राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २०२२-२३

नमस्कार शेतकरी मित्र मैत्रिणीणो आजच्या ब्लोग पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे.आजच्या लेखात आपण राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २०२२-२३ या विषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आपल्या पर्यंत पोहोचाव्यात हाच या लेखा मागील खरा उद्देश.

राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना या नावाने सहा मुख्य घटकांसह नवीन योजना सन 2017-18 या वार्षिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यात राबविण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.सदर योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून नवीन लाभधारक निवड प्रक्रिया राबवून लाभधारक निवड करायचे आहे याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया राबविणे त्यानुसार लाभधारक निवड प्रक्रिया राबवणे तसेच योजनेची अंमलबजावणी करण्याच्या कार्यवाही बाबत खालील प्रमाणे नियमावली निर्गमित करण्यात येत आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, Raje Yashwant Holkar Mahamesh Yojana

Raje Yashwant Holkar Mahamesh Yojana 2022-23

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची नियमावली

  • स्थायी आणि स्थलांतरित मेंढी पालन करणाऱ्या मेंढी पालकांना पायाभूत सोयी सुविधांसह 20 मेंढी + एक मेंढा नर अशा मेंढी गटाचे 75 टक्के अनुदानावर वाटप करणे.
  • सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे 75 टक्के अनुदानावर वाटप करणे.(केवळ या योजनेअंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांकरिता).
  • मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान.(केवळ या योजनेअंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या मेंढे आहेत अशा लाभार्थींकरिता).
  • मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान.( केवळ या योजनेअंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांकरिता).
  • कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता घासड्या बांधण्याचे यंत्र(mini Silage Baler cum wrapper) खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान.
  • पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी 50 टक्के अनुदान वरील प्रमाणे एकूण सहा घटकांमध्ये उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

उपघटकाच्या सविस्तर माहीतीसाठी  http://www.Mahamesh.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्याचे कार्यक्षेत्र

  • सदर योजना केवळ भटक्या जमाती(भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लागू राहील.
  • सदरची योजना राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित चौथी जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल.
  • योजनेअंतर्गत लाभधारक निवड करिता मागविण्यात आलेल्या अर्जापोटी प्राप्त झालेला प्रतिसाद विचारात घेऊन जिल्हा निहाल उद्दिष्ट निश्चित करून संबंधित क्षेत्र अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची लाभार्थी निवडीचे निकष व अटी/शर्ती

  • सदर योजना केवळ भटक्या जमाती(भज-क)या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
  • लाभ धारकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • लाभ धारकाची निवड करताना महिलांकरिता 30 टक्के व अपंगांकरिता 3 टक्के आरक्षण देण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत भटक्या जमाती(भज-क) प्रवर्गातील बचत गटांना/पशुपालन उत्पादन कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
  • लाभार्थी हा आधार कार्ड सोबत संलग्नीन करण्यात यावा.
  • ज्या लाभधारकांना या आधी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षांमध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
  • स्थायी पद्धतींने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरिता स्वतःची जागा असते आवश्यक आहे.
  • अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्तीय वेतनधारक/शासकीय पदाचा लाभ घेणारा,तसेच राज्य,केंद्रशासन,स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य,पदाधिकारी लोकप्रतिनिधी नसावा.
  • घटक निहाय प्राप्त अर्ज विचारात घेऊन उद्दिष्ट महामंडळामार्फत निश्चित करण्यात यावे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २०२२-२३ या योजनेसाठी अर्ज करतांना तो केवळ online पद्धतीने करणे अनिवार्य आहे.offline किंवा इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. online पद्धतीने  http://www.mahamesh.in या महामंडळाच्या website वरून किंवा मोबाईल (android) द्वारे mahamesh app वापरून अर्ज करता येईल.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी वेबसाईट वरून अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदारांनी योजनेचा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्र अपलोड करायची नसून संगणकीय सॉफ्टवेअर द्वारे रँडम पद्धतीने (लॉटरी) निवड झाल्यानंतर दिलेल्या विहित कालावधीत विहित केलेली कागदपत्रे विहित वेळेत ऑनलाईन अपलोड करायची आहे.
  • अर्जदारांनी अर्ज  करण्याकरिता http://www.mahamesh.in  हे महामंडळाचे संकेतस्थळ ओपन करायचे आहे
  • अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी सर्वप्रथम वरील संकेतस्थळावर जाऊन महामेष योजनेची लिंक ओपन करावी.
  • अर्ज भरण्याबाबतची माहिती दर्शविणारा व्हिडिओ व युजर मॅन्युअल बाबतची लिंक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी याबाबतची माहिती काळजीपूर्वक बघून व वाचून त्याप्रमाणे अर्ज भरण्यात यावा.
  • अर्जदारांनी प्रथम स्वतःचा आधार नंबर वापरून लॉगिन (अर्जदार लॉगिन)करायचे आहे.(एका अर्जाकरिता नोंदणी झालेला आधार नंबर परत दुसऱ्या अर्जदाराच्याअर्जाकरिता वापरता येणार नाही).
  • योजनेच्या अर्जामध्ये अर्जदारांनी वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील तसेच इतर माहिती भरायची आहे. माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर next बटन क्लिक करायचे आहे.त्यानंतर दुसरे पेज ओपन होईल यामध्ये अर्जदारास कुठल्या घटकांमध्ये लाभ घ्यायचा आहे याबाबतची माहिती भरायची आहे.
  • अर्जामधील माहिती भरून झाल्यानंतर submit बटणावर क्लिक करायचे आहे.(सबमिट करण्याआधी भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी).
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर “application form is submitted successfully मेसेज आल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज सबमिट झाल्याचे समजावे.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची पावती व्यवस्थित जतन करून ठेवण्यात यावी.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची निवड प्रक्रिया

  • घटक नियान प्राप्त अर्ज विचारात घेऊन महामंडळामार्फत उद्दिष्ट निश्चित करण्यात येईल.
  • महामंडळामार्फत उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत निवड यादी (1selected + 5 waiting) यानुसार यादृच्छिक (random) रीत्या ऑनलाईन पद्धतीने प्राप्त अर्जामधून लाभधारक निवड करण्यात येईल.
  • यादृच्छिक (random) पद्धतीने निवड करण्यात आलेल्या अर्जदारांना संकेतस्थळाच्या माध्यमाद्वारे त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर लघु संदेशाद्वारे(sms)निवड झाल्याबद्दल कळविण्यात येईल.
  • निवड यादीमध्ये उपलब्ध तरतुदीच्या आधीन राहून निश्चित केलेल्या लक्षांकाच्या पाचपट (उपलब्ध व पात्र अर्जास आधीन राहून) अर्जदारांना कागदपत्रे पडताळणी करिता अपलोड करण्याकरिता कळवण्यात येईल.
  • अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करण्याकरिता 15 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
  • अर्जदारांना आवश्यक कागदपत्राची पूर्तता न केल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल.
  • निवड यादी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर(http://www.mahamesh.in उपलब्ध असेल.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत निवड झाल्यावर करावयाची कार्यवाही

  • अर्जदारांनी विहित मुदतीत कागदपत्रे http://www.mahamesh.in या संकेतस्थळावरून किंवा माहामेश app वर अपलोड करायचे आहे.
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला(सक्षम अधिकाऱ्याचा)
  • मेंढी पालन करण्याची पद्धत किंवा स्वरूप व सध्या असलेल्या मेंढ्यांची संख्या(स्थलांतरित/फिरस्ती पद्धतीने किंवा एका ठिकाणी राहून स्थायी पद्धतीने) याबाबतचे संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी त्यांचे प्रमाणपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 1 मध्येच सादर करायचा आहे).
  • रहिवासी दाखला (सक्षम प्राधिकारी )बंधपत्रांमधील नमुना क्रमांक दोन मध्ये सादर करायचा आहे.
  • अपत्य दाखला (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 3 मध्ये सादर करायचा आहे )1 मे 2001 नंतर तिसरे हयात आपत्य नसावे.
  • अर्जदाराचे शेत जमिनीचा अलीकडील तीन महिन्यातील 7/12 उतारा किंवा अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा 7/12 उतारा व शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमती पत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 4 मध्ये सादर करायचा आहे).
  • भाडेतत्त्वावर शेत जमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासमवेत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत रुपये 100 स्टॅम्प पेपर वर नोटरी करून (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 5 मध्ये सादर करावयाचा आहे).
  • शेड बांधकामाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यासाठी स्वतःची किमान एक गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत अलीकडील तीन महिन्याचा 7/12 उतारा/मिळकत दाखला.
  • बचत गटाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास ).
  • पशुपालन उत्पादक कंपनीचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास ).
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • महामंडळामार्फत शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र .
  • स्वयंघोषणा पत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 6 मध्ये सादर करायचा आहे).
  • वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे (लागू असणारे) एकाच वेळी अपलोड करून submit बटन क्लिक करावे.
  • अर्जदारांनी विहित मुदतीत आवश्यक लागणारे सर्व कागदपत्रे अपलोड न केल्याने अर्जदाराची निवड रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील याबाबत अर्जदाराची कसलीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. लाभधारक निवड करताना खालील बाबी विचारात घेऊन त्याकरिता प्रत्येक घटनकनिहाय स्वतंत्र लाभधारक निवडण्यात येईल.
  • सदर योजनेअंतर्गत लाभधारकास खालील 15 उपघटकांमध्ये लाभ घेता येईल तथापि.
  • अर्जदाराने खालील पहिल्या दोन उपघटकांमधील कोणत्याही एका उद्घाटनाचा लाभ घेतल्यास त्यांना इतर उपघटकांमध्ये लाभ घेता येणार नाही.अर्जदाराने वरील3  ते 7 या उपघटकांमधील कोणत्याही एका उपघटकाचा लाभ घेतल्यास त्याला पहिले दोन उपघटक वगळता उर्वरित उपघटकांमधील मेंढीपालन व्यवसाय करण्याच्या प्रकारानुसार स्थायी किंवा स्थलांतरित व सध्या असलेल्या मेंढ्यांच्या संख्येनुसार वरील प्रमाणे दर्शविण्यात आलेल्या उपघटक क्रमांक 8 ते 11 मधील कोणत्याही एका उप घटकाचा लाभ घेता येईल,तसेच 12 व 13 मधील कोणत्याही एका उप घटकाचा लाभ घेता येईल. अर्जदारास उपघटक क्रमांक 14 व 15 या दोन पैकी एका घटकांमध्ये लाभ घेता येईल.

योजने संदर्भातील उपघटकाची सविस्तर माहीती जाणुन घेण्यासाठी http://www.mahamesh.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

वर नमुद केलेल्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २०२२-२३ या योजने संबंधी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत  http://www.mahamesh.in या संकेतस्थळाला भेट द्या.

वरिल माहिती आपणास कशी वाटली ते आम्हास नक्की कळवा.व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या http://mpscschool.in या website ला दररोज व्हिजिट करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top