नमस्कार विद्यार्थी मित्रांनोआज आपण आजच्या लेखात गणितीय मूलभूत क्रिया बद्दल माहिती घेणार आहोत त्या क्रियांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया व यांचे काही नियम आहेत ते बघणार आहोत. हा लेख अभ्यासल्या नंतर तुम्हाला या सर्व क्रियांबद्दल संपूर्ण माहिती व त्यांचे नियम पूर्णपणे समजून येईल हे नक्की तर चला सुरु करूया आजचा टॉपिक गणिताच्या मूलभूत क्रिया
गणिताच्या मुलभूत क्रिया |
गणिताच्या मुलभूत क्रिया (Mathematical Basic Operations)
सर्वप्रथम आपण बेरीज आणि बेरजेचे काही नियम बघणार आहोत सर चला सुरू करूया
बेरीज आणि बेरजेचे नियम(Addition and their rules)
साध्या व सरळ संख्येच्या बेरजेच्या पद्धती
साध्या संख्येची बेरीज करतांना कोणतेही असे नियम लागत नाही फक्त कोणत्याही संख्येची बेरीज करतानी एवढे लक्षात ठेवावे की बेरीज ही उजव्या बाजूने सुरु करायची.
अपुर्णाकाच्या बेरीज करण्याच्या पद्धती
दशांश अपुर्णाकाची बेरीज करण्याची पद्धती
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बेरजेची पद्धत
क्रमवार
विषम संख्येच्या बेरजेच्या पद्धती
- क्रमवार विषम संख्यांची बेरीज करीत असताना त्या संख्यामालेची सुरुवात १ ने होत असेल तर त्या संख्यामालेत जो
मधला अंक आहे त्या मधल्या अंकाचा वर्ग म्हणजे त्या पूर्ण संख्यांची बेरीज होय.
- क्रमवार विषम संख्यांची बेरीज करताना त्या संख्यामालेत जर १ नसेल तर मधल्या अंकाचा वर्ग करून येणारी संख्या बरोबर उत्तर राहत नाही
त्यामुळे अशा वेळेस मधल्या अंक गुणेला संख्यामालेतील एकूण संख्या किती हे मोजून त्यांचा गुणाकार करून येणारे
उत्तर हे त्या संख्या मालेचे उत्तर असते.
क्रमवार
सम संख्येच्या बेरजेची पद्धती
क्रमवार समसंख्या ची बेरीज करीत असताना त्या संख्या
मालेतील मधला अंक गुणेला संख्या मालेतील एकूण अंक याचा गुणाकार करून येणारे
उत्तर म्हणजे त्या संख्या मालकीची बेरीज होय.
उदाहरण २ प्रमाणे मधला अंक सम संख्यामधून निघत नसल्यास मधल्या २ संख्यातील मधलाअंक घ्यावा.
क्रमवार संख्येच्या बेरजेची पद्धती
क्रमवार सम संख्येची बेरीज करताना जो नियम लागतो तोच नियम क्रमवार संख्येची बेरीज करताना देखील उपयोगी येतो .
क्रमवार घन संख्या ची बेरीज पद्धत
क्रमवार धडा संख्यांची बेरीज करीत असताना केवळ त्या क्रमावर येणाऱ्या संख्यांची बेरीज करावी ती बेरीज करून आलेल्या उत्तराचा वर्ग करावा म्हणजेच क्रमवार घनसंख्येची बेरीज मिळेल.
उदा१: १³+२³+३³+४³+५³
= (१+२+३+४+५)²
= (१५)²
= २२५
उदा२: १³+२³+३³+४³+५³……….१५³
बेरीज = मधला अंक + एकूण अंक
= ८*१५
= (१२०)²
= १४४००
शतमान स्वरूपातील अंकांची बेरजेची पद्धत
मापन पद्धतीतील बेरीज
उदा: १५.३ मीटर + ४५ सें. मी. + ७८ मि.मी.
वजाबाकी आणि वजाबाकीचे नियम(Subtraction And Their Rules)
अपुर्णाकाची वजाबाकी पद्धती
९/२ – ३/५ =?
(५*९) – (२*३)
___________
(२*३) – (५*२)
४६/१० – ६/१०
४५-६
____
१०
३९/१०
३.९ हे उत्तर
मापन पद्धतीतील वजाबाकी
पूर्णाकयुक्त अपुर्णाकाची वजबाकी पद्धत
पूर्णाकयुक्त अपुर्णाकाची वजाबाकी करताना पहिले पूर्णाक संख्येची वजाबाकी एका कंसात करून घ्यावी आणि नंतर बेरजेचे चिन्ह देऊन अपूर्णांक संख्येची वजाबाकी करून घ्यावी. त्यानंतर दोन्ही कंस वेगवेगळे सोडवून त्यांची बेरीज करून घ्यावी व उत्तर काढावे
उदा २५ १/४ -१२ १/८ – ३ १/१६
(२५-१२-३)+ (१/४-१/८-१-१६)
(१०)+ (१*४/४*४-१*२/८*२-१/१६)
(१०) + (४/१६-२/१६-१/१६)
(१०) + १/१६
१० १/१६ हे उत्तर येईल
वर्ग संख्येची वजाबाकी पद्धत
वर्ग संख्येची वजाबाकी करण्याची पद्धत फार सोपी आहे त्यासाठी A² + B² = (a + b)(a – b)
या सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवले जाते.
उदा: (१५)² – (२८)²
सूत्र: A² – B² = (a + b)(a
– b)
(२८²-१५²) = (२८+१५)(२८-१५)
= ४३*१३
= ५५९
वर्गमुळाची वजाबाकी करण्याची पद्धत
वर्गमुळाची वजाबाकी करायची झाल्यास सर्वात पहिले वर्गमुळात असलेल्या संख्यांचे वर्गमूळ काढून घ्यावे व त्यानंतर त्या संख्येची वजाबाकी करून घ्यावी. या शिवाय जर वर्गमुळात पुन्हा कधी वर्ग संख्या असल्यास ती वर्ग संख्या करावी आणि नंतर त्यांची वर्गमुळामध्येच वजाबाकी करावी आणि शेवटी येणारे उत्तर लिहावे त्यानंतर येणाऱ्या उत्तराचे वर्गमूळ निघत असेल तर ते काढून शेवटचे उत्तर लिहावे.
उदा१: √१२*१२*२*२ – √११*११*२*२
= १२*२ – ११*२
= २४ – २२
= २
उदा२: ८√४ – ४√८*२
= ८√४ – ४√२*२*४
= ८√४ – ४*२√४
= ८√४ – ८√४
= ०
गुणाकार व गुणाकाराचे नियम (Multiplication And Their Rules)
- १ या संख्येने कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार तीच संख्या येते.
- गुणाकार करताना संख्यांचा क्रम मागे पुढे केला तरीही त्याच्या गुणाकारात काहीही फरक पडत नाही.
- गुणाकार करताना कोणत्याही संख्येला ० ने गुणले असता किंवा ० या संख्येला कोणत्याही संख्येने गुणले असता गुणाकार म्हणजेच येणारे उत्तर हे ० असते.
- गुणाकार करताना एक संख्या धन असेल व दुसरी संख्या ऋण असेल तर येणारा गुणाकार हा ऋण संख्या येत असते.
- गुणाकार करताना जर दिलेल्या दोन्ही संख्या धन असेल तर येणारे उत्तर देखील धन संख्याच येत असते.
- दोन ऋण संख्यांचा गुणाकार देखील धन संख्याच येत असते.
(a) x(a+b) = xa+xb
(b) (x+y) (a+b) = xa+xb+ya+yb
(c) (x-y) (a+b) = xa+xb-ya-yb
(d) (x-y) (a-b) = xa-xb-ya+yb
(e) (a+b)² = a²+2ab+b²
(f) (a-b)² = a²-2ab+b²
(g) (a²- b²) = (a-b)(a+b)
(h) (a+b)³ =
a³+3a²b+3ab²-b³
(i) (a-b)³ = a³
-2a²b+3ab²-b³
(j) a³-b³ = (a-b)(a²-ab+b²)
(k) a³+b³ = (a+b)(a²-ab+b²)
या सूत्रांचा वापर करून आपण अजून लवकर गुणाकार क्रिया करू शकतो.
भागाकार आणि त्यांचे नियम (Divisions And Their Rules)
भागाकार: संख्यामालेतील एखाद्या संख्येची केलेली विभागणी म्हणजे भागाकार
भागाकार करण्याची पद्धत सोपी असते त्यांना एका विशिष्ट स्वरुपात बसवले तर आपण अगदी सहज भागाकार करू शकतो भागाकार करताना काही महत्वाच्या संज्ञा लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते आपण बघूया.
- ज्या संख्याला आपल्याला भागायचे आहे त्या संख्येला भाज्य असे म्हणतात.
- ज्या संख्येने आपल्याला भाग्याचे आहे त्या संख्येला आपण भाजक असे म्हणतो.
- आपण ज्या भाज्य संख्येला भाजक संख्येने भागून जे उत्तर येते त्याला आपण भागाकार असे म्हणतो; आणि भागाकार पूर्ण होऊन खाली जी संख्या उरते तिला आपण बाकी असे म्हणतो.
- आपण भागाकार केल्या नंतर खाली बाकी ० उरत असल्यास अश्या संख्यांना आपण विभाज्य संख्या असे म्हणतो; आणि याउलट जर बाकी कोणती संख्या उरत असल्यास त्या संख्यांना आपण अविभाज्य संख्या असे म्हणतो.
खालील चित्र वरून आपण थोडक्यात सर्व समजून घेऊया
भागाकार |
आता आपण भागाकाराचे काही नियम आहेत ते बघूया.
- कोणत्याही संख्येला १ के भागीतल्यास भागाकार तीच संख्या येत असते आणि कोणत्याही संख्येला ० ने भाग भागता येत नाही.
भाज्य = भाजक * भागाकार+बाकी
- एखाद्या धन संख्येला दुसऱ्या धन संख्येने भागीतले असता भागाकार म्हणजेच येणारे उत्तर हे धन संख्याच येते.
- एखाद्या ऋण संख्येला धन संख्याने भाग दिला असता उत्तर हे ऋण संख्याच येत असते.
- एख्याद्या धन संख्येला ऋण संख्येने भाग दिला असता उत्तर हे ऋण संख्याच येत असते.
- एखाद्या ऋण संख्येला दुसऱ्या ऋण संख्येने भागीतले असता भागाकार म्हणजेच येणारे उत्तर हे धन संख्याच येते.
- एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला एखाद्या विशिष्ट अंकाने भाग जात असल्यास तर त्या पूर्ण संख्येला त्या विशिष्ट संख्येने पूर्ण भाग जातो.
उदा: ४७४५
- एखाद्या संख्येच्या एकक स्थानाच्या ठिकाणी ० किंवा ५ हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला ५ ने पूर्ण भाग जातो.
- ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना १५ ने देखील पूर्ण भाग जातो.
Pingback: शेकडेवारी संपूर्ण माहिती | Percentage in Marathi - mpscschool.in