महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असणारा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा म्हणून याची ओळख आहे. जालना जिल्हा हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात मोडत असून हा जिल्हा महाराष्ट्रातील लोकांच्या मनात एक श्रद्धेचे स्थान आहे. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेला हा जिल्हा मराठवाड्यातील एक प्रसिद्ध जिल्हा आहे. जालना जिल्हा हा पुर्वीच्या काळी निजामाच्या राज्याचा एक भाग होता; मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्हयामधील एक तालुका बनला. आणि त्यानंतर पुढे 1 मे 1981 रोजी तो जालना जिल्हा म्हणुन उदयाला आला. निजाम-उल-मुल्क असफ जहॉ याचे असे म्हणणे होते की, जालना शहर आरोग्यासाठी पोषक आहे. हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग या जिल्ह्यात आहेत.
जालना जिल्ह्याची माहिती मराठी |
जालना जिल्ह्याचा इतिहास
- जालना जिल्हा हा मुघल अकबर च्या काळामध्ये अकबरच्या एका अधिकाऱ्याची जहागीर होती.
- जालना जिल्ह्यामध्ये काही काळासाठी अबुल फजलने वास्तव्य केले होते अशी इतिहासामध्ये नोंद मिळते.
- निजाम-उल-मुल्क
असफ जहॉ याने १७२५ मध्ये काबिल खान याला आदेशीत करून या जालना शहरात किल्ला बांधण्यास सांगितले हेाते. तोच आज मस्तगड या नावाने ओळखला जातो. - मस्तगड
किल्यासोबतच बाले किल्ला देखील बांधला गेला होता. या बालेकिल्याचा आतील आणि
बाहेरील दरवाजा असफ जहॉंने स्वतः अनुक्रमे १७११ व १७२३ मध्ये बांधला होता. या
बालेकिल्यात पर्शियन भाषेत हा किल्ला कधी बांधला गेला याची दिनांक कोरलेला आहे. - जालना जिल्हा हा पूर्वीच्या काळात माती आणि विटांच्या भिंतीनी सर्व बाजूने सुरक्षित केले गेले होते; पण सध्याच्या काळात मात्र आता त्यापैकी फक्त मूर्ती आणि हैद्राबाद दरवाजेच राहिले आहे.
- जालना शहराचा जमीन महसुल
मराठे गोळा करीत असत. मात्र त्यात नेहमी बदल होत असे. बराच काळ इथे शिंदेच्या
पाठींब्यावर मराठे अधिकारावर होते. त्यानंतर १७६० मध्ये झालेल्या उदगीरच्या लढाई नंतर
पुण्यातील एका विरोधकाने सांगत हे ठिकाण ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. रक्तलांछीत
लढाईत पुण्याच्या सरदाराची फसगत झाली. मराठा सत्तेचे वर्चस्व
कमी झाल्यानंतर शेवटी हैद्राबादच्या निजामाकडे या ठिकाणाची सत्ता गेली होती.
जालना जिल्हा भौगोलिक माहिती
- भौगोलिक दृष्टीने विचार करता जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मध्यभागी असणारा जिल्हा आहे.
- जालना जिल्ह्याचे 95% क्षेत्र
गोदावरी खोऱ्यात आहे. जालना जिल्ह्याचा मुख्य भाग हा पूर्णा नदीच्या उपखोऱ्यात येतो. जिल्ह्याचा
दक्षिणेकडील भाग गोदावरी उप-खो-यात येतो. जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेकडील
जिल्ह्याचा एक छोटासा भाग तर तापी खो-यात येतो.या परिसराचा सामान्य उतार दक्षिणपूर्व दिशेने आहे. - जालना जिल्हा हा समुद्रसपाटीपासून
सरासरी 534 मीटर्स(ए.एम.एस.एल.) उंचीवर आहे.
जालना जिल्ह्याच्या भौगोलिक सीमा
जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे जळगाव, पूर्वेकडे परभणी जिल्हा, ईशान्येस बुलढाणा जिल्हा,
दक्षिणेस बीड जिल्हा, पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा आणि नैऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे.
जालना जिल्हयाचे क्षेत्रफळ
जालना जिल्हयाचे एकूण क्षेत्रफळ
7718 चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत 2.51 % आहे.
एकूण क्षेत्रफळाच्या 1.32 % म्हणजे 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व
उरलेले 98.68 % म्हणजे 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे.
जालना जिल्ह्यातील तालुके
जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन,जाफराबाद, परतूर, मंठा,बदनापूर, घनसावंगी. हे एकूण ८ तालुके आहे. या
आठ तालुक्याच्या आठ तहसिल करीता चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र
उपविभागीय कार्यालय जालना, अंबड, भोकरदन आणि परतूर येथे आहे.
प्रत्येक तहसिलस्तरावर एक तहसील कार्यालय आणि एक पंचायत समिती कार्यालय आहे.
जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली ८ पंचायत समित्या
कार्यरत आहेत.
या ८ तालुक्यांमध्ये एकूण ९७१ गावे आहे या गावामधील ९६३ गावात वस्ती असून ८ गावे ओसाड आहे.
जालना जिल्ह्यात ८०६ स्वतंत्र ग्रामपंचायती आणि १५७ गटग्रामपंचायती आहे.
जालना जिल्ह्याची लोकसंख्या
2011 च्या जनगणनेनुसार, जालना जिल्ह्यात एकूण लोकसंख्या १९,५८,४८३ एवढी आहे. आणि लोकसंख्येची घनता २५४ व्यक्ती/चौ.कि.मी. आहे
पुरुषांची लोकसंख्या १०,१५,११६ आणि स्त्रीची लोकसंख्या ९,४३,३६७ एवढी आहे. जिल्ह्यात स्त्री-पुरुष प्रमाण १०००/९३७ असे आहे.
जालना जिल्ह्याचा साक्षरता दर ७१.५२% असून पुरुष साक्षरता ८१.५३% आणि महिला साक्षरता ६०.९५% आहे.
जालना जिल्ह्यातील वनक्षेत्र
जालना जिल्ह्यातील नद्या
जालना जिल्ह्याच्या महत्त्वाच्या नद्या गोदावरी, पूर्णा व दुधना या असून, गिरजा, खेळणा, जीवरेखा, धामणा, दुधना, कल्याण या उपनद्या आहेत.
जालना जिल्ह्यातील प्रमुख धरणे
जालना
जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील जुई आणि धामना धरण, जालना तालुक्यातील कल्याण आणि पीरकल्याण
धरण, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा धरण , अंबड तालुक्यातील गल्हाटी धरण ही जिल्ह्यातील प्रमुख धरणे आहेत.
जालना जिल्ह्याचे हवामान
जालना हा जिल्हा समुद्र किनार्यापासून दूर आणि खंडांतर्गत स्थान
लाभलेल्यामुळे हवामान विषम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा खूप गरम असतो आणि हिवाळा खूप थंड असतो. एप्रिल-मे मध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते आणि दैनंदिन व वार्षिक तापमानातील फरक जास्त असतो. जालना जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. जिल्ह्यात सरासरी केवळ 45 सें.मी. एवढा पाऊस पडतो. त्यातही पावसाचे वितरण असमान आहे.
जालना जिल्ह्यातील प्रमुख पिके
ज्वारी हे जालना जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. या जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, कापूस, मूग, तूर, उडीद, भुईमूग ही पिके घेतली जातात आणि रब्बी हंगामात गहू, ज्वारी, ज्वारी, सूर्यफूल ही पिके घेतली जातात. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक मोसंबीचे उत्पन्न हे जालना जिल्ह्यात होते. जालन्यातील ज्या भागात सिंचनाची सोय आहे त्या भागात उसाची लागवड केली जाते. याशिवाय जिल्ह्यात डाळिंब, केळी, द्राक्ष ही बागायती पिके घेतली जातात.
जालना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
- जांबसमर्थ, घनसावंगी
- मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ
- मत्स्योदरी देवी मंदिर, अंबड
- गुरू गणेश तपोधाम
- श्री गणपती मंदीर, राजूर
- जालना किल्ला, जालना
- मोती तलाव
- छत्रपती संभाजी उद्यान, जालना
- घानेवाडी तलाव