वैदिक काळ | Vaidik Kal In Marathi

 नमस्कार विदयार्थी मित्रानो आज आपण  प्राचीन भारताच्या इतिहासातील वैदिक काळ हा topic बघणार आहे. या मध्ये आपण वैदिक काळ म्हणजे काय, वैदिक काळाचे किती भाग पडतात व ते कोणते  हे सर्व अभ्यासणार आहे. या topic वर नेहमी स्पर्धापरीक्षांमध्ये आयोग प्रश्न विचारत असतो त्यामुळे वैदिक काळ हा एक महत्वाचा Topic आहे. तर चला सुरु करूया.

वैदिक काळ, Vaidik Kal In Marathi, Vedic Civilization, पूर्व वैदिक काळ, Purv Vaidik Kal Marathi, उत्तर वैदिक काळ, Uttar Vaidik Kal Marathi
वैदिक काळ


वैदिक काळ | Vedic Civilization

हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर काही कालांतराने जी संस्कृती उदयाला आली त्या संस्कृतीला आपण वैदिक संस्कृती किंवा आर्य संस्कृती या नावाने ओळखतो. आपल्याला  वैदिक  काळाची माहिती मुख्यत: वेदांमधून मिळते. सर्व वेदांमध्ये  ऋग्वेद सर्वात महत्वाचा वेद आहे कारण तो सर्वात प्राचीन आहे. ऋग्वेदामुळेच वैदिक काळाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली आहे. वैदिक काळ हा साधारणत: इ. पु. १५०० ते इ. पु. ५०० इतका  मानला जातो. शहरी हडप्पा संस्कृतीचा शेवट आणि उत्तर मध्य गंगेच्या  किनाऱ्यावर झालेले दुसरे शहरीकरणाच्या मधला काळ हा वैदिक काळ म्हणून मानला जातो. 

वैदिक काळाचे भाग | 

वैदिक काळाचे मुख्यत २ भागात विभाजन केले गेले आहे ते म्हणजे

(१) पूर्व वैदिक काळ

(२) उत्तर वैदिक काळ

(१) पूर्व वैदिक काळ | Purv Vaidik Kal Marathi

  • आर्य मुळचे मध्य आशिया  किंवा आशिया आणि युरोप खंडाच्या मध्यभागी म्हणजेचे युरेशिया येथून आल्याचे सिद्ध झाले आहे.
  • आर्य मुख्यत: भटक्या जमातीचे होते. मुख्य भर पशुपालानावर होता. त्यातही गायींना जास्त महत्व होते. गाय हे संपत्तीचे प्रतिक मानले जाई.
  • त्यांना शेतीचे ज्ञान असल्याचा ऋग्वेदात उल्लेख दिसतो.
  • आर्यांची जमत भटकी असल्याने भारतात अनेक टोळ्यांमध्ये व टप्प्याटप्प्याने आले.
  • काही इतिहासकारांच्या मते लढाऊ आर्यांनी नवशस्त्रांच्या आधारे भारतातील सुसज्य अशा हडप्पा संस्कृतीवर हल्ला करून जिंकून घेतले.
  • जिंकलेला प्रदेश म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान, व सिंधू नदीचे खोरे या भागात ते वास्तव्य करत असे.
  • आर्यांनी जय स्थानिकांना जिंकून घेतले त्यांना ते ‘दासू’ म्हंटले जाऊ लागले. दास हा शब्द आर्यांच्या सुरवातीला आलेल्या गटासाठी वापरला गेला.
  • आर्यांना घोडा ह्या प्राण्याचे ज्ञान असावे. म्हणजे वेगवान घोड्यांच्या वापरामुळे आणि चपळतेमुळे त्यांना स्थानिकांवर विजय मिळवणे शक्य झाले. त्यांनी ब्रांझ चा वापर शस्त्र म्हणून केला तसेच रथाचाही वापर केला.
  • पूर्व वैदिक काळात जमिनीच्या खाजगी मालमत्तेची संकल्पना अजून अस्तित्वात नव्हती.
  • आर्य हे जमात पद्धतीने रहात असत. या जमातीत चांभार, कुंभार, सुतार, लोहार इत्यादी कारागीर होते.
  • सिंधू व तिच्या उपनदी प्रदेशांचा सप्त सिंधवा असा उल्लेख आढळतो.
  • आर्य तांबे अथवा ब्राँझ ला  ‘आयस ‘ म्हणत होते.
  • राजकीय व्यवस्थेत जमातीच्या प्रमुखाला ‘राजन ‘ म्हणत. हे पद वंशपरंपरागत नव्हते. त्यासाठी निवडणुका होत असे. राजन कडे मर्यादित अधिकार होते.
  • राजनची निवड ही निवड समिती करत असे. राजनच्या मदतीला पुरोहित आणि सेनानी हे अधिकारी असत.
  • राजनकडे स्वतःची सेना नव्हती.
  • आर्यांच्या सभेला सभा, समिती, विदाथा, गण म्हटल्याचे ऋग्वेदात उल्लेख दिसून आला आहे. सामाजिक भेदभाव नव्हता, समता आधारित समाज व्यवस्था अस्तित्वात होती.
  • जमातीतील लोक स्वतः कर देत  ते बली असे म्हणत.
  • कुटुंब पद्धतीला ‘गृह’ असे म्हणत , जमातीचा आधार नातेसंबंध होता.
  • लग्न ही संकल्पना अस्तित्वात होती. विधवा विवाहास मान्यता होती. मात्र बालविवाहाचे उल्लेख आढळत नाही.
  • कुटुंबात पितृसत्ताक व्यवस्था होती, म्हणून पुत्र जन्मण्यासाठी कामना केली जात त्यासाठी ऋग्वेदात काही मंत्र म्हटले जात.
  • ऋग्वेदाच्या शेवटी चातुर्वर्ण व्यवस्थेचा विकास झाला त्यात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र ही व्यवस्था व्यवसायावर आधारित बनली.
  • अग्नी, इंद्र, वरुण, सोम, अदिती, उषा इत्यादी देवांचा उल्लेख आढळतो.
  • ऋग्वैदिक काळ म्हणजेच पूर्व वैदिक काळातील सर्वात महत्वाचा देव म्हणजे इंद्र होय. त्याला पुरंदर अर्थातच किल्ले उध्वस्त करणारा असे म्हंटले जायचे.
  • तसेच नैसर्गिक शक्तीचीही पूजा केली जात. मात्र पूजेचा मुख्य मार्ग म्हणजे यज्ञ होता.

(२) उत्तर वैदिक काळ | Uttar Vaidik Kal Marathi

  • ऋग्वेदाची निर्मिती फक्त पूर्व वैदिक काळात झाली मात्र इतर सर्व वेदांची निर्मिती उत्तर वैदिक काळात झाली.
  • या काळातील भारत आणि पुरू या मुख्य जमाती होय. या दोघांची मिळून ‘कुरु’ ही जमात बनली.
  • ज्ञात तांब्याच्या धातुबरोबर या काळात लोखंडाच्या वापरास सुरुवात झाली होती.
  • उत्तर वैदिक काळात शेती हा मुख्य व्यवसाय बनला. मात्र नांगरणीसाठी लाकडी नांगराचा उपयोग केला जात असे.
  • नंगारासाठी फळा, लंगाळा, अथवा सिरा इत्यादी शब्द वापरले जात होते.
  • लोखंडाचा उपयोग प्रामुख्याने शिकार करणे, झाडे तोडणे यासाठी केला जात असावा.
  • शेतीत गहू आणि तांदूळ ही मुख्य पिके होत असे.
  • जमातीच्या सभा, समितीचे महत्व कमी झाले, त्याची जागा जमातीच्या बलवान प्रमुखाने घेतली; तेच पुढे सत्ताधीश झाले.
  • स्त्रियांना सभेत स्थान राहिले नाही.
  • राजनचे पद वंशपरंपरागत झाले ते सक्तीने नियमित कर वसूल करत असे.
  • राजाने आपले महत्व वाढवण्यासाठी ‘राजसूय’ व अश्वमेध इत्यादी यज्ञ करण्यास सुरुवात केली.
  • राजाला मदतीसाठी सेनानी व पुरोहित होतेच मात्र त्यांनी खडे सैन्य बाळगले नव्हते.
  • वेदांच्या उत्पत्तीमुळे वर्णव्यवस्था कठोर बनली. त्यातील चौथ्या क्रमांकावरील शूद्राव्यतिरिक्त इतर तीन वर्णांचा संस्कार व गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार दिला होता.
  •  यज्ञांचे महत्व याच काळात वाढले. यज्ञात गायींना बळी दिली जात. यज्ञांमुळे ब्राम्हणांचे महत्व वाढले आणि त्याला पर्याय म्हणून जैन, बौद्ध धर्म उदयास आले.
  • या काळात मानवी जीवनाच्या चार आश्रमांचा संकल्पनेची सुरुवात झाली.

         (१) ब्रम्हचर्य  (२) गृहस्थ  (३) वानप्रस्थ  (४) सन्यास

  • उत्तर वैदिक काळात इंद्र व इतर देवांचे महत्व कमी होऊन पशुपती शिवा हे मुख्य देव बनले.

नक्की वाचा..!!

अश्मयुग व अश्मयुगीन कालखंड

0 thoughts on “वैदिक काळ | Vaidik Kal In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top