जीवनसत्वे व त्यांची संपूर्ण माहिती,प्रकार, स्त्रोत |Vitamins in Marathi


नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिनिनो आजच्या  लेखात मध्ये आपण विज्ञान विषयातील जीवनसत्वे टॉपिक अभ्यासणार आहे त्यामध्ये आपण सर्वप्रथम जीवनसत्वे म्हणजे काय हे बघूया जीवनसत्वाची व्याख्या बघूया त्यानंतर जीवनसत्वाचे प्रकार बघूया आणि शेवटी सर्व जीवन्सात्वाबद्दल सर्व माहिती तक्त्याच्या मदतीने थोडक्यात जाणून घेऊया. तर चला सुरु करूया आजचा टॉपिक जीवनसत्वे व त्यांची संपूर्ण माहिती

जीवनसत्वे व त्यांची संपूर्ण माहिती,Vitamins in Marathi
जीवनसत्वे व त्यांची संपूर्ण

जीवनसत्वे म्हणजे काय?

सर्व प्राण्यांच्या वाढीसाठी ज्याप्रमाणे कार्बोदके मेद आणि प्रथिने यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे काही विशिष्ट कार्बनी संयुगाची सुद्धा आवश्यकता असते त्याच कार्बनी संयुगांना जीवनसत्वे असे म्हणतात. मानवी शरीराला जीवनसत्वाची एकदम कमी प्रमाणात गरज असते जीवनसत्वे हे असे पदार्थ आहे जे मानवी शरीराच्या वाढीसाठी आणि जखमा दुरुस्त करणे, निरोगी हाडे व ऊती राखणे, रोगप्रतिकारक
शक्तीच्या योग्य कार्यासाठी आणि इतर जैविक कार्यांमध्ये 
मोठी भूमिका बजावते


अमेरिकी शास्त्रज्ञांना शोधा दरम्यान हे लक्षात आले की शरीरातील काही विशिष्ट घटकांच्या कमतरतेमुळे शरीराची कार्य करण्याची क्षमता कमी होते व शरीराची वाढ थांबते त्यावर उपाय शोधण्याच्या  प्रयत्नात 1912 मध्ये कॅसिमिर फुन्क यांनी जीवनसत्वाचा शोध लावला.

जीवनसत्वाचा विचार केल्यास जीवनसत्वे ही मुख्यतः सहा  आहे. ती म्हणजे जीवनसत्व अ, ब, क, ड, इ आणि के. आणि ब जीवनसत्त्वचे आणखी आठ प्रकार पडतात ते हणजे  ब1, ब2, ब3 ब5 ब6 ब7 ब9 ब12 ईत्यादी.
 जीवनसत्वांचे मुख्यतः २ प्रकार पडतात ते म्हणजे जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी),स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) आता आपण या दोन प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया.

जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी) | Water Soluble Vitamin

पाण्यात विरघळणाऱ्या जीवन्सात्वामध्ये मुख्यत: जीवनसत्व ब आणि क यांचा समावेश होतो. ह्या प्रकारामधली जीवनसत्वे प्राण्यांच्या शरीरात साठवली जात नाही. ह्या जीवनसत्वाचा जातीचा भाग हा लघवीद्वारे शरीराच्या बाहेर निघून जातो. म्हणून मानवी शरीराला ही जीवनसत्वे सतत घेणे आवश्यक असते.


स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) | Fat Soluble Vitamin

ह्या प्रकारतील जीवन्सात्वांमध्ये मुख्यतः जीवनसत्व अ, ड, इ आणि क या जीवनसत्वांचा समावेश होतो ह्या प्रकारातील जीवनसत्वे ही प्राण्यांच्या शरीरात साठवली जाऊ शकतात ही जीवनसत्वे शरीतील स्निग्ध(चरबी) पेशी आपल्या मध्ये शोषून घेतात आणि शरीराच्या आवश्यकतेनुसार शरीराला पुरवली जातात.


आता आपण सर्व जीवनसत्वांचे शास्त्रीय नावे, त्यांचे उपयोग आणि त्यांच्या कमतरते मुळे होणारे आजार या बद्दल जाणून घेऊया. त्यासाठी आपण पुढील तक्ता अभ्यासुया.

जीवनसत्वे  तक्ता


अ.क्र.

जीवनसत्व

शास्त्रीय नाव

जीवनसत्वाचा स्रोत

उपयोग

कमतरते मुळे होणारे आजार

 अ

रेटीनॉल

बटाटा, गाजर, भोपळे,
पालक, मांस आणि अंडी, टमाटे, यकृतआवळा,
सोयाबीन

अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे.

रातांधळेपणा येतो

ब१

थायामिन

कडधान्य, यीस्ट, यकृत,

चेतासंस्थेचे
आरोग्य

बेरीबेरी, भूक कमी होणे, वजन घटणे, पावले वाकडी होणे, हृदयाची गती कमी होणे, मेंदूवर परिणाम होणे,तोल जाणे

ब२

रायबोफ्लेविन

सर्व धान्य, दुग्धजन्य पदार्थ,
अंडी, यकृत, मांस,
शेंगदाणे

चयापचय
क्रियेकरिता, एटीपी पेशीतील श्वसन व वाढ
, पेशींची पुनर्रचना, पेशीदुरुस्ती

तोंडाच्या
कडांना चिरा पडणे
, जीभ लाल होऊन दाह होणे, नाक, डोळे व कान
यांच्या कडांभोवतीच्या त्वचेवर सूज येणे

ब३

नायसीन

दूध, टमाटे, उस,
यीस्ट, अंडी, मशरूम,
मासे, धान्य

त्वचा व केस

वल्कचर्म
(पेलाग्रा)
, लहान मुलांची वाढ खुंटणे, केस पांढरे

ब५

पॅन्टोथेनिक ऍसिड

चिकन, ब्रोकोली, शेंगा आणि सर्व धान्यांमध्ये

लाल
रक्तपेशींचे उत्पादन
, तसेच लैंगिक आणि तणाव-संबंधित संप्रेरकांची
निर्मिती

थकवा, निद्रानाश, नैराश्य, चिडचिड, उलट्या, पोटदुखी, पाय जळणे आणि
वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण.

ब६

पायरिडॉक्सिन

यकृत, पालेभाज्या, तृणधान्ये आणि
सोया उत्पादनांमध्ये

सामान्य
मेंदूच्या विकासासाठी
, मज्जासंस्था आणि रोगप्रतिकार प्रणाली निरोगी
ठेवण्यासाठी

हृदय व
रक्तवाहिन्यासंबंधी रोग
, सकाळचा थकवा, प्रीमेन्स्ट्रुअल
सिंड्रोम
, साइडरोब्लास्टिक अॅनिमिया

ब७

बायोटिन

हिरव्या पालेभाज्या, वाटाणा, तृणधान्ये, मोड आलेली तृणधान्ये, कोको, दूध, अंडे, कोंबडीचे मांस, यकृत

मज्जासंस्थेच्या
योग्य कार्यास प्रोत्साहन देते
, यकृत चयापचयसाठी देखील आवश्यक आहे

केस गळणे, डोळे, नाक, तोंड आणि
गुप्तांगांभोवती खवले
, लाल पुरळ.

ब९

फॉलिक ॲसिड किंवा फोलेट

तृणधान्ये,हिरव्या भाज्या,केळी व पालक

पेशीतील न्यूक्लिइक
आम्लांच्या संश्लेषणासाठी
,पेशीविभाजन होण्यासाठी, अस्थिमज्जेतील
रक्तपेशींच्या निर्मितीसाठी

अतिसार,हिरडया सुजणे,अस्थिमज्जेची
अभिवृद्धी
,रक्तक्षय व पांडुरोग

ब१२

सायनोकोबलामाईन किंवा कोब्रामाइड

यकृत आणि वृक्क, मासे, दुग्धजन्य पदार्थ

शरीराला
डीएनए तयार करण्यास मदत करते
, मेंदू आणि मज्जासंस्थेचे पोषण करते, निरोगी लाल
रक्तपेशी तयार करण्यास मदत करते

एट्रोफिक
गॅस्ट्र्रिटिस
, अपायकारक अशक्तपणा, क्रोहन रोग, सेलिआक रोग, बॅक्टेरियाची
वाढ किंवा परजीवी

१०

ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा एस्कॉर्बेट

लिंबे, संत्री, द्राक्षे,
कलिंगड, आवळे, स्ट्रॉबेरी,
केळी, अननस, सफरचंद,
हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये,
टोमॅटो, ओला वाटाणा, शेवग्याच्या
शेंगा
, कोबी, बीट  गाजर

संयोजी
ऊतीमधील कोलॅजेन तंतूंच्या निर्मितीसाठी
, प्रतिऑक्सिडीकारक
म्हणून कार्य करते

स्कव्र्ही, मनुष्याचे
वजन घटते
, थकवा येतो, सांधे सुजून दुखू लागतात, हाडे ठिसूळ
होतात व स्नायू कमजोर होतात
, हिरड्या सुजतात, रक्तस्राव
होतो

११

कॉलिकॅल्सिफेरॉल

मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे, शार्क व कॉड
माशांच्या यकृतापासून मिळविलेल्या तेलात

दात, हिरड्या, हाडे व
त्वचेचे आरोग्य

अस्थिचा
मृदुपणा
, दंतक्षय व त्वचा रोग, मुडदूस विकार

१२

टोकोफेरॉल

अंकुरित कडधान्ये करडई, शेंगदाणा, मका व सरकी यांच्या तेलात, डाळी, हिरव्या पालेभाज्यांमध्ये

निरोगी त्वचा
आणि डोळे राखण्यास मदत

आजारपण
आणि संसर्गापासून शरीराचे नैसर्गिक संरक्षणकरते

कमकुवत
स्नायू
, द्रवयुक्त सूज, पांडुरोग, स्नायूंची
वाढ खुंटते
, बिघडलेले प्रतिक्षेप आणि समन्वय चालण्यात अडचण

१३

के

नॅप्थोक्विनान

कोबी, फुलकोबी, टोमॅटो, पालेभाज्या, सोयाबीन,
अंड्याचा पिवळा बलक, माशांचे चूर्ण

रक्त
गोठण्यास मदत

रक्त गोठत
नाही


आजच्या  लेखात मध्ये आपण विज्ञान विषयातील जीवनसत्वे हा टॉपिक अभ्यासला. त्यामध्ये आपण सर्वप्रथम जीवनसत्वे म्हणजे काय हे बघितले जीवनसत्वाची व्याख्या बघितली त्यानंतर जीवनसत्वाचे प्रकार बघितले आणि शेवटी सर्व जीवन्सात्वाबद्दल सर्व माहिती तक्त्याच्या मदतीने सविस्तर पणे बघितली. अशा प्रकारे आपणला आजचा टॉपिक जीवनसत्वे व त्यांची संपूर्ण माहिती हा पूर्ण झाला.


संबंधित प्रश्नउत्तरे

प्रश्न१ जीवनसत्वे म्हणजे काय त्याचे दोन प्रकार लिहा?
उत्तर: सर्व प्राण्यांच्या वाढीसाठी ज्याप्रमाणे कार्बोदके मेद आणि प्रथिने यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे काही विशिष्ट कार्बनी संयुगाची सुद्धा आवश्यकता असते त्याच कार्बनी संयुगांना जीवनसत्वे असे म्हणतात. जीवनसत्वांचे मुख्यतः २ प्रकार पडतात ते म्हणजे जलविद्राव्य जीवनसत्वे स्निग्ध विद्राव्य जीवनसत्वे

प्रश्न२ जलविद्राव्य जीवनसत्वे कोणती?
उत्तर: जीवनसत्व ब आणि क ही जलविद्राव्य जीवनसत्वे आहे,

प्रश्न३ क जीवनसत्व अभावी होणारे रोग कोणते?
उत्तर: स्कव्र्ही, मनुष्याचे वजन घटने, थकवा येतो, सांधे सुजून दुखू लागतात, हाडे ठिसूळ होतात व स्नायू कमजोर होतात, हिरड्या सुजतात, रक्तस्राव होतो

प्रश्न४ रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणते जीवनसत्व महत्त्वाचे ठरते?
उत्तर: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणते के जीवनसत्व महत्त्वाचे ठरते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top