विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Punctuation Mark In Marathi

नमस्कार विदयार्थी  मित्रमैत्रिनिनो आज आपण मराठी व्याकरण मधील विरामचिन्हे व त्याचे प्रकार हा विषय अभ्यासणार आहे. स्पर्धापारीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय खूप उपयोगी असा आहे.  या वर नेहमी वाक्य शुद्ध करा, वाक्य पूर्ण करा, विरामचिन्हांचा वापर करा यासारखे प्रश्न नेहमी विचारले जात असतात. आज आपण या लेखामध्ये  विरामचिन्हे म्हणजे काय ? , विरामचिन्हांचे प्रकार किती व कोणते , विराम चिन्हांचा वापर   हे सर्व विषय सविस्तर पणे समजून घेणार आहे.

विरामचिन्हे व त्याचे प्रकार, Punctuation Mark In Marathi, विरामचिन्ह, viram chinh in marathi
विरामचिन्हे व त्याचे प्रकार

 

विराम चिन्हे  | Viram Chinh In Marathi

 

विरामचिन्हांचा अभ्यास करताना सर्व प्रथम आपल्याला माहित असायला हवे की विरामचिन्हे म्हणजे काय ? हे समजणे सुरवातीला महत्वाचे आहे. आपण सर्व बोलताना किंवा वाचताना सर्व काही एकाच दमात बोलू किंवा वाचू शकत नाही. म्हणूनच आपण बोलताना विराम घेतो म्हणजेच वाक्य पूर्ण झालेल्या ठिकाणी आपण थांबतो त्यालाच आपण विराम असे म्हणतो. आणि तो विराम आपण ज्या चिन्हांनी दाखवतो त्या चिन्हांना आपण ‘विरामचिन्हे’ म्हणतो.

आपण लिहिताना किवा वाचताना कुठे थांबायचे किती वेळ थांबायचे, कोणत्या शब्दाला जास्त महत्व द्यायचे कोणत्या शब्दाला कमी महत्व द्यायचे हे सर्व आपल्याला लिहिताना व वाचताना विराम चिन्हांच्या मदतीनेच समजून येत असते. लिहिणाऱ्याच्या मनातील नेमक्या भावना काय ते आपल्याला विराम चिन्हांच्या मदतीने समजून येते.

विरामचिन्हांचे प्रकार

मराठी भाषेचा विचार केला असता मराठी मध्ये नऊ प्रकारची विरामचिन्हे आहे ती पुढीलप्रमाणे

(१) पूर्णविराम

(२) अर्धविराम

(३) स्वल्पविराम

(४) अपूर्णविराम

(५) प्रश्नचिन्ह

(६) उद्गारवाचक चिन्ह

(७) अवतरणचिन्ह

(८) संयोगचिन्ह

(९) अपसरणचिन्ह

आता या सर्व विरामचिन्हा बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया

(१) पूर्णविराम

एखादे वाक्य पूर्ण झाले असता विराम घेण्यासाठी पूर्णविराम या चिन्हाचा उपयोग केला जातो. तसेच एखाद्याच्या पूर्ण नावाला  संक्षिप्त रुपात लिहिण्यासाठी देखील पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो. पूर्ण विराम ( . ) या चिन्हांनी दर्शविला जातो.

उदा : (१) माझे काम पूर्ण झाले.

         (२) रमेशने पुस्तके आणली.

         (३) संदीपने जेवण पूर्ण केले.

         (४) गो. कृ. गोखले (गोपाळ कृष्ण गोखले)

(२) अर्धविराम

 एखाद्या वाक्याच्या मध्ये थोड थांबून वाक्य पूर्ण केल्या जाते अशा वाक्यात मध्ये थांबण्यासाठी अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. तसेच दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने किंवा साध्या पद्धतीने जोडण्यासाठी सुद्धा अर्धविरामाचा वापर केला जातो. अर्धविराम ( ; ) या चिन्हाने दर्शविला जातो.

उदा (१) मी स्टेशनवर गेलो होतो; पण रेल्वे मिळाली नाही.

      (२) राजेश सकाळी उठला; त्याने तयारी केली; आणि ऑफिसमध्ये गेला.

      (३) त्याने खूप अभ्यास केला; आणि त्याचे त्याला फळ मिळाले.

(३) स्वल्पविराम

एखादे वाक्य लिहिताना एकाच जातीचे अनेक शब्द लोगोपाठ लिहिण्यासाठी स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग होतो. एखाद्याला नामाने हाक देऊन संबोधल्या नंतर ही स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम ( , ) या चिन्हाने दर्शविला जातो.

उदा (१) आज बाजारात आलू, कांदे, लसन, कोबी, पालक व मिरची स्वस्त होते.

       (२) दिवाळीत आमच्या घरी लाडू, चिवडा, चकली,शंकरपाळे, शेव असे सर्व पदार्थ बनवतात.

       (३) मित्रानो, आज आपण सायंकाळी खेळायला जाऊया.

(४) अपूर्णविराम

एखाद्या वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील किवा एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असल्यास त्या तपशिला अगोदर अपूर्णविराम वापरतात. अपूर्णविराम ( : ) या चिन्हाने दर्शविला जातो.

उदा (१) हा पदार्थ करण्याच्या तीन पद्धती आहे :  (१)तळून  (२)भाजून (३)उकडून

       (२) या वर्षी अभ्यासाला चार विषय आहे :  भूगोल, इतिहास, मराठी, इंग्रजी

(५) प्रश्नचिन्ह

प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी किवा एखाद्या वाक्यात प्रश्न विचारायच्या असल्यास तो प्रश्न दर्शवण्यासाठी प्रश्नचिन्ह वापरले जाते. प्रश्नचिन्ह ( ? ) या चिन्हाने दर्शविले जाते.

उदा (१)  तु कुठे गेला होतास?

        (२)  तुझे नाव काय आहे?

        (३) भारतात एकूण किती राज्ये आहेत?

(६) उद्गारवाचक चिन्ह

एखाद्या वाक्यात आपल्या मनातील आनंद दुख, आश्चर्य या सारख्या  भावना व्यक्त करण्यासाठी  उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. तसेच  एखद्या वाक्यात केवलप्रयोगी शब्द वापरल्या नंतर त्या शब्द नंतर सुद्धा उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. उद्गारवाचक चिन्ह ( ! ) या चिन्हाने दर्शविले जाते.

उदा (१) अरेरे! किती जोरात पडला !

(२) अहाहा! काय प्रचंड धबधबा!

(३) बापरे! किती मोठा वाघ हा!

(७) अवतरणचिन्ह

अवतरण चिन्ह दोन प्रकारचे आहे. ( ‘ ‘ )  एकेरी अवतरण आणि ( ” ” ) दुहेरी अवतरण दोन्ही अवतरण चिन्हाचा उपयोग जवळपास सारखाच आहे एकरी अवतरण चिन्ह एखाद्या वाक्यातील महत्वाचा शब्द दाखवण्यासाठी करतात. तर दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग एखाद्याने सांगितलेले वाक्य जसे च्या तसे दाखवण्यासाठी करतात.

उदा (१) रिया म्हणाली, “पृथ्वी गोल फिरते”

(२) मराठी भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे.

(८) संयोगचिन्ह

एखाद्या वाक्यातील दोन शब्द जोडतांना किंवा परस्पर संबंधी शब्द लिहितांना संयोगचिन्ह याचा वापर केला जातो. संयोगचिन्ह ( – ) चिन्हाने दर्शविले जाते.

उदा (१) पती-पत्नी, राम-शाम, सीता-गीता

(२) रिक्षा-टॅक्सी यांचे भाडे फार वाढले आहे.

(९) अपसरणचिन्ह

बोलत असताना एखाद्या वाक्यात विचार मालिका तुटल्यास किंवा जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरणचिन्ह याचा उपयोग केला जातो.  अपसरणचिन्ह व संयोगचिन्ह जवळपास दिसायला सारखेच दिसतात या दोघांमध्ये फरक एव्हडाच असतो की अपसरण चिन्ह हे लांबीला संयोग चिन्हाच्या दुप्पट असते. अपसरणचिन्ह ( – ) या चिन्हाने दर्शविले जाते.

उदा (१) ते झाड-ज्याची फांदी खाली आहे ते आंब्याचे आहे.

(२) सुरेश-माझा चुलत भाऊ आहे.

आज आपण या पोस्ट मध्ये विरामचिन्ह म्हणजे काय, विरामचिन्ह आणि त्यांचे प्रकार, विरामचिन्हांचा उपयोग हे सर्व topic अभ्यासले आहे हा topic स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आयोगाच्या परीक्षेत यावर हमखास प्रश्न येत असतात. त्यामुळे या विरामचिन्हांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

 

                            नक्की वाचा !!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top