शेकडेवारी संपूर्ण माहिती | Percentage in Marathi

 नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिनिनो आजच्या लेखामध्ये आपण बीजगणितामधील शेकडेवारी हा टॉपिक अभ्यासणार आहे सुरवातीला आपण बघणार आहे शेकडेवारी म्हणजे काय ? त्या नंतर आपण शेकडेवारी काढण्याचे सूत्र बघूया आणि नंतर शेकडेवारी काढण्यासाठी उपयोगी येणारी काही माहिती बघूया या टॉपिक वर पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा या सारख्या स्पर्धापरीक्षेमध्ये नेहमी प्रश्न येत असतात. तर चला सुरु करूया आजचा लेख शेकडेवारी.

शेकडेवारी संपूर्ण माहिती, percentage in Marathi, टक्केवारी, शेकडेवारी, शेकडेवारी मराठी, shekadevari, takkevari
टक्केवारी

शेकडेवारी (टक्केवारी ) म्हणजे काय ?

जेव्हा वस्तूची किंवा कोणत्याही संख्येची तुलना १०० च्या प्रमाणावरून केली जाते तेव्हा त्यास टक्केवारी किंवा शेकडेवारी असे म्हणतात.

शेकडेवारी किंवा टक्केवारी म्हणजे दर शंभर मध्ये त्या संख्येचा तेवढा वाटा होय. 

शेकडेवारी हे एक प्रकारचे गुणोत्तर असते ज्याचे १०० टक्के आहे असे गुणोत्तर तयार होत असते.

शेकडेवारी किंवा टक्केवारी यासाठी शतमान हा शब्द देखील वापरला जातो .

शेकडेवारी किंवा टक्केवारी दाखवण्यासाठी % या चिन्हाचा उपयोग केला जातो.

शेकडेवारी सूत्र ( टक्केवारी चे सूत्र)

शेकडेवारी काढण्यासाठी आपल्याला एकूण संख्येला मिळालेल्या संख्येने भागावे लागते आणि नंतर येणाऱ्या संख्येला १०० ने गुणावे लागते.
शेकडेवारी(%) =  संख्या / एकूण संख्या × १००
 
आपण हे उदाहरणाने समजून घेऊया.
उदा: एका परीक्षेमध्ये १२० विद्यार्थी बसले होते त्या मधून ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?
उत्तर: या उदाहरणात 
            एकूण संख्या = एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी = १२०
                    संख्या = उत्तीर्ण झालेले विद्यार्थी = ९०
 
म्हणून शेकडेवारी(%) = ९०/१२०×१००= ७५
म्हणून परीक्षेमध्ये ७५% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
 

शेकडेवारी उदाहरण सोडवतांना लक्षात ठेवा

  • कोणताही अपूर्णांक किती टक्के आहे हे पाहण्यासाठी त्याला १०० ने गुणले जाते.

उदा: १/४ हा अपूर्णांक किती टक्के आहे?
१/४×१०० = २५%

  • टक्केवारी चे रूपांतरण अपूर्णांकात करायचे असल्यास त्याला १०० ने भागले जाते.

उदा: शेकडा ४० ला अपुर्णाकात रूपांतरण करा?
शेकडा ४० = ४०/१०० = २/५ 

  • संख्यांची शेकडेवारी काढायची असेल तर त्य संख्येच्या अंशाला १०० ने गुणावे लागते.

उदा: ४० पैकी  ३२ विद्यार्थी उत्तीर्ण  म्हणजे शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण ?
= १००×३२/४०
= १००×४/५
= ४००/५
= ८० % विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

  • शेकडेवारी किंवा टक्केवारी हे परीक्षेचे गुण, दलाली, सूट, नफा तोटा, कमिशन लोकसंख्येतील बदल साधारण: इत्यादी साठी वापरतात. आणि स्पर्धापारीक्षेमध्ये देखील याच विषयाला अनुसरून प्रश्न येत असतात.

शेकडेवारी तक्ता

नेहमी उपयोगात येणारे अपूर्णांक आणि त्यांची शेकडेवारी (टक्केवारी)
 

अ.क्र

अपूर्णांक

शेकडेवारी (%)

१/२

५०%

१/३

३३.३३%

१/४

२५%

१/५

२०%

१/६

१६.६६%

१/७

१४.२८%

१/८

१२.५%

१/९

११.११%

१/१०

१०%

१०

१/११

९.०९%

११

१/१२

८.३३%

१२

१/१३

७.६९%

१३

१/१४

७.१४%

१४

१/१५

६.६६%

संबंधित प्रश्न उत्तरे

प्रश्न १ टक्केवारी म्हणजे काय ?
उत्तर: शेकडेवारी किंवा टक्केवारी म्हणजे दर शंभर मध्ये त्या संख्येचा तेवढा वाटा होय
 
प्रश्न २ टक्केवारी कशी काढावी?
उत्तर: शेकडेवारी काढण्यासाठी आपल्याला एकूण संख्येला मिळालेल्या संख्येने भागावे लागते आणि नंतर येणाऱ्या संख्येला १०० ने गुणावे लागते.
 
प्रश्न ३ गुणांची टक्केवारी कशी काढावी
उत्तर: मिळालेले गुण भागेला एकूण गुण गुनेला १०० करून गुणांची टक्केवारी काढता येते
गुणांची टक्केवारी = मिळालेले गुण/ एकूण गुण × १००
प्रश्न ४ शेकडेवारी चे सूत्र सांगा?
उत्तर: शेकडेवारी(%) =  संख्या / एकूण संख्या × १००
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top