मौर्य साम्राज्य आणि मौर्य कालखंडातील भारत | Maurya Empire In Marathi

 नमस्कार मित्रामैत्रीनिणो आज आपण आपल्या या पोस्ट मध्ये मौर्य साम्राज्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण मौर्य साम्राज्याचा कालखंड आणि स्थापना या बद्दल माहिती बघूया; त्यानंतर मौर्य साम्राज्यातील शासन करणारे महत्वाचे शासक बघणार आहे त्यामध्ये आपण चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार मौर्य, सम्राट अशोक मौर्य, दशरथ मौर्य, आणि बृहद्रथ मौर्य यांच्याबद्दल जाणून घेणार आहे. त्यानंतर मौर्य कालखंडातील राज्यव्यवस्था आणि प्रशासन, अर्थव्यवस्था, लोकजीवन,  कला आणि व्यवसाय, धर्म, आणि शेवटी मौर्य साम्राज्याच्या अस्ताची कारणे जाणून घेणार आहे तर चला सुरु करूया आजचा भाग मौर्य साम्राज्य आणि मौर्य कालीन भारत… 

maurya samrajya in marathi,मौर्य साम्राज्य, maurya samrajya, maurya kalkhandatil bharat, maurya samrajyatil mahatwache shasak, chandragupta maurya, samrat ashok maurya, samrat ashok, maurya samrajyatil lokjivan, maurya samrajyatil vyavsay, maurya samrajyachya astachi karne
maurya samrajya in marathi

मौर्य साम्राज्याचा कालखंड आणि स्थापना

  • इ.स.पूर्व ३२१ ते इ.स.पूर्व १८५ हा १३६ वर्षांचा कालखंड मौर्य साम्राज्याचा कालखंड मानला जातो.
  • मौर्य साम्राज्य हे जगाच्या इतिहासातील एक महत्वाचे साम्राज्य होते. तसेच ते भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते.
  • गंगेच्या खोऱ्यातून मगध राज्यापासून उदयास आलेले मौर्य साम्राज्य हे पुढे ५०००००० वर्ग चौरस किमी एवढ्या प्रचंड प्रदेशात वाढले आणि ते त्याकाळातील भारतीय उपखंडातील सर्वात मोठे साम्राज्य ठरले होते.
  • चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. तर सम्राट अशोक  हे मौर्य साम्राज्यातील महात्वाचे शासक होते 
  • मौर्य साम्राज्याच्या अगोदर नंद घराणे आपले राज्य चालवत होते. त्या घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता. लोक त्याच्यापासून त्रस्त होते; अशातच आर्य चाणक्याने आपल्या पूर्वीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी चंद्रगुप्त मौर्यांच्या साथीने नंद घराण्याला परास्त (हरवून) मौर्य साम्राज्याची स्थापना केली.
  • मौर्य साम्राज्याची लोकसंख्या अंदाजे ५.५ ते ६ करोड इतकी होती आणि मौर्य साम्राज्य हे त्या काळातील लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठे साम्राज्य होते.
  • मौर्य साम्राज्याची प्राधिकृत भाषा ही पाली असून ते प्राकृत आणि इतर भाषांचा देखील वापर करत असे.
  • सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर जवळपास ५० वर्षानंतर मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ.स. पूर्व १८५ मध्ये शुंग साम्राज्याने मौर्य साम्राज्याला हरवून मौर्य साम्राज्याचा अंत केला.


मौर्य साम्राज्यातील महत्वाचे शासक 

मौर्य साम्राज्याने जवळपास १३६ वर्षे राज्य केले त्याकाळात अनेक सम्राटांनी मौर्य साम्राज्याचा कार्यभार सांभाळला त्यातील काही शासकांबद्दल आपण जाणून घेऊया.

(१) चंद्रगुप्त मौर्य

  • चंद्रगुप्त मौर्य यांचा जन्म इ.स.पूर्व ३४० मध्ये एका धनगर कुटुंबात झाला.
  • चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. चंद्रगुप्त मौर्य यांनी आर्य चाणक्यांच्या मदतीने जुलमी नंद घराण्याला हरवून इ.स.पूर्व ३२२ साली मौर्य साम्राज्याची स्थापना केली व ते सिंहासनावर बसले.
  • इ.स.पूर्व ३२२ ते इ.स.पूर्व २९८ हा चंद्रगुप्त मौर्य यांचा राज्यकाळ होता.
  • नंद घराण्याला हरवून राज्य कारभार चालू केल्या बरोबर चंद्रगुप्त यांनी आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेची अनेक राज्ये आपल्या राज्यात शामिल करून घेतली.
  • चंद्रगुप्त मौर्य यांनी सेल्युकसवर विजय मिळवल्यानंतर सेल्युकस ने आपली मुलगी कार्नेलिया हिचे लग्न चान्द्रगुप्तांशी लावून दिले आणि नंतर चान्द्रगुप्तांनी सेल्युकस बरोबर तह करून त्यांनी ५०० हत्ती भेट म्हणून दिले. व त्यांनी नवीन मैत्रीची सुरुवात केली.
  • चान्द्रगुप्तांच्या यशस्वी कार्यवाही नंतर त्यांची ख्याती पूर्ण जगभर पसरली आणि नंतर त्या काळातील बलाढ्य देश इजिप्त आणि सिरीया यांनी आपल्या दूतावासांची आशिया खंडात सर्वप्रथम स्थापना केली. या देशांच्या राजदूतांची चंद्र्गुप्तांच्या दरबारी नेमणूक करण्यात आली.
  • चंद्रगुप्त यांनी आपला प्रांत परकीय अधिपत्याखालुन मुक्त करण्यासाठी अनेक संघर्ष केला त्यांनी ग्रीक सैन्याशी आणि ‌‍क्षत्रपांशी लढाई करून ग्रीक सैन्य भारतातून हाकलून लावले व त्यानंतर चंद्रगुप्त हे पंजाब आणि वायव्य सीमेतील व सिंध प्रांतातील देव बनले.
  • चंद्रगुप्त यांनी अनेक लढाया लढवून बलुचिस्तान, अफगानिस्तान, गांधार, हिंदकुश पर्वतरांगा, काबुल, विंध्य पर्वताचा प्रदेश, बिहार, बंगाल, ओरिसा , दक्खन म्हणजे आताचा महाराष्ट्र आणि म्हैसूर यांचा आपल्या साम्राज्यात समावेश करून घेतला.
  • कायदा आणि न्यायव्यवस्था हि चान्द्रगुप्तांच्या राजवटीची खऱ्याखुऱ्या यशाचे कारण ठरले. राज्याचा कारभार त्यांनी पूर्णपणे मध्यवर्ती केला आणि राज्यालाच सर्वोसर्वी बनवले.
  • नंद राजवट असताना राज्यात वाढलेल्या गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला चंद्रगुप्तानी आर्य चाणक्यांच्या मदतीने काही वेळातच आवाक्यात आणले. चाणक्याच्या मदतीने उत्तम असे गुप्तचर यंत्रणेच्या जोरावर महसूल विभागातील भ्रष्टाचारास संपूर्णपणे संपवून थोड्या दिवसातच कठोर व पारदर्शक न्यायप्रणाली चान्द्रगुप्तांनी चालू केली; आणि न्यायदानाबद्दल प्रजेचा विश्वास जिंकून घेतला. 

सम्राट बिंदुसार मौर्य

  • बिदुसार मौर्य यांचा कालखंड इ.स.पूर्व २९८ ते इ.स.पूर्व २७१ इतका मानला जातो.
  • सम्राट बिंदुसार मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांची पत्नी दुर्धरा यांचा मुलगा होता.
  • सम्राट बिंदुसार यांना चंद्रगुप्त मौर्यांकडून खूप मोठे राज्य मिळाले होते. त्याबरोबरच त्यांनी दक्षिण भारताकडेही स्वतः आपला राज्य विस्तार केला.
  • सम्राट बिदुसार त्यांच्या मंत्रिमंडळात जवळपास ५०० मंत्री होते. व त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख ख्ल्लाटक हे होते.
  • चंद्रगुप्त मौर्याप्रमाणेच बिंदुसार मौर्यांच्या काळात देखील त्यांचे प्रधानमंत्री आर्य चाणक्य हेच होते.
  • बिंदुसार मौर्यांच्या राजवटीत तक्षशीलाच्या लोकांनी दोन वेळा बंड पुकारला होता. पहिल्या बंडाचे कारण हे बिंदुसारचा मोठा मुलगा सुशीमाचा चुकीच्या प्रशासनामुळे झाला होता. तर दुसरा बंडाचे कारण काय होते हे कळू शकले नाही आहे. पण असे म्हणतात की बिंदुसारचा मुलगा अशोकाने दुसऱ्या बंडाचे कारण हे दडपले होते. 
  • सम्राट बिंदुसार मौर्य यांना “वडीलाचा मुलगा व मुलाचे वडील” म्हणून देखील ओळखले जात असे. कारण बिंदुसार हे महान सम्राट व मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे पुत्र आणि मौर्य साम्राज्याचे महान व मोठे शासक सम्राट अशोक यांचे वडीलही  होते.
  • सम्राट बिंदुसार यांना त्याकाळातील जनता ही अमित्रघात, सिंहसेन, भद्ररसा आणि अजातशत्रू वरीसार या नावांनी देखील ओळखत असे.
  • सम्राट बिंदुसार यांनी जवळपास २८ वर्षे मौर्य साम्राज्यावर राज्य केले व इ.स.पूर्व २७३ मध्ये वयाच्या जवळपास ४७-४८ वर्षांचे असतांना पाटलीपुत्र येथे त्यांचा मृत्यू झाला.

सम्राट अशोक मौर्य

  • इ.स.पूर्व २७३ ते इ.स.पूर्व २३२ हा सम्राट अशोकांच्या साम्राज्याचा काळ मानला जातो. ते या काळात मौर्य साम्राज्याचे सम्राट होते.
  • सम्राट अशोक हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू आणि सम्राट बिंदुसार यांचा मुलगा होता.
  • सम्राट अशोक हे एक आक्रमक आणि निश्चयी राजा म्हणून ओळखले जात असे. ते सम्राट बनण्याच्या पूर्वीच राजपुत्र असताना त्यांनी उज्जैन व तक्षशीला येथील बंड मोडून काढली होती.
  • सम्राट अशोक हे राजा बनल्यानंतर त्यांनी संपुष्टात आलेली दक्षिण भारतातील मौर्य साम्राज्याची पकड पुन्हा स्थापन केली.
  • कलिंगचे युद्ध हे सम्राट अशोक यांच्या जीवनातील एक महत्वाचा प्रसंग ठरला. सम्राट अशोक यांनी कलिंगला पराभूत केले. या युद्धात खूप मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. हे युद्ध झाल्यानंतर सम्राट अशोक यांना पश्चाताप झाला कि या युद्धात झालेल्या जीवित हानीस मी जबाबदार होतो.
  • कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी लगेच पश्चातापासाठी बौद्ध धर्म स्वीकारून हिंसाचाराचा व युद्धाचा त्याग केला. त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला.
  • सम्राट अशोकांनी आपल्या बलाढ्य सैन्याचा उपयोग राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी केला.
  • त्यांनी आपल्या आजूबाजूच्या राज्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ते एक आदर्श राजा म्हणून नावारूपास आले.
  • सम्राट अशोक यांनी खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माच्या विचारांचा प्रसार केला. त्याचसाठी त्यांनी इ.स.पूर्व २५५ मध्ये आपल्या राजधानीत पाटलीपुत्र येथे बौद्ध परिषदेचे आयोजन देखील केले.
  • सम्राट अशोक यांनी जवळपास ४१ वर्षे मौर्य साम्राज्यावर राज्य केले व वयाच्या ७२ व्या वर्षी इ.स.पूर्व २३२ मध्ये पाटलीपुत्र येथे त्यांचा मृत्यू झाला.


सम्राट दशरथ मौर्य

  • दशरथ मौर्य यांचा कालखंड इ.स.पूर्व २३२ ते इ.स.पूर्व २२४ एवढा होता.
  • सम्राट दशरथ हा मौर्य साम्राज्याचा चौथा राजा असून तो सम्राट अशोक यांचा नातू आणि उत्तराधिकारी होता.
  • सम्राट दशरथ मौर्य यांच्या कालखंडात मौर्य साम्राज्याची मोठ्या प्रमाणात घट झाली व मौर्य साम्राज्य दुभळे होऊ लागले. सातवाहनांसारख्या अनेक राज्यकरत्यांनी आपले स्वातंत्र घोषित केले व इथूनच मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होण्यास सुरवात झाली.


सम्राट बृहद्रथ मौर्य

  • बृहद्रथ मौर्य यांचा कालखंड इ.स.पूर्व १८७ ते इ.स.पूर्व १८५ एवढा होता.
  • बृहद्रथ मौर्यहे मौर्य साम्राज्यातले शेवटचे सम्राट होते.
  • बृहद्रथ मौर्य यांच्या काळात साम्राज्य पूर्णपणे दुभळे झाले होते.
  • बृहद्रथ मौर्य यांनी अवघे दोन वर्षे राज्य केले आणि त्यांच्या सेनापती पुष्यमित्र शुंग याने त्यांचा खून केला. आणि तो स्वतः सम्राट बनला व यासोबतच मौर्य साम्राज्याचा अंत झाला.


मौर्य कालखंडातील प्रशासन आणि राज्यव्यवस्था

  • मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती आणि राज्यव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून पूर्ण मौर्य साम्राज्याचे चार भागात विभाजन केले होते. आणि त्या चार भागांची देखील स्वतंत्र राजधानी होती.

विभाग

राजधानी

सध्याचे ठिकाण

पूर्व विभाग

तोशाली

ओडिशा

पश्चिम विभाग

उज्जयिनी

उज्जैन, मध्यप्रदेश

दक्षिण विभाग

सुवर्णगिरी

कनकगिरी, कर्नाटक

उत्तर विभाग

तक्षशीला

पाकिस्तान


  • या प्रांतीय राज्यव्यवस्थेचा प्रमुख हा राजपुत्र असे तो आपल्या विभागाची राज्यव्यवस्था सांभाळत असे. आणि आपल्या विभागावर राज्य करत असे.
  • पूर्ण साम्राज्याची देखील याच प्रमाणे एक शासनव्यवस्था असे. त्याचा प्रमुख साम्राज्याचा सम्राट असे तर त्याला मदतीसाठी त्याची मंत्रीपरीषद असे.
  • मौर्य साम्राज्याच्या रक्षणासाठी देखील त्यांच्याकडे खूप मोठी सेना उपलब्ध होती. त्यात ६००००० पायदळ सेना, ३०००० घोडदळ सेना व ९००० लढाकू हत्तींची सेना यांचा समावेश होता.
  • मौर्य साम्राज्याची सेना ही त्याकाळातील सर्वात मोठी सेना होती.
  • राज्यातील आणि राज्याबाहेरील शत्रूवर देखरेख व लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम आणि प्रभावी असे हेरखाते त्याकाळात मौर्य साम्राज्यात होते.

मौर्य कालखंडातील अर्थव्यवस्था

  • मौर्य साम्राज्याच्या उदयानंतर सम्राट चंद्रगुप्तानी पूर्ण साम्राज्यात एकछत्री शासन लागू केले. आणि राज्यातील अंतर्गत लढायांना बंद करून भारतात एकत्रित अर्थव्यवस्था चालू केली.
  • मौर्य काळात शेतकऱ्यांना सरकारला पिके व कर देण्यापासून मुक्त केले गेले. आणि त्याकाळातील चाणक्यांचा ग्रंथ अर्थशास्त्र या ग्रंथाच्या आधारे पूर्ण शिस्तशीर आणि योग्य तो कर घेतला जाऊ लागला.
  • चंद्र्गुप्तांनी पूर्ण भारतात एकच चलन सुरु केले आणि राज्यातील सर्वसामान्य व्यापारी, शेतकरी व इतर जनतेला न्याय व सुरक्षा मिळावी म्हणून प्रशासनाचे जाळे तयार केले.
  • मौर्य साम्राज्य हे कर गोळा करण्यात अतिशय सक्त होते. पण जमा झालेल्या कराचा ते भरपूर असा भाग सार्वजनिक कामात लावत असे.
  • मौर्य साम्राज्याने अंतर्गत व्यापारासोबतच आंतरराष्ट्रीय व्यापारास देखील चालना दिली आणि सध्याच्या पाकिस्तान, अफगाणीस्तान व पश्चिमभागातले ग्रीक राज्यांसोबत देखील व्यापार संबंध वाढवले.


मौर्य कालखंडातील लोकजीवन

  • मौर्य साम्राज्य हे मोठ्या प्रमाणात न्यायप्रिय होते. तेथे अनेक सार्वजनिक समारोह व कार्यक्रम आयोजित केले जात असे.
  • मौर्य साम्राज्यातील नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये (गावांमध्ये) अनेक समारोह आयोजित केले जात असे त्यात नृत्य, गायनाचे कार्यक्रम होत.
  • त्या बरोबरच कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती हे खेळ देखील मौर्य साम्राज्यात खूप लोकप्रिय होते.
  • या सर्व खेळांबरोबर अष्टपद (बुद्धिबळ) आणि सोंगट्याचा खेळ देखील तेथे आवडीने खेळले जात असे.

मौर्य कालखंडातील कला आणि व्यवसाय

  • मौर्य साम्राज्य हे प्रामुख्याने कृषिप्रधान होते. त्यामुळे त्या काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्व दिले जात असे.
  • मौर्य साम्राज्याच्या काळात शेती बरोबर अनेक उद्योग व्यवसाय ही भरभराटीला आले होते. त्यात कापड विनणे, कापड रंगवणे, हस्तिदंतावरील कोरीव काम, धातूकाम, नौका बांधणी (जहाजबांधणी) यांसारखे कामे देखील मोठ्या प्रमाणात केली जात असे.
  • धातू कामामध्ये इतर धातूंसोबतच लोखंडाच्या वस्तू आणि हत्यारे देखील बनवले जात असे.
  • यासर्व व्यवसायांसाठी मौर्य साम्राज्यामध्ये अनेक व्यावसायिकांचे गट पाडण्यात आले होते या गटांना श्रेणी असे म्हंटले जात असे.
  • सम्राट अशोकानी कलिंगच्या युद्धानंतर शिल्प कलेला चालना आणि राजआश्रय देण्यात आला त्यामुळे हा व्यवसाय देखील लोक करू लागले.


मौर्य कालखंडातील धर्म

  • मौर्य साम्राज्याच्या आरंभीच्या काळात चंद्रगुप्त मौर्य यांच्या कारकिर्दीत जैन धर्म हा मौर्यांचा मुख्य धर्म होता.
  • जैन धर्म हा सम्राट अशोक यांच्या सम्राट झाल्यावर देखील सुरवातीला होता. पण कलिंगच्या युद्धानंतर  सम्राट अशोक यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून बौद्ध धर्म स्वीकारला.
  • सम्राट अशोक यांनी त्यांच्या कालखंडात संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार केला आणि नंतर पूर्ण भारतभर बौद्ध हा राजधर्म झाला.
  • सम्राट अशोक यांनी आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र या दोघांना श्रीलंकेत पाठवून तिथेही बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्याकाळातील श्रीलंकेचा राजा तिसा यानेही बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.
  • सम्राट अशोक यांनी पश्चिम आणि अग्न्येय आशियात ग्रीस येथे अनेक धर्मप्रसारक पाठवून बौद्ध धर्माचा प्रसार केला.

मौर्य साम्राज्याच्या अस्त / अंताची कारणे

  • सम्राट अशोकाच्या राजवटीनंतर जवळपास ५० वर्षे अनेक दुर्बल मौर्य सम्राटांनी मौर्य साम्राज्यावर राज्य केले.
  • बृहद्र्थ हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता. त्याचे राज्य सम्राट अशोकाच्या साम्राज्यापेक्षा खूपच लहान राहिले होते.
  • इ.स.पूर्व १८५ मध्ये एका समारोहात बृहद्राथची त्याच्या सेनापती पुष्यमित्र शुंग याने हत्या केली आणि शुंग साम्राज्याची स्थापना केली. आणि मौर्य साम्राज्याचा अंत झाला.

आजचा आपला विषय मौर्य साम्राज्य आणि मौर्य कालखंडातील  भारत हा पूर्ण झाला यामध्ये आपण
मौर्य साम्राज्याचा कालखंड आणि स्थापना, मौर्य साम्राज्यातील शासन करणारे महत्वाचे शासक बघितले त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार मौर्य, सम्राट अशोक मौर्य, दशरथ मौर्य, आणि बृहद्रथ मौर्य यांची माहिती बघितली सोबतच मौर्य कालखंडातील राज्यव्यवस्था आणि प्रशासन, अर्थव्यवस्था, लोकजीवन,  कला आणि व्यवसाय, धर्म, आणि शेवटी मौर्य साम्राज्याच्या अस्ताची कारणे जाणून घेतली. ही पूर्ण माहिती आपल्याला सर्व स्पर्धापरीक्षांसाठी, पोलिस भारती साठी, उपयुक्त आहे अशाच नवनवीन पोस्ट मिळविण्यासाठी आम्हाला असाच support करत राहा. 


संबंधित प्रश्नउत्तरे

(१)       मौर्य घराण्याचा संस्थापक कोण होते?
उत्तर : मौर्य घराण्याचा संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे होते

(२)    चंद्रगुप्त मौर्य यांची राजधानी कोणती होती?
उत्तर : चंद्रगुप्त मौर्य यांची राजधानी पाटलीपुत्र होती.

(३)   मौर्य काळात कोणते व्यवसाय होते?
उत्तर : मौर्य काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता.
त्याबरोबरच इतर उद्योगही होते जसे हस्तिदंतावरील कोरीव काम
, कापड विणणे आणि
रंगावे
, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते.

(४)    मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट कोण होता?

उत्तर: मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट बृहद्रथ मौर्य
हा होता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top