लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती | Latur District Complete Information In Marathi

 नमस्कार मित्र मैत्रिनिनो आजच्या लेखात आपण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती बघणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण लातूर जिल्ह्याच्या इतिहास बघणार आहे,त्यानंतर आपण लातूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती, लातूर जिल्ह्याच्या सीमा, लातुर जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तालुके किती व कोणते, जिल्ह्याची लोकसंख्या , वनक्षेत्र, नद्या, धरणे, हवामान, पिके या सर्वांबद्दल
माहिती घेणार आहे आणि शेवटी आपण लातुर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती बघणार आहे. तर चला सुरु करूया आजचा लेख लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती
| Latur District Complete Information In Marathi


latur jilha mahiti, latur jilha mahiti marathi, latur district information in marathi, लातुर जिल्ह्याची माहिती, लातुर जिल्हा माहिती pdf,
लातूर जिल्ह्याची माहिती

लातूर जिल्हा इतिहास

  •      लातूर जिल्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक
    यांचा सेमेवरचा जिल्हा आहे १५ ऑगस्ट १९८२ ला उस्मानाबाद या जिल्ह्याचे विभाजन होऊन
    लातुर जिल्ह्याची निर्मिती झाली
  •  लातूर जिल्हा हा एक प्राचीन जिल्हा
    आहे. इतिहासात राष्ट्रकुटांचे निवासस्थान अशी लातूर जिल्ह्याची ओळख होती. राष्ट्रकुट
    राजा अमोघवर्ष हा लतल्लुर म्हणजेच आताचे लातूर चा अधिपती होता.
  •  ऐतिहासिक काळात लातूर जिल्हा हा सम्राट
    अशोकाच्या साम्राज्याचा भाग होता; सम्राट अशोकाच्या मृत्यू नंतर सातवाहन घराणे
    सत्तेत आले आणि नंतर त्यांनी आपली राजधानी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या शहराला
    बनवली.
  •  सातवाहन घराण्याच्या काळात लातूर
    जिल्हा हा खूप समृद्ध असा जिल्हा होता.
  • लातूर जिल्ह्याचा उल्लेख पुराणातील
    महाकाव्य रामायणामध्ये महाराष्ट्राचा दक्षिण भाग दंडकारन्य म्हणून दिसतो.
 

लातूर जिल्हा भौगोलिक माहिती

  • लातूर जिल्हा भारतातील महाराष्ट्रातील मराठवाडा
    प्रदेशात आहे
    , जो
    दख्खनच्या पठारावर 17
    °52उत्तर ते 18°50उत्तर आणि 76°18पूर्व ते 79°12पूर्व दरम्यान आहे.
  • लातूर जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून सरासरी 631
    मीटर उंची आहे. संपूर्ण लातुर जिल्हा बालाघाट पठारावर असून समुद्रसपाटीपासून 540
    ते 638 मीटर अंतरावर आहे.
 

लातूर जिल्हा सीमा

लातूर जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी जिल्हा,
पूर्वेस आणि उत्तरेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस व
 पश्चिमेस उस्मानाबाद जिल्हा,
वायव्येस बीड जिल्हा असून आग्नेयेस कर्नाटक राज्यातील बीदर हा जिल्हा आहे.

 

लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ

लातूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७१५७ चौरस
किमी आहे. जिल्ह्याला पाच उपविभाग आणि १०
 तालुक्यांमध्ये विभागले आहे. २०११ च्या
जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यातील गावांची संख्या ९४८ एवढी आहे

 

लातूर जिल्हा तालुके

लातूरजिल्ह्यात एकूण १० तालुके आहे (१) लातूर (२) अहमदपूर (३) औसा (४) निलंगा (५) उदगीर (६) चाकूर (७) देवणी (८) शिरूर-अनंदपाळ
(९) जळकोट (१०) रेणापूर

 

लातूर जिल्हा लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार नुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२,५४,२९६ एवढी
आहे. त्यामध्ये शहरी लोकसंख्या
 ६,२४००० असून लातूर जिल्ह्याचा साक्षरता दर हा
७९.०३ % एवढा आहे. तसेच लातूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर ९२४/१००० असे आहे.

 

लातूर जिल्ह्यातील वनक्षेत्र

लातूर जिल्ह्याला अतिशय कमी वनक्षेत्र लाभलेले
आहे. लातूर जिल्ह्याचे वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या ०.१७ % एवढे आहे.

 

लातूर जिल्ह्यातील नद्या

लातूर जिल्हा हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो.
जिल्ह्यात येणारे पाणी मांजरा नदीतून येते. तावरजा
, तिरू, घरणी, मनार, रेणा या इतर प्रमुख नद्या लातूर जिल्ह्यात आहेत. मन्याड, लेंडी व तिरू या उत्तर पठारावरील ३
प्रमुख नद्या देखील लातूर जिल्ह्यात आहे.

 

लातूर जिल्ह्यातील धरणे

लातूर जिल्ह्यात सिंचनासाठी आणि दैनंदिन
वापराच्या पाण्यासाठी देनरगण
, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा
व तिरू ही प्रमुख धरणे आहेत.

 

लातूर जिल्ह्यातील हवामान

  • लातूरचे तापमान १३°से ते ४१°से (५५ ते १०६°फॅ) दरम्यान असते. आत्तापर्यंत
    नोंदवलेले सर्वोच्च तापमान ४५.६
    °से
    होते.
  • उत्तर भारताच्या पश्चिम व्यत्ययाच्या पूर्व
    प्रवाहासोबत आलेल्या थंड लाटांमुळे काहीवेळेस हिवाळ्यात क्षेत्र प्रभावित होते
    , व न्यूनतम तापमान २° ते ४°से  पर्यंत कमी होते.
  • जून ते सप्टेंबरच्या पावसाळ्यात बहुतांश पाऊस
    पडतो. पावसात ९ ते ६९३ मिलि प्रति महिना इतकी विविधता आहे. सरासरी वार्षिक पाऊस
    ७२५ म़िलि (२८.५ इंच) पडतो
    .

 

लातूर जिल्ह्यातील पिके

लातूर जिल्हा हा महाराष्ट्रातील कृषिप्रधान
जिल्हा म्हणून ओळखला जातो. 
लातूर जिल्ह्यात सुमारे ८०-८२ % टक्के लोक शेती करतात.
ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक
असून खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात ते घेतले
जाते. खरीप हंगामात ज्वारी
, कापूस, मूग, तूर, भात, भुईमूग इ. पिके घेतली जातात. तर रब्बी
हंगामात प्रामुख्याने ज्वारी
, गहू, हरभरा, करडई, जवस
ही पिके घेतात.

 

लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (लातुर जिल्ह्यातील पाहण्यासारखी ठिकाणे)

  • अष्टविनायक मंदिरलातूर

हे शिवाजी नगरमध्ये आहे. १९८९ मध्ये निर्मित हे
नवीन मंदिर त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे
, कारण तिथे
देवालयाच्या दोन्ही बाजूंस उद्यान आहे
, तसेच समोर काही कृत्रिम फवारे आहेत.
उद्यानात ८ ते ९ फूट उंचीची शिवमूर्ती आहे.

 

  • उदगीरचा किल्ला, उदगीर 

१७६१ च्या मराठा व हैदराबादी निजामांमधील
युद्धाचा साक्षी आहे. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वातील मराठा सेनेने निजामांचा
पराभव केला व उदगीरचा सधी झाला.. उदगीरचा किल्ला ४० फूट खोल खंदकाने वेढलेला आहे
,
कारण
किल्ला भूमी स्तरावर बांधला आहे. किल्ल्यात अरबी व फारशीत लिहिलेले काही दुर्मिळ
कोरीव लेख आहेत.

 

  • औसा किल्ला, औसा 

हा किल्ला सर्व बाजूंनी उंच प्रांगणाने वेढलेला
व खड्ड्यात आहे
, ज्यामुळे व्यक्ती याच्या उंच स्थानावरून दूर
अंततरावरून येणाऱ्या सेनेला पाहू शकतो. त्यावेळी जेव्हा किल्ल्याचा बहुतांश भाग
लपलेला राहतो. जवळपास चौकोनी आकाराचा
, किल्ला ३६.५८ मीटर रुंद खंदकाने किंवा
चराने वेढलेला आहे. हा चर कोरडा आहे.

 

  • केशव बालाजी मंदिर, औसा 

 हे मंदिर
औसाजवळ याकतपूर मार्गाजवळ आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर हे बांधले आहे.
हे मंदिर व शेजारील क्षेत्र खासगी संपत्ती आहे पण भक्त दर्शनासाठी व पर्यटनासाठी
तिथे जाऊ शकतो. किल्ल्यानंतर औसा नगरातील हे दुसरे आकर्षक स्थळ आहे. मंदिराजवळ
निवासी सुविधा उपलब्ध आहे.

मंदिर उतारांनी वेढलेले आहे. गणेश, शिव,
विठ्ठल,
रुक्मिणी
तसेच केशवानंद बापू यांना समर्पित चार वेगळी मंदिरे एकाच परिसरात आहेत. मंदिर
सकाळी ६ला उघडून रात्री ९ला बंद होते. दिवसभरात विविध सेवा होतात. सकाळी १० व
संध्याकाळी ७ वाजता अतिथींसाठी साधारण प्रसाद असतो. प्रत्येक शुक्रवारी महाप्रसाद
सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान असतो. हे मंदिर
धर्म व संस्कार
नगरी
प्रकल्पाचा भाग आहे.

 

  • खरोसा लेणी, निलंगा

लातुरपासून ४५ किमी अंतरावर हे लेण्यांचे लहान
गाव आहे. बुद्ध
, नरसिंह, शिवपार्वती,
कार्तिकेय
व रावण यांचा लेण्यांतील शिल्पांत समावेश होतो. इतिहासकारांच्या अनुसार या लेणी ६
व्या शतकात गुप्त काळात बनल्या. लेण्यांजवळ रेणुका मंदिर व पिरपाशा दर्गा आहे.

 

  • गंज गोलाईलातूर

गोलाई तालुक्याच्या केंद्रात आहे. नगर रचनाकार
फैजुद्दीनने गोलाई चौकाची रचना केली. १९१७ला निर्मित मोठी २ मजली रचना ही गोलाईची
मुख्य वास्तु आहे. वर्तुळाकार रचनेच्या केंद्रात अंबादेवीचे मंदिर आहे. या गोलाईस
जोडणारे १९ मार्ग आहेत व या मार्गांच्या बाजूंस सर्व प्रकारचेया पारंपरिक स्थानिक
दागिने
, पादत्राणे ‌व मिरची ते गुळापर्यंत अन्नपदार्थांचा बाजार आहे.
अशाप्रकारे
, गोलाई हे तालुक्याचे मुख्य वाणिज्य व व्यापार
केंद्र बनले आहे.

 

  • शेळगाव  

पाच गावांच्या सीमेवरील हे गाव चाकूर
तालुक्यातील मल्लप्पा शिव मंदिरासाठी विख्यात आहे. श्रावण महिन्यात शेळगावच्या
मल्लप्पा मंदिरात व डोंग्रज येथे संत अंबादास मंदिरात तीर्थयात्रा होते. या
यात्रेदरम्यान अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होते.

नागनाथ मंदिर, वडवळ, चाकूर

 

  • बुद्ध उद्यान  

मंदिरात विशाल बुद्धमूर्ती आहे.

 

  • लोहारा 

उदगीर तालुक्यातील गाव महादेव बेट
(टेकडी) व गैबीसाहेब बेटासाठी प्रसिद्ध आहे. निजामशाही वंशाच्या काळापासून बेनिनाथ
मठ अस्तित्वात आहे.

 

  • वनस्पती बेट, वडवळ 

ही टेकडी
दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी व वनस्पतींचे माहेरघर आहे. हे ठिकाण लातुरपासून ३९ किमी व
चाकूरपासून १६.५ किमी दूर आहे. टेकडी जमिनीपासून ६५० फूट (२०० मीटर) उंच व वडवळ
गावापासून तीन किलोमीटर दूर आहे.

 

  • विराट हनुमान, लातूर:

ही परिवार गृह संस्था, औसा मार्ग,
लातुर
येथे आहे. देवालयाची रचना इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे. उत्तम उद्यानाने मंदिर
आच्छादित आहे. मूर्ती २८ फूट उंच व शेदरी रंगाची आहे.

 

  • विलासराव देशमुख उद्यानलातूर

हे नाना नानी उद्यान होते. हे मध्यवर्ती ठिकाण
महानगरपालिकेजवळ आहे व आरामदायक वातावरणामुळे जनतेत प्रसिद्ध आहे. नागरिक इथे
सहपरिवार
, अपत्यांसहित व मित्रांसह वेळ घालवतात. येथे एक मुक्त सभागृह आहे.
उद्यानामध्ये सार्वजनिक बैठकांसाठी जागा आहे.

 

  • साई धाम, तोंडार

साई नंदनवन, चाकूर:
चाकूरजवळील आणखी एक पर्यटन स्थळ. ४०० एकर (१.६ चौ.किमी.) मध्ये पसरलेले आहे
,
इथे
आंब्याचा मळा
, जल उद्यान व मनोरंजन उद्यान आहे. उद्यानाच्या
केंद्रात एक सत्यसाईबाबा मंदिर आहे.

 

  • सिद्धेश्वर मंदिरलातूर 

हे देऊळ मुख्य नगरापासून दोन किलोमीटरवर आहे.
हे सम्राट
ताम्रध्वजाद्वारे निर्मित
व सोलापूरच्या सिद्धरामेश्वर स्वामीला समर्पित आहे. हे लातुरचे ग्रामदैवत आहे.
दरवर्षी इथे १५ दिवसांची जत्रा असते.

 

  • सुरत शहावली दर्गा

हा राम गल्ली, पटेल चौकात आहे.
हा लातुरचा भाग आहे. हा दर्गा १९३९ला मुस्लिम संत सैफ उल्लाह शाह सरदारींच्या
स्मरणार्थ बांधला गेला. त्यांना येथे पुरले. येथे जून-जुलैमध्ये ५ दिवसांची जत्रा
दरवर्षी असते.

 

  • हकानी बाबालातूर मार्ग,
    चाकूर

हत्ती बेट देवर्जन: उदगीरजवळच्या या ठिकाणी एका
लहान टेकडीवर संत गंगाराम यांची समाधी आहे. ह्या स्थानी काही कोरीव गुहा आहेत.. या
स्थानाने ज्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात प्राणाहुती दिली अशा अनेक
स्वातंत्र्य सैनिकांना जन्म दिला आहे.


 

 


अशाप्रकारे आपला आजचा लेख पूर्ण झाला. आपण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याची संपूर्ण
 माहिती बघीतली. त्यामध्ये सर्वप्रथम आपण लातूर जिल्ह्याच्या इतिहास बघितला. त्यानंतर आपण लातूर जिल्ह्याची भौगोलिक माहितीलातूर जिल्ह्याच्या सीमालातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळतालुके किती व कोणतेजिल्ह्याची लोकसंख्यावनक्षेत्रनद्याधरणेहवामानपिके या सर्वांबद्दल विस्तृत माहिती घेतली आणि शेवटी आपण लातुर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती बघितली. अशाप्रकारे आपला आजचा लेख पूर्ण झाला.

या लेखाबद्दल तुमचा प्रतिक्रिया नक्की द्या आणि या लेखात असलेल्या माहिती व्यतिरिक्त तुमचा जवळ लातुर जिल्ह्याबद्दल जास्तीची माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा आम्ही या लेखात ती समाविष्ट करू.

संबंधित प्रश्न उत्तरे

प्रश्न १ लातूर जिल्ह्यात किती तालुके आहेत

उत्तर : लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर,
चाकूर, देवणी, शिरूर-अनंदपाळ, जळकोट, रेणापूर असे एकूण १० तालुके आहे.

 

प्रश्न २ लातूर जिल्ह्याची निर्मिती केव्हा
झाली

उत्तर : १५ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद
जिल्ह्यापासून वेगळे झाल्यानंतर लातूर जिल्हा तयार झाला

 

प्रश्न ३ लातूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे

उत्तर : २०११ च्या जनगणनेनुसार नुसार लातुर
जिल्ह्याची लोकसंख्या ४२
,५४,२९६ एवढी आहे.

 

संबंधित लेख

जालना जिल्ह्याची माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top