प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | Voice And It’s Types In Marathi

 प्रयोग 

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणी किंवा रचना असते त्यालाच व्याकरणात ‘प्रयोग’ असे म्हणतात.

कर्ता : क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता असे म्हणतात.

कर्म : ही क्रिया ज्याच्यावर घडते त्यास कर्म असे म्हणतात.

prayog v tyache prakar
प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण

प्रयोगाचे एकूण ४ प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे ;

(१) कर्तरी प्रयोग

(२) कर्मणी प्रयोग

(३) भावे प्रयोग

(४) मिश्र किंवा संकर प्रयोग

आता आपण प्रयोगाचे संपूर्ण प्रकार सविस्तर अभ्यासुया.

(१) कर्तरी प्रयोग

जेव्हा कर्त्याची लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, तेव्हा त्या वाक्यारचनेस कर्तरी प्रयोग’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ :   तो आंबा खातो.

कर्ता

कर्म

क्रियापद

तो

आंबा

खातो

ती

आंबा

खाते

ते

आंबे

खातात

तु

आंबा

खातोस

        कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीचा आहे कर्म असल्यास प्रथमेचे किंवा द्वितीयेचे असते , व क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलते.
कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
(अ) सकर्मक कर्तरी प्रयोग
(ब) अकर्मक कर्तरी प्रयोग

(अ) सकर्मक कर्तरी प्रयोग :-

            ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते. त्यास ‘सकर्मक कर्तरी प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : मोहन पाणी आणतो.
                                        राखी पुस्तक वाचते.
                                        वासरू दुध पिते.
(ब) अकर्मक कर्तरी प्रयोग
            कर्म नसणाऱ्या कर्तरी प्रयोगास ‘अकर्मक कर्तरी प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : विद्यार्थी अस्वस्थ होते.
                                        कावळा उडाला.
                                        तु हसतोस.
                                        ती बोलते.

(२) कर्मणी प्रयोग 

            वाक्यात जेव्हा क्रियापद हे कर्माचे लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा त्या वाक्यरचनेस ‘कर्मणी प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ :

कर्ता

कर्म

क्रियापद

सुभाषने

पेरू

खाल्ला.

कुसुमने

पेरू

खाल्ला.

मुलांनी

पेरू

खाल्ला.

मोहनने

चिंच

खाल्ली.

मुलांनी

चिंचा

खाल्या.

कर्मणी प्रयोगात कर्ता नेहमी तृतीयेचा अथवा चतुर्थीचा असतो व कर्म हर नेहमी प्रथमेचे असते. या प्रयोगात सकर्मक किंवा अकर्मक हे दोन प्रयोग असणारच नाही, कारण कर्म असल्याशिवाय हा प्रयोग होणारच नाही.
कर्मणी प्रयोगाचे पुढीलप्रमाणे चार उपप्रकार पडतात.
(अ) प्रधान कर्तुक कर्मणी
(ब) शक्य कर्मणी
(क) प्राचीन किंवा पुराण कर्मणी
(ड) समापन कर्मणी
(इ) कर्म कर्तरी किवा नवीन कर्मणी

(अ) प्रधान कर्तुक कर्मणी

            ज्या प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो, त्यास ‘प्रधान कर्तुक कर्मणी’ असे म्हणतात.
                        उदाहरणार्थ : तिने गाणे म्हटले.
                                            मला हा डोंगर चढवतो.

(ब) शक्य कर्मणी 

            ज्या वाक्यात क्रियापदाने शक्यता सुचवलेली त्यास ‘शक्य कर्मणी प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : राम कडून काम करवते.

(क) प्राचीन किंवा पुराण कर्मणी

            प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातुला जे हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, केजे, वणीजेले, देईजे, अशी रूपे असतात, त्यास ‘प्राचीन किंवा पुराण कर्मणी’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : जो – जो किजो परमार्थ लाहो.
                                        नळे इंद्रास असे बोलीले.

(ड) समापन कर्मणी

            ज्या संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सुचीत केलेला असतो, अश्या प्रयोगाला ‘समापन कर्मणी प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : त्याची गोष्ट लिहून झाली.
                                        त्याचा आंबा खाऊन झाला.

(इ) कर्म कर्तरी किवा नवीन कर्मणी

            ज्या वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करावयाचे असते किंवा कर्ता स्पष्ट नसतो किंवा कर्त्याचा उल्लेख टाळावयाचा असतो व इंग्रजी भाषेतील पद्धती प्रमाणे कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून त्यांची रचना केली जाते, त्यास ‘कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : रावण रामाकडून मारला जातो.
                                        न्यायधिशाकडून दंड आकारण्यात आला.

(३) भावे प्रयोग

            वाक्यातील कर्त्याची अथवा कर्माची लिंग, वचन व पुरुष यांच्यात बदल केला तरीही क्रियापदाच्या रुपात काहीच बदल होत नाही त्यास ‘भावे प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ :

कर्ता

कर्म

क्रियापद

मुलाने

बैलास

मारले.

मुलीने

बैलास

मारले.

बायकांनी

बैलास

मारले.

मुलाने

गाईस

मारले.

मुलीने

गाईस

मारले.

बायकांनी

गाईस

मारले.

भावे प्रयोगात कर्ता तृतीयेचा अथवा चतुर्थीचा असतो. कर्म द्वितीयेचा असतो क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असते.
भावे प्रयोगाचे ३ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :
(अ) सकर्मक भावे
(ब) अकर्मक भावे
(क) भावे कर्तरी प्रयोग

(अ) सकर्मक भावे

            ज्या भावे प्रयोगात क्रियापद सकर्मक असते, म्हणजेच क्रियापदाबरोबर कर्म असते, त्यास ‘सकर्मक भावे प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : गवळ्याने गाईस बांधले.
                                        रामाने रावणास मारले.
                                        आईने मुलीस समजावले.

(ब) अकर्मक भावे 

            ज्या भावे प्रयोगात क्रियापद अकर्मक असते, म्हणजेच क्रियापदाबरोबर कर्म नसते तेव्हा त्यास ‘अकर्मक भावे प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : त्याने लवकर यावे.
                                        तिला मळमळते.

(क) भावे कर्तरी प्रयोग

            कधी कधी वाक्यातील क्रियापदांना स्वतंत्र असे कर्ते नसतात तेव्हा त्यांना ‘भावे कर्तरी प्रयोग’ असे म्हणतात. इथे क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असतो.
                    उदाहरणार्थ : पेरू खाल्ला की मळमळते.
                                        सहलीत जातांना राजगडच्या पायथ्याशी उजाडले.

(४) मिश्र किंवा संकर प्रयोग

            ज्या वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण (संकर) झालेले आढळते त्यास ‘मिश्र प्रयोग किवा संकर प्रयोग’ असे म्हणतात.
मिश्र किंवा संकर प्रयोगाचे एकूण ३ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
(अ) कर्तु  कर्म संकर
(ब) कर्तु भाव संकर
(क) कर्म भाव संकर

(अ) कर्तु कर्म संकर

            ज्या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाचे अस्तित्व आढळून येते त्यास ‘कर्तु कर्म संकर प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : तु मला पुस्तक दिलेस.
वरील वाक्यातील कर्त्याचे वचन तु ऐवजी तुम्ही केले तर तुम्ही मला पुस्तक दिले असे वाक्य तयार होईल व वाक्यातील कर्माचे वचन पुस्तक एवजी पुस्तके केले तर तुम्ही मला पुस्तके दिली हे वाक्य होईल म्हणून हा कर्तु कर्म संकर प्रयोग आहे.

(ब) कर्तु भाव संकर 

            ज्या वाक्यात कर्तरी व भावे या दोन्ही प्रयोगाचे अस्तित्व  आढळून येते त्यास ‘कर्तु भाव संकर प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : तु घरी जायचे होतेस.
वरील वाक्यातील कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष बदलून त्याने घरी जायचे होते, तिने घरी जायचे होते व त्यांनी घरी जायचे होते. ही वाक्ये तयार होतील म्हणजे भावे प्रयोग परंतु कर्त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही घरी जायचे होते म्हणजे वाक्यातील क्रियापद हे अंशत: कर्तरी आहे. म्हणून हा कर्तु भाव संकर प्रयोग आहे.

(क) कर्म भाव संकर 

            ज्या वाक्यात कर्मणी व भावे या दोन्ही प्रयोगाचे अस्तित्व आढळून येते त्यास ‘कर्म भाव संकर प्रयोग’ असे म्हणतात.
                    उदाहरणार्थ : वडिलांनी मुलाला शाळेत घातले.
या वाक्यात कर्ता हा तृतीया त आहे म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे जर  या वाक्यात कर्माचे लिंग व वचन बदलून पहिले तर जर मुलीला शाळेत घातली मुलांना शाळेत घातले अश्या प्रकारचे वाक्य तयार होईल म्हणून हा कर्म भाव संकर प्रयोग आहे.
नक्की वाचा !!

1 thought on “प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | Voice And It’s Types In Marathi”

  1. Pingback: विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Punctuation Mark In Marathi - mpscschool.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top