जनपदे आणि महाजनपदे | Janapade Aani Mahajanpade In Marathi

 नमस्कार मित्रानो आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासामधील जनपदे आणि महाजनपदे हा भाग बघणार आहे. या मध्ये सर्वप्रथम आपण जनपद म्हणजे काय, महाजनपद म्हणजे काय, महाजनपद किती व कोणते, आणि महाजनपदांविषयीची माहिती थोडक्यात बघणार आहे. त्याचप्रमाणे मगध साम्राज्याच्या उदयाची कारणे महाजानपद काळातील महत्वाचे शासक या बद्दल देखील माहिती बघणार आहे. तर चला सुरु करूया आजचा भाग

जनपदे आणि महाजनपदे, Janapade Aani Mahajanpade In Marathi, janpade mhanje kay, mahajanpade mhanje kay, जनपदे म्हणजे काय, महाजनपदे म्हणजे काय, एकूण महाजानपदे किती व कोणती
जनपदे आणि महाजनपदे

जनपद म्हणजे काय ?

  • प्राचीन उत्तर वैदिक काळात समान विचार असणाऱ्या आणि समान जाती, वंशाच्या लोकांचे गट पडू लागले; त्या लोकांनी सोबत राहण्यासाठी अनेक लहान वसाहती आणि शहरे तयार केली त्या वसाहती किंवा शहरांनाच ‘जनपद’ असे म्हणतात. 
  • इ.स.पूर्व १००० ते इ.स.पूर्व ६०० या कालखंडात जनपदे उदयास आली
  • भारत उपखंडातील वायव्येला असलेल्या आजच्या अफगानिस्तान पासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडीशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत जनपदे पसरलेली होती.
  • या जनपदांचा संस्कृत पाली आणि अर्धमागधी साहित्यात उल्लेख आढळतो.

महाजनपद म्हणजे काय ? 

छोटी छोटी जनपदे तयार झाल्यानंतर ज्या जनपदांची अर्थव्यवस्था, व्यापार मजबूत होता त्यांचे सैन्यदल देखील बलाढ्य आणि आक्रमक असे. मग ही बलाढ्य जनपदे आपल्या राज्यात अधिकाअधिक जमीन राज्याला जोडण्यासाठी शेजारील कमजोर व लहान जनपदे जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेत असे अशीच लहान लहान जनपदे मिळून तयार झालेल्या मोठ्या राज्यांना ‘महाजनपदे’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
तत्कालीन काळात भारत उपखंडात सुमारे १६ महाजनपदे होती ती पुढीलप्रमाणे

महाजनपदे

राजधानी

सध्याचा प्रदेश

शासक

अंग

चंपा

चंपा,बिहार,भारत

लोमपाद व महाभारतातील कर्ण

अवंती

उज्जयनी

उज्जैन,मध्यप्रदेश,भारत

चंडप्रद्योत किंवा महासेनप्रद्योत

अश्मक

पाटन

औरंगाबाद,महाराष्ट्र,भारत

ब्रम्हदत्त

कांबोज

कांबोज

अफगाणीस्तान

श्रीकृष्ण

काशी

काशी (वाराणसी)

बनारस,उत्तरप्रदेश,भारत

ब्रम्हादत्त व दधिची

कुरु

हस्तिनापुर,इंद्रप्रस्थ

दिल्ली,भारत

इशुकरा

कोसल

श्रावस्ती,कुशावती

लखनौ,उत्तरप्रदेश,भारत

प्रसेनजीत

चेदी

शुक्तीमती

कानपूर,उत्तरप्रदेश,भारत

उग्रसेन आणि शिशुपाल

पांचाल

अहिच्छञ,कांपिल्य

रोहिलखंड,मध्यप्रदेश,भारत

कंपिल्य

मगध

गिरिव्रज,राजगीर

पटना,बिहार,भारत

बिम्बिसार

मत्स

विराटनगर

जयपूर,राजस्थान,भारत

विराट व त्याचा पुत्र

मल्ल

कुशीनगर

गोरखपूर,उत्तरप्रदेश,भारत

मल्ल वंशज

वत्स

कौशांबी

अल्लाहाबाद,उत्तरप्रदेश, भारत

उदयन

वृज्जी

वैशाली

विशाली,बिहार,भारत

चेतक (लीच्छवी नरेश)

शूरसेन

मथुरा

मथुरा,उत्तरप्रदेश,भारत

ब्रीशनिश आणि अवन्तिपुत्र

गांधार

तक्षशीला,पुरुषपूर(पेशावर)

पेशावर,खैबर,पख्तूनख्वा,पाकिस्तान

पुष्करसारिन्

मगध साम्राज्याच्या उदयाची कारणे

  • मगध साम्राज्य बिंबिसारच्या काळापासून प्रबळ होण्यास सुरुवात झाली.
  • गंगेच्या त्रिभुज प्रदेशांमुळे व्यापार, दळणवळण, सोयीस्कर होते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम होती.
  • राजधानी राजग्रीह्च्या तीन बाजूनी डोंगर होते, एका बाजूने नदी असल्याने हल्ला करणे शक्य नव्हते, नंतर राजधानी पाटलीपुत्र (पटना) येथे हलवली.
  • साम्राज्यात मोठ्या प्रमाणात लोखंडाच्या  खाणी होत्या. त्याचा उपयोग शेती आणि लष्कर बळकट करण्यासाठी झाला.
  • आर्य आणि अनार्यांचे संबंध चांगले होते समाजात एकता आणि समानतेची भावना होती. 

महत्वाचे शासक

(१) बिंबिसार

  • इ.स.पूर्व ५४५ ते इ.स.पूर्व ४९३ हा काळ बिंबिसार राजाचा होता.
  • हे मगध साम्राज्याचे संस्थापक होते असे म्हटले जाते. 
  • बिंबिसारने कौसल शासक प्रसेनजीतची बहिण महाकौसल सोबत लग्न केले. हुंडा म्हणून कशी हे गाव मिळाले. तसेच विदेह्ची राजकुमारी खेमा सोबतही लग्न केले. बिंबिसारने चंपा वर यशस्वी आक्रमण केले.
  • अवंतीचा शासक प्रत्योदसाठी त्यांनी जीवक हा वैद्य पाठवला.
  • बिंबिसारने महावीर जैन आणि गौतम बुद्ध यांच्या भेटी घेतल्या होत्या. बिंबिसार कोणत्या धर्माचे होते याबाबत काही स्पष्ट नाही आहे. बिंबिसारने संतासाठी जहाज प्रवास मोफत केला होता.
  • बिंबिसारचा खून त्यांचाच मुलगा अजातशत्रू याने केला.

(२) अजातशत्रू

  • इ.स.पूर्व ४९३ ते इ.स.पूर्व ४६२ हा काळ अजातशत्रूचा होता.
  • शेजारील कौशल, लीछ्वी अवंती सोबत युद्ध करून त्याने राज्यविस्तार केला.
  • वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे समकालीन होते.
  • यांनी बुद्धांच्या मृत्युनंतर राजग्रीह येथे पहिली बौद्ध परिषद भरवली.
  • अजातशत्रूनंतर त्यांचा मुलगा उद्यान शासक बनला. त्यांनीच पाटलीपुत्र शहराची स्थापना केली.

मगध साम्राज्यावर राज्य केलेली इतर घराणी

(१) हरण्यक घराणे (इ.स.पूर्व ४६२ ते इ.स.पूर्व ४३०)

(२) शिशुनाग घराणे (इ.स.पूर्व ४३० ते इ.स.पूर्व ३६४)

(३) नंद घराणे (इ.स.पूर्व ३६४ ते इ.स.पूर्व ३२४)


संबंधित प्रश्न उत्तरे

प्रश्न १ : प्राचीन भारतात किती महाजनपदे होती ?

उत्तर  : प्राचीन भारतात एकूण १६ महाजनपदे होती.

प्रश्न २ : काशी महाजनपदाची राजधानी कोणती होती ?

उत्तर  : काशी या महाजनपदाची राजधानी काशी (वाराणसी) ही होती.

प्रश्न ३ : मगध या महाजनपदाची राजधानी कोणती होती ?

उत्तर  : मगध या महाजनपदाची राजधानी गिरिव्रज, राजगीर होती

प्रश्न ४ : मगध सत्तेची स्थापना कोणी केली ?

उत्तर  : मगध सत्तेची स्थापना इ.स.पूर्व ५४५ मध्ये बिंबिसार राजाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top