच अवशेष आढळून आले आहे.
  • हडप्पा संस्कृती ही
    मुख्यत: तत्कालीन भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मीर
    इत्यादी प्रदेशात विस्तारित पणे आढळून आली आहे.
  • हडप्पा संस्कृती
    मधील पूर्ण नागरीजीवन हे रावी नदी, सिंधू नदी, आणि सिंधू नदीच्या उपनद्या घागरा व
    सरस्वती या नद्यांच्या काठी वसलेले आढळून आले आहे.
  • हडप्पा
    संस्कृतीचा कालखंड साधारणतः इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो.
  • हडप्पा
    संस्कृतीचा उगम कसा झाला कुठून झाला याची स्थापना कोणी केली याबद्दल अजूनही माहिती
    उपलब्ध नाही. त्यावर आता पण शास्त्रज्ञांचे संशोधन सुरु आहे.
  • तत्कालीन
    भारताच्या विविध ठिकाणी मिळालेल्या हडप्पा संस्कृतीची अवशेष, वस्तू व वास्तू व
    त्यांची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सारखीच आढळून येतात.

हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये

(१) घरे आणि नियोजनबद्ध नगररचना

  • हडप्पा संस्कृतीतील
    घरे उच्च कुलीन आणि सामान्य भागात विभागून होती. ती सर्व घरे मुख्यत: भाजलेल्या
    विटांनी बांधलेली आढळून आली आहे. काही घरबांधकामामध्ये दगडाचा देखील वापर दिसून
    आला आहे.
  • हडप्पा संस्कृतीतील
    पूर्ण नगर रचना अशा प्रकारे दिसून आली आहे की सर्व घरांच्या मध्यभागी चौक आणि
    आजूबाजूला सर्व घरे प्रत्येक घराच्या अंगणात स्नानगृहे, शौचालये आणि विहिरी आढळून
    आल्या आहे.
  • हडप्पा संस्कृतीतील
    प्रत्येक नगररचनेमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची उत्तम सोय होती. पूर्ण शहरात
    भाजक्या विटांनी बनवलेली गटारे होती व ती पूर्ण पणे झाकलेली असत. या संस्कृतीतील
    लोक साफसफाई बद्दल किती जागरूक होते हे या वरून दिसून येते.
  • हडप्पा संस्कृतीत
    बहुतांश जागी सार्वजनिक ठिकाणांचा समावेश सुद्धा दिसून आला आहे. उदा सिधू नदीच्या
    खोऱ्यात मोहेंजोदडो येथे सार्वजनिक स्नानगृहे आणि धान्य कोठारे सुद्धा सापडली आहे.
    बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम व धार्मिक पूजा करण्यासाठी या ठिकाणांचा उपयोग होत
    असावा.
  • हडप्पा संस्कृतीत
    सुरक्षतेची देखील काळजी घेतली जायची त्यासाठी पूर्ण शहराच्या सभोवताली संरक्षक
    तटबंदी दिसून येते.
  • हडप्पा संस्कृतीतील
    रस्त्याची रचना या प्रकारे करण्यात आली होती की ते रस्ते एकमेकाला काटकोनात मिळत
    असत आणि घरासमोरील रुंद रस्ते शहराच्या मुख्य रस्त्यांना जोडलेली आढळून आली आहे.
    रस्त्यांच्या कडे वरील अवशेषांवरून दिसून येते की रस्त्यांच्या कडेला
    दिव्याबत्तीची सुद्धा सोय असावी
 

 (२)महास्नानगृहे

  • हडप्पा संस्कृतीत
    सार्वजनिक स्नानगृहे होती. 
    उत्खननामध्ये मोहनजोदडो येथे एका  महास्नानगृहाचे अवशेष सापडले. 
  • या स्नानगृहाची रुंदी
    ७ मीटर, लांबी १२ मीटर व खोली सुमारे २.५ मीटर मोजल्या गेली आहे. 
    याच्या बाहेरच्या
    भिंती जवळपास ८ फूट रुंदीची आहे. त्यात खाली उतरण्याची आणि पोशाख बदलण्याची देखील व्यवस्था होती.
  • महास्नानगृहाचे अंघोळीसाठी शुद्ध पाण्याची
    व्यवस्था होती तसेच सांडपाणी व्यवस्थापन देखील होते. हे तेथील उत्खननात दिसून आले
    आहे. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक स्वच्छता आणि आरोग्याविषयी किती जागरूक होते
    हे लक्ष्यात येते.
 

(३) मुद्रा, भांडी,
हत्यारे, कला, व तंत्रज्ञान

  • हडप्पा संस्कृतीतील
    कला आणि तंत्रज्ञान खूप प्रगत असावे. कारण त्या काळात त्यांनी मुद्रा भांडी
    हत्यारे बनवणे या सर्व कला व तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
  • हत्यारे बनवण्यासाठी
    ते प्रामुख्याने ब्राँझ आणि दगडांचा उपयोग करत असत.
  • मुद्रा बनवण्यासाठी
    त्यांनी मुख्यत: स्टीएटाईट या दगडाचा वापर केला होता. उत्खननामध्ये सापडलेल्या
    बहुतेक मुद्रा प्रामुख्याने चौरस आणि स्टीएटाईट या दगडापासून बनलेल्या आढळल्या
    आहे. सर्व मुद्रांवर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ, यांसारखे प्राणी बघायला
    मिळतात. त्याचप्रमाणे मनुष्याचीही प्रतिकृती मुद्रांवर आढळून येते.
  • हडप्पा संस्कृतीतील
    उत्खननामध्ये विविध प्रकारची आणि विविध आकाराची भांडी देखील सापडली आहे. भांडी
    बनविण्यासाठी चाकाचा वापर होत असे. या भांड्यांमध्ये लाल रंगाच्या भांड्यावर
    काळ्या रंगाने नक्षीकाम केलेली भांडी त्याच प्रमाणे माशांच्या खावाल्यापासून
    बनवलेली वर्तुळकार भांडी अश्या प्रकारची बरीच भांडी तेथे आढळून आली आहे
  • या काळातील
    उत्खननामध्ये विविध आभूषणे देखील सापडलेली आहे या काळातील आभूषणे मुख्यत: सोने,
    तांबे, रत्ने, त्याचप्रमाणे कवड्या, शिंपले यापासून बनलेली असत. आभूषणामध्ये पदरी
    माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या यांचा समावेश होता.
  • या काळातील मिळालेले
    पुतळे आणि कापडाचे अवशेष यांवरून असे लक्षात येते की या काळातील लोक कापड विनत असावेत.
    स्त्री आणि पुरुषांच्या पोशाखात गुढग्यापर्यंतच्या पोशाखाचा आणि दागिन्यांचा
    समावेश दिसून आलेला आहे.

 

(४) शेती, व्यापार आणि लोकजीवन

  • हडप्पा संस्कृतीतील
    लोकांचा शेती या प्रमुख व्यवसाय होता. शेती मध्ये ते प्रमुख्याने गहू, सातू,
    तांदूळ, राई, कापूस ही पिके घेत असे त्याचबरोबर वाटाणा, मसूर, तीळ ही पिके सुद्धा
    काढली जात असे.
  • हडप्पा
    संस्कृतीमध्ये बैल, म्हैस, शेळी, डुक्कर, गाढव, उंट यांसारखे प्राणी पाळल्या जात
    असत. त्याच बरोबर त्या काळात हत्ती, हरीण या प्राण्यांविषयी देखील त्यांना ज्ञान
    होते.
  • हडप्पा संस्कृतीतले लोक
    भारता सोबतच भारताच्या बाहेर सुद्धा व्यापार करत होते. सिंधु नदीच्या खोऱ्यात
    उत्तम प्रकारचा कापूस होत असे तो कापूस इजिप्त, पश्चिम आशिया, दक्षिण युरोप या
    सारख्या प्रदेशात निर्यात होत असे. हा व्यापार मुख्यत: जहाजाद्वारे अरबी
    समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. देशांतर्गत व्यापारासाठी जहाजाप्रमाणे
    बैलगाडींचा देखील वापर केला जाई.
  • हडप्पा संस्कृतीत
    मोजमापासाठी संपूर्ण प्रदेशात एकसारखीच उपकरणे उपयोगात आणल्या जायची. मोजमापासाठी
    विविध दगडांपासून बनवलेली मापे आणि उपकरनाचा वापर केला जात असे. त्यांच्या
    मोजमापात
    त दोराने उचलण्याच्या वजनापासून ते
    सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश दिसून येतो.
  • हडप्पा संस्कृतीमधील लोकांचा मुख्य आहार गहू होता पण ते पिकवत असलेले
    इतर पिके जसे तांदूळ
    , सातू, वाटाणा, यांचा देखील वापर आहारामध्ये करत असत. या काळातील लोक शेती बरोबर पशु पालन
    करत असल्या मुळे गाई म्हशीचे दुध व दुधापासून बनणाऱ्या पदार्थांचे सुद्धा ते
    आहारात घेत असे त्याच प्रमाणे त्या काळातील लोक मांसाहार देखील करत असे.
 

(५) धर्म, संस्कृती आणि समाज

  • हडप्पा संस्कृती मधील काळात शस्त्रांची कमतरता असल्या मुळे लोक
    मनमिळाऊ आणि शांतीप्रिय होते. त्यामुळे समाजात जातीभेद सारख्या कोणत्याच रूढी
    परंपरा चालत नव्हत्या. मात्र गुलामगिरीची प्रथा त्याकाळी चालत असे.
  • त्या काळात स्त्रियांचा आदर केला जाई स्त्रियांना समाजात मानाचे स्थान
    होते. स्त्रियांची देवता म्हणून पूजा केली जात असे.
     
  • स्त्रियांसोबतच त्या काळातील लोक नैसर्गिक शक्तीची देखील पूजा करत
    असत. पिंपळाचे झाड आणि एकशिंगी गेंडा या प्राण्यांची चित्रे उत्खननामध्ये
    दिसून आली आहे.
     
  • जाती धर्माबद्दल हडप्पा संस्कृतीमध्ये काहीही लिखित पुरावा उपलब्ध
    नाही तसेच मंदिरे किंवा इतर प्रार्थना गृहाचे देखील अवशेष उत्खननामध्ये आढळले
    नाही.
     
  • त्या काळात देखील मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती असे
    उत्खाननातून
      दिसून आले आहे.

 

हडप्पा संस्कृतीची ऱ्हासाची कारणे

ज्या प्रमाणे हडप्पा संस्कृतीची सुर्वातीबद्दल माहिती उपलब्ध नाही त्याच प्रमाणे तिच्या ऱ्हासाबद्दल कुठेच माहिती उपलब्ध नाही. शास्त्रज्ञांच्या संशोधनाप्रमाणे या संस्कृतीचा शेवट इ. पु. १५०० मध्ये झाला असावा.

संस्कृतीच्या ऱ्हासाची मुख्य कारणे म्हणजे भूकंप, महापूर, दुष्काळ हे असावेत. त्याच प्रमाणे परकीय टोळ्यांचे आक्रमण, नदी पत्रातील बदल आणि समुद्रपातळीतील बदल यामुळेही संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा.

 नदी पत्रातील कोरडी आणि पात्र बदला मुळे लोक मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित झाले. त्यामुळे हडप्पा संस्कृतीतील शहरे उजाड पडली.

त्याचप्रमाणे आर्यांचे आक्रमणामुळे देखील फरक पडला.

शिवाय हडप्पा संस्कृती मध्ये नियम व कायदा याची देखील कमतरतेमुळे देखील ऱ्हास झाला.

 

नक्की वाचा !!
इतिहासाची साधने 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top