औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती | All Information About Aurangabad District In Marathi

     नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिनिनो आज आपण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याबद्दल ची माहिती बघणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल या  टॉपिक मधील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. हा टॉपिक जवळ जवळ सर्वच स्पर्धापारीक्षेसाठी महत्वाचा ठरतो; तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य सेवा, STI,  या सारख्या परीक्षांमध्ये नेहमी या टॉपिक वर प्रश्न येत असतात त्यामुळे हा महत्वाचा टॉपिक ठरतो. तर चला वेळ न करता सुरु करूया आजचा टॉपिक  औरंगाबाद जिल्ह्याची माहिती (Aurangabad District Information In Marathi)

aurangabad jilhyachi mahiti, औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती, information about aurangabad district in marathi, aurangabad district information in marathi,औरंगाबाद जिल्ह्याची माहितीpdf,
औरंगाबाद जिल्ह्याची माहिती

देश आणि विदेशातील नागरिकांचे आकर्षण असलेला औरंगाबाद हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. औरंगाबाद येथील अजिंठा आणि वेरूळ लेण्या ह्या संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध अश्या आहे.आणि या सोबतच दौलताबाद किल्ला, बिबी का मकबरा,  घृष्णेश्वर मंदीर, ५२ दरवाजे, संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव, संत एकनाथांची कर्मभूमी यासारख्या ठिकाणांमुळे औरंगाबाद हा जागप्रसिद्ध जिल्हा बनला आहे. औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून देखील ओळखले जाते.

औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास (History of Aurangabad District In Marathi)

 • औरंगाबाद या जिल्ह्याचा उल्लेख हा सातवाहन आणि विक्रमादित्यांच्या  काळात देखील दिसून येतो.
 • औरंगाबाद जिल्ह्याचा उल्लेख हा इ.स. सातव्या शतकात या परिसराच्या उत्तरेकडे बुद्धलेणी आणि विहार निर्माण करण्यात आले. आणि त्या नंतरच्या शतकांमध्ये या परिसराला  राजतलक आणि राजतडाग या नावानेही औरंगाबाद जिल्ह्याचा उल्लेख  झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
 • 14 व्या शतकापर्यंत, या क्षेत्रावर देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचा सम्राट राजा कृष्णदेव रायाच्या वंशज यादवांचे राज्य होते. तो  काळ येथिल मोठा  भरभरातिचा काळ होता. देवगिरी हा या प्रदेशाचा सुवर्णकाळ होता.
 • औरंगाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव खडकी असे होते. अंदाजे १६०४ मध्ये मलीक अंबर याने या शहराची स्थापना केलेली दिसून येते. पुढे १६२६ मध्ये औरंगाबाद या शहराचे नाव खडकी बदलून फत्तेहपूर असे ठेवले गेले.
 • १६५३ साली जेव्हा औरंगजेब हा फत्तेहपूर येथे सुभेदार म्हणून आला तेव्हा त्याने फत्तेहपूर हे नाव बदलून औरंगाबाद केले. 
 • १७०७ मध्ये औरंगजेब याचा मृत्यू औरंगाबाद येथेच झाला. औरंगाबाद जिल्ह्याजवळच असणाऱ्या खुलताबाद या गावातच और्नाग्जेबाची कबर आहे.
 • शिवसेना प्रमुख स्वर्गिय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली होती. जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला.

औरंगाबाद जिल्ह्याची भौगोलिक माहिती (Geographical Information of Aurangabad District In Marathi)

 • औरंगाबाद जिल्हा हा प्रामुख्याने गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो आणि काही भाग तापी नदीच्या खोरेच्या उत्तर पश्चिमेला येतो. औरंगाबाद हा जिल्हा सामान्य खाली पातळी दक्षिण आणि पूर्व दिशेने आहे आणि उत्तर-पश्चिम भाग पूर्णा-गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. 
 • औरंगाबाद एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे १०,१०० चौ किमी एवढे आहे.
 • औरंगाबाद जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ३७,०१,२८२ एवढी आहे. त्यापकी सुमारे २०,८१,११२ एवढी लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील भाषा : औरंगाबाद जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची ३७,०१,२८२ लोकसंख्या आणि मुख्यतः मराठीहिंदीइंग्रजी आणि उर्दू भाषा बोलली जाते.
 • औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद, सिल्लोड, गंगापुर, पैठण, कन्नड, वैजापुर, फुलंब्री, खुलताबाद, सोयेगांव असे एकूण तालुके ०९ तालुके आहे. या तालुक्यांमध्ये एकूण १३४१ गावे असून एकूण ८६१ ग्रामपंचायती आहे.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील हवामान
  औरंगाबादमध्ये पावसाळी हंगाम जून ते सप्टेंबर- आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी-हिवाळी हंगाम आणि मार्च
  ते मे उन्हाळी हंगामापासून सुरू होतो. औरंगाबाद जिल्ह्याचे सरासरी पाऊस पडणे ७३४ मिमी आणि किमान तापमान ५.६ डी.सी. आहे. कमाल तापमान ४५.९ डीसी आहे.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील वनक्षेत्र : औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १३५.७५  चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैकी सुमारे ९.०३% वनक्षेत्र हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील पर्वत : औरंगाबाद जिल्ह्यात अँटूर, सटाऊन, अब्बासगड असे एकूण तीन पर्वत आहे. अँटूर पर्वताची उंची सुमारे ८२६ मीटर आहे. सटाऊन पर्वताची उंची सुमारे ५५२ मीटर आहे तर अब्बासगड या पर्वताची उंची ६७१ मीटर आहे. 
 • औरंगाबाद जिल्ह्यातील नद्या : औरंगाबाद
  जिल्ह्यातील मुख्य नद्या गोदावरी आणि तापी तसेच पूर्णा
  , शिव, खम आहेत. दुधा, गलहती आणि गिरजा या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील भाषा
  :
   
  औरंगाबाद
  जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची ३७
  ,०१,२८२ लोकसंख्या आणि मुख्यतः मराठी, हिंदी, इंग्रजी
  आणि उर्दू भाषा बोलली जाते.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील पीके : औरंगाबाद जिल्ह्यात प्रमुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मुग, ज्वारी, आणि गहू ही पीके घेतली जातात.
 • औरंगाबाद जिल्ह्याच्या
  भौगोलिक सीमा :
  औरंगाबाद जिल्ह्याच्या पश्चिमेस
   नाशिक, उत्तरेस जळगाव, पूर्वेस जालना आणि दक्षिणेस अहमदनगर आणि गोदावरी नदीच्या पलीकडे बीड ह्या जिल्ह्यांची सीमा आहे. औरंगाबाद शहर हे
  औरंगाबाद जिल्ह्याचे मुख्यालय व मुख्य शहर देखील आहे 

औरंगाबाद
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे (
Tourist Place In Aurangabad District In Marathi
)

 

वेरूळ लेणी :

औरंगाबाद शहरात वेरूळची एलोरा लेणी आणि गुफा मंदिरे आहेत. वेरूळ येथील कैलास लेणी आणि एलोरा लेणी ही जगप्रसिद्ध आहे. आणि  श्री घृष्णेश्वर हे बारावे आणि शेवटचे जोतिर्लिंग वेरूळ येथेच आहे. 

अजिंठा लेणी :

महाराष्ट्रातील अजिंठा गुंफांची संख्या ३१ डोंगर कोरून गुहे स्मारके तयार केले आहेत. लेणी बौद्ध धार्मिक कला  आणि फ्रेस्कोस या दोन्हीचे उत्कृष्ट कृती मानली जाणारी चित्रे आणि शिल्पे यांचा समावेश आहे ज्या श्रीलंकेतील सिगरिया पेंटिंगची आठवण करून देतात.

बीबी का मकबरा :

बीबि का मकबरा हा औरंगाबाद शहरापासून ३ किमी अंतरावर आहे, औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी हे आगरातील ताजचे अनुकरण आहे आणि ह्याच प्रकाराच्या डिझाईनमुळे हे लोकप्रिय दक्कनचे मिनी ताजमहाल  म्हणून ओळखले जाते.

दौलताबाद किल्ला : 

औरंगाबाद शहरापासून १६ किमी अंतरावर दौलताबाद येथे देवगिरी हा यादवकालीन किल्ला आहे. देवगिरी हा किल्ला यादव घराण्याची राजधानी होती; पुढे दिल्लीचा सुलतान महंमद तुघलकाने देवगिरी किल्ल्याचे नाव दौलताबाद ठेवले.

खुलदाबाद :

येथे
मुघल शासक औरंगजेबाची कबर आहे. प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरही येथे आहे. हे एलोरा
लेणीच्या अगदी जवळ आहे. हे शहर आजूबाजूच्या भागापेक्षा जास्त उंचीवर आहे
,
त्यामुळे
हवामान थंड आहे आणि या ठिकाणाला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे.

पैठण :

या गावामध्ये संत एकनाथ महाराजांची समाधी आहे आणि औरंगाबाद मधील जायकवाडी धरण प्रकल्पातील नाथसागर जलाशय देखील येथेच आहे. तसेच या तालुक्यातच आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आहे. शिवाय पैठण हे येथील साड्यांसाठी देखील जगभरात प्रसिद्ध आहे.

पितळखोरे लेणी :

पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते.

 

    आशा करतो की तुम्हाला आजचा लेख आवडला असेल. या लेखामध्ये आम्ही औरंगाबाद जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे; आपणाला ही माहिती नक्की आवडेल या मध्ये आपण औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास, त्याची भौगोलिक माहिती, पर्यटन असे सर्व टॉपिक कवर केले आहे . तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की comment करा आणि तुमच्या जवळ औरंगाबाद जिल्ह्याबद्दल आणखी काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला देऊ शकता जेणेकरून ती या लेखात समाविष्ट होईल आणि लोकांपर्यंत पोहोचेल.

संबंधित प्रश्नउत्तरे

प्रश्न १. औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यांची नावे सांगा ?

उत्तर : औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद, सिल्लोड, गंगापुर, पैठण, कन्नड, वैजापुर, फुलंब्री, खुलताबाद, सोयेगांव असे एकूण तालुके ०९ तालुके आहे.

प्रश्न २. औरंगाबाद जिल्ह्याचे
जुने नाव काय?

उत्तर:  औरंगाबाद जिल्ह्याचे जुने नाव खडकी हे आहे.

प्रश्न ३. औरंगाबाद जिल्ह्याचे
नवीन नाव काय?

उत्तर :  औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव संभाजीनगर हे
आहे.

प्रश्न ४.  औरंगाबाद जिल्ह्यात किती गावे आहे?

उत्तर :  औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १३४१ गावे आहे आणि ८६१
ग्रामपंचायत आहे.

प्रश्न ५.  औरंगाबाद विभागात एकूण किती जिल्हे आहे?

उत्तर :  औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणीहिंगोली, नांदेड असे एकूण ८ जिल्हे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top