आपण आपल्या आजच्या लेखात वैदिक साहित्यांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम वैदिक साहित्य म्हणजे काय, ते साहित्य किती भागात विभागले गेले आहे त्या साहित्यांबाद्दल पूर्ण सविस्तर माहिती, त्याच बरोबर वेदांमध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद याबद्दल माहिती या नंतर उपनिषदे, ब्राह्मण्य, अरण्यके या सर्वांबद्दल माहिती बघणार आहे. त्याच बरोबर वैदिक साहित्यांमधील इतर साहित्य जसे वेदांग, उपवेद, पुराण, महाकाव्ये या बद्दल सुद्धा सविस्तर माहिती घेणार आहे. वैदिक साहित्य या भागावर स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारले जात असतात त्यामुळे आपल्याला याची माहिती असणे महत्वाचे आहे. तर चला सुरु करूया..
वैदिक साहित्य मराठी |
वैदक साहित्य म्हणजे काय ?
- वैदिक साहित्य म्हणजे थोडक्यात आपले प्राचीन काळातील वेद, ब्राह्मण्य, आरण्यके, आणि उपनिषदे यांसारख्या साहित्यांचा मेळ होय.
- वैदिक साहित्य हे एकमेव असे साहित्य आहे ज्याने हिंदू धर्माचा पाया रचला आहे आणि त्याच बरोबर आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीला प्रकाशात आणले आहे.
- वैदिक साहित्य हे संपूर्ण पणे संस्कृत मध्ये लिहिले गेले आहे. आणि हे साहित्य अतिशय समृद्ध असे साहित्य आहे.
- विद् या शब्दाचा अर्थ जाणणे असा होतो; त्यापासूनच ‘वेद’ हा शब्द तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’ असा होतो.
- वैदिक साहित्याला साहिंता किंवा श्रुती असेही म्हणतात.
- संपूर्ण वैदिक साहित्य प्राचीन काळापासून मौखिक पाठांतराच्या मदतीने जतन केले गेले आहे.
- वैदिक साहित्यामध्ये मुख्यत: ४ वेदांचा समावेश होतो. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या ४ वेदांवर पूर्ण वैदिक साहित्य आधारलेले आहे.
चला आता आपण या चारही वेदांबद्दल सविस्तर माहिती घेऊया
ऋग्वेद | Rugved In Marathi
- ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे वैदिक साहित्याची सुरुवात ऋग्वेदापासुनच झाली आहे.
- ऋग्वेद आणि इराण चा प्राचीनग्रंथ ‘अवेस्थ’ या ग्रंथांमध्ये खूप असे साधर्म्य दिसून येते.
- ऋग्वेद हे पूर्णतः काव्य स्वरुपात दिसून येते तसेच यात प्रामुख्याने मंत्रांचा समावेश आहे.
- ऋग्वेद हा पूर्णपणे ऋचानी बनलेला आहे ऋचा म्हणजे स्तुती या वेदामध्ये देवदेवतांची स्तुती पद्य स्वरुपात आढळतात.
- ऋग्वेदाच्या तिसऱ्या भागात गायत्री मंत्राचा उल्लेख येतो. गायत्री मंत्र विश्वमित्रांनी रचल्याचे मानले जाते. त्याच प्रमाणे सातव्या भागात दशराजन युद्धाबद्दल वर्णन आहे. हे विशिष्ट ऋषींनी लिहिल्याचे मानले जाते. दशराजन युद्ध ‘रावी’ नदीच्या काठी झाले होते.
- ऋग्वेदाच्या दहाव्या भागात पुरुषसुक्त या विषयचा उल्लेख दिसून येतो; त्यात चार वर्ण ते म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, आणि शुद्र यांचा उल्लेख आहे.
यजुर्वेद | Yajurved In Marathi
- हिंदू साहित्याच्या चार वेदांपैकी यजुर्वेद हा दुसरा वेद आहे.
- या वेदामध्ये यज्ञात म्हंटले जाणाऱ्या मंत्रांचा समावेश दिसून येतो.
- यजुर्वेद हा पद्य आणि गद्य दोन्ही प्रकार मिळून तयार झालेला ग्रंथ आहे.
- या वेदामध्ये यज्ञाच्या वेळेस उपयोगी येणारे मंत्र आणि त्यांचा उपयोग कसा करायचा याचे विस्तृत पणे वर्णन दिसून येते.
- या वेदामध्ये पद्य स्वरुपात असलेले मंत्रांचे वर्णन आणि स्पष्टीकरण गद्य स्वरुपात दिसून येते.
- पुरोहीतांसाठी यजुर्वेदात अध्वर्यू असा उल्लेख आढळतो.
सामवेद | Samved In Marathi
- हिंदूंच्या साहित्य रचनेतील तिसरा वेद म्हणजे सामवेद.
- ऋग्वेदमधील सर्व मंत्रांचे काव्यस्वरुपात मांडणी ही सामवेदात आढळून येते.
- प्राचीन काळात यज्ञाच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जात असे. त्या गायनाचे संपूर्ण मार्गदर्शन सामवेदात आढळते.
- भारतीय संगीत साहित्य निर्मितीमध्ये सामवेदाचा महत्वाचा वाटा आहे. संगीतामधील महत्वपूर्ण गंधर्ववेद हा सामवेदाचाच उपवेद आहे.
अथर्ववेद | Atharvaved In Marathi
- अथर्ववेद हा चारही वेदांमधील शेवटचा वेद आहे.
- या वेदाची रचना वेद ऋषी अथर्व आणि अंगिरस यांनी केली म्हणून या वेदाला अथर्ववेद असे नाव दिले गेले आहे.
- या वेदामध्ये अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टींचे महत्व समजून दिल्याचे आढळते.
- आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांशी सामना कसा करावा तसेच दुखाण्यावरील उपाय कसे करावे हे यात सांगितले आहे.
- तसेच अनेक औषधी वनस्पती बद्दलची माहिती राजाने राज्य कसे करावे या बद्दलचेही मार्गदर्शन यात केले गेलेले आढळते.
- या वेदात जादूटोणा आणि वाईट करण्यासाठीचे मंत्र देखील आढळतात.
- अथर्ववेदाला श्रेष्ठ वेद, ब्रम्ह वेद, भौतिक वेद, नवीन वेद आणि लौकिक वेद या नावांनी देखील ओळखले जाते.
या चारही वेदांच्या रचनेनंतर यांचे संपूर्ण स्पष्टीकरण आणि सविस्तर माहितीसाठी ब्राम्हणग्रंथ, आरण्यके, आणि उपनिषदे यांची रचना केली गेली. यांचाही समावेश वैदिक साहित्यामध्ये केला जातो. तर चला आपण आता या बद्दल थोडी माहिती घेऊया.
ब्राम्हणग्रंथ
- गद्यातील वेदांच्या विभाजनास ब्राम्हणग्रंथ असे म्हणतात.
- ब्राम्हणग्रंथ हा वैदिक साहित्याचा दुसरा भाग आहे. यामध्ये गद्य स्वरूपात देवता आणि यज्ञाचे स्पष्टीकरण देण्यात आले असून मंत्रांबद्दलही स्पष्टीकरण केले गेले आहे.
- ब्राम्हणग्रंथाची भाषा ही देखील संस्कृत आहे.
- यज्ञ विधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे यामध्ये सांगितले गेले आहे.
- प्रत्येक वेदाचे स्वतंत्र असे ब्राम्हणग्रंथ उपलब्ध आहे.
आरण्यके
- जंगलामध्ये जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन हे आरण्यक ग्रंथामध्ये मांडले गेले आहे.
- जंगलामध्ये यज्ञ करणे शक्य नसल्यामुळे जंगलामध्ये राहणाऱ्या ऋषीमुनी आणि लोकांसाठी तिथे करावयाचे कर्मकांड व मंत्र यामध्ये दिलेली आहे.
- वैदिक साहित्यामधील चार आश्रमांचा उल्लेख देखील यामध्येच सर्वप्रथम आला आहे. ब्रम्हचर्य, गृहस्थ, वनप्रस्थ, आणि सन्यास
- प्राचीन काळात बरीच आरण्यके असावीत परंतु सध्याच्या काळात एकूण ७ आरण्यके उपलब्ध आहे त्यामध्ये ऋग्वेदाची २, सामवेदाची २ आणि याजुर्वेदाची ३ आरण्यके उपलब्ध आहे. अथर्ववेदाचे एकही आरण्यक उपलब्ध नाही.
उपनिषदे
- वेदांचा अंतिम भाग असल्यामुळे उपनिषदांना वेदांत असेही म्हणतात.
- उपनिषदाचा अर्थ थोडक्यात गुरुंजवळ बसून त्यांचा कडून ज्ञान मिळवने असा होतो.
- वैदिक कर्मकांड आणि यज्ञांचे टीकात्मक परीक्षण करणाऱ्या ग्रंथांचा यामध्ये समावेश होतो.
- उपनिषदांची एकूण संख्या १०८ आहे असे मानले जाते त्यामधील १. ईश, २. केन, ३. कठ, ४. प्रश्न, ५. मुंडक, ६. मांडूक्य, ७. तैत्तिरीय, ८. ऐतरेय, ९. छांदोग्य, १०. बृहदारण्यक, ११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे आहे.
- सर्व उपनिषदांपैकी बृहदारण्यक हे सर्वात मोठे उपनिषद आहे.
- मांडूक्य उपनिषदातील महत्वाचे विचार सत्यमेव जयते, असतो मा सद्गमय, तमसो मा जोतीर्गमय, मृत्योर्मा अमृतं: गमय
वैदिक साहित्याला जोड असे इतर साहित्यांबद्दल आता आपण जाणून घेऊया या साहित्यांमध्ये वेदांग, उपवेद, पुराण, आणि महाकाव्ये यांचा समावेश होतो.
वेदांग
- सर्वसामान्यांना वेद समजावून सांगण्यासाठी उत्तर वैदिक काळात वेदांगाची निर्मिती केली गेली आहे.
- वेदांगला या काळात ६ भागात विभागले गेले आहे. १) शिक्षा २) कल्पसूत्रे ३) निरुक्त ४) व्याकरण ५) छन्दःशास्त्र ६) ज्योतिष
उपवेद
- वैदिक साहित्यामध्ये एकूण सहा उपवेद आढळून येतात. आयुर्वेद, धनुर्विद्या, गंधर्व, स्थापत्य, कला, अर्थशास्त्र.
पुराण
- जुने धर्म, चालीरीती, परंपरा, तत्त्वज्ञान, आणि साहित्य यांचे पुर्नारुज्जीवन करण्यासाठी लिहिलेल्या ग्रंथाना पुराण असे म्हंटले जाते.
- ही पुराने महर्षी व्यास मुनींनी लिहिली आहे असे म्हटले जाते.
- वैदिक साहित्यात एकूण १८ पूराणे आहे असे म्हंटले जाते. अग्नि पुराण, कूर्म पुराण, गरुड पुराण, नारद पुराण, पद्म पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण (देवीभागवत पुराण ), मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, वामन पुराण, वायु पुराण (शिव पुराण), विष्णु पुराण, स्कंद पुराण
महाकाव्ये
- रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्ये संस्कृत भाषेत असुन ते लिहिण्यासाठी ब्राम्ही लिपी वापरली आहे.
- १. रामायण : वाल्मीकींनी ५ ते १२ व्या शतकात केली असावी.
- २. महाभारत : महाभारत हे महर्षी ऋषींनी इ.स.पूर्व १० ते इ.स. ४ या शतकात निर्मिती झाल्याचे आढळते.
- ३ श्रीमद भागवत गीता : यात पहिल्यांदा वैष्णव धर्माचा उल्लेख आला आहे. महाभारताच्या युद्धभूमीवर कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश यात आहे.