नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो आपल्या अजून एका नवीन लेख मध्ये
आपले स्वागत आहे. आज आपण गणिताचा पाया मानल्या जाणाऱ्या संख्या आणि त्यांच्या
प्रकाराबद्दल सविस्तरपणे माहिती बघणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण संख्या म्हणजे
काय? हे जाणून घेऊया त्या नंतर त्या संख्यांचे किती प्रकार आहे हे देखील बघणार
आहे. संख्यांच्या प्रकारामधील नैसर्गिक, पूर्ण, पूर्णाक, अनुक्रमांक, सम, विषम,
मूळ, संयुक्त, परिमेय, अपरिमेय, वास्तव, विरुद्ध, व्यस्त, त्रिकोणी, चौरस, यासारख्या
सर्व संख्यांचे प्रकाराबद्दल जाणून घेणार आहे. तर चला सुरु करूया आजचा विषय संख्या
व त्यांचे प्रकार.
संख्या व त्यांचे प्रकार |
संख्या म्हणजे काय?
अंकगणित शास्त्रामध्ये एकूण १० संख्या चिन्ह आहे ०,१,२,३,४,५,६,७,८,९
या संख्याचीन्हाचा उपयोग करून आपण गणितातील सर्व संख्या तयार करू शकतो किंवा लिहू
शकतो. या संख्या चिन्हांचा वापर करून तयार झालेल्या सर्व अंकसामुहाला आपण ‘संख्या’
असे म्हणतो.
या संख्याच्या गुंधार्मावरून आणि उपयोगावरून त्याचे एकूण १८ प्रकार
पडतात आपण ते आता सविस्तरपणे बघुया.
संख्यांचे प्रकार मराठी
१. नैसर्गिक संख्या (Natural Number)
आपण कोणत्याही वस्तूची किवा कोणत्याही प्रकारची मोजणी करण्यासाठी ज्या
संख्यांचा उपयोग करतो त्या संख्यांना ‘नैसर्गिक संख्या’(Naisargik Sankhya) असे
म्हणतात. नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहे म्हणजे नैसर्गिक संख्येचा कोणताही अंत
नाही.सर्वातमोठी नैसर्गिक संख्या कोणती हे निश्चित सांगता येत नाही.नैसर्गिक
संख्येच्या मदतीने विविध घटकांची किवा वस्तूंची मोजणी केली जाते; त्यामुळे या
संख्यांना मोजसंख्या असेही म्हणतात.
नैसर्गिक संख्या मध्ये ० नसतो शून्य सोडून ज्या कोणत्या संख्या आहे
त्या पूर्ण नैसर्गिक संख्या आहे.
उदा : १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४……..
पूर्ण संख्या (Whole Numbers)
नैसर्गिक संख्या आणि ०(शून्य) मिळून जो संख्या समूह तयार होतो त्यास ‘पूर्ण
संख्या’ असे म्हणतात.
० ही नैसर्गिक संख्या नाही पण पूर्ण संख्या आहे.म्हणजेच संपूर्ण नैसर्गिक
संख्या ह्या पूर्ण संख्या आहे सोबतच ० देखील पूर्ण संख्या मध्ये असतो.
कोणताही अपूर्णांक किंवा दशांश भाग किंवा (-)नकारात्मक
संख्या या ह्या पूर्ण संख्यांमध्ये येत नाही.
उदा : ०,१,२,३,४,५,६,७,८,९…………..
पूर्णाक संख्या (Integer Number)
अंकगणितातील सर्व ऋणसंख्या, धनसंख्या आणि ०(शून्य) पकडून जो संख्या
समूह तयार होतो त्या संख्यांना ‘पूर्णाक संख्या’ असे म्हणतात.
पूर्णाक संख्यातील सर्व ऋणसंख्या ह्या (-)वजा ह्या चिन्हाने दर्शवितात
आणि पूर्णाक संख्येतील सर्व धन संख्येला (+)बेरीज हे चिन्ह आहे असे समजले जाते. तर
० हा आरंभ बिंदू समजला जातो फक्त ० ह्या पूर्णाक संख्येला कोणतेही चिन्ह लागत नाही.
उदा : -४,-३,-२,-१,०,१,२,३,४………
वरील उदाहरणामध्ये -४,-३,-२,-१ ह्या ऋणात्मक पूर्णाक संख्या आहे तर १,२,३,४
ह्या धनात्मक पूर्णाक संख्या आहे.
अनुक्रमांक संख्या (Serial Number)
कोणत्याही संख्येपेक्षा एक ने मोठी असलेली संख्या म्हणजे अनुक्रमिक
किवा अनुक्रमांक संख्या होय.
उदा १,२,३,४,५,…
वरील उदाहरणामध्ये १ च्या पुढची क्रमवार संख्या (१+१)म्हणजेच २ ही
आहे. त्याचप्रमाणे २ ची क्रमवार ३, ३ ची क्रमवार ४ ही आहे.
सम संख्या (Even Number)
कोणत्याही संख्येला २ भागीतले असल्यास पूर्ण भाग जातो आणि बाकी ० उरते
अश्या सर्व संख्यांना ‘सम संख्या’(sam sankhya) असे म्हणतात.
उदा : २,४,६,८,१०,१२,१४,१६……….
वरील उदाहरणातील सर्व सम संख्या आहे
या सर्व सम संख्यांची काही वैशिष्ट्य आणि गुणधर्म असतात ते पुढील
प्रमाणे.
- कोणत्याही सम संख्येसोबत २ ने भागाकार केला असल्यास बाकी ० उरते.
- कोणत्याही दोन किवा दोनपेक्षा अधिक क्रमवार संख्येत २ चा फरक
असतो. - कोणत्याही सम संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ ह्या सम संख्या
असतातच. - कोणत्याही दोन किंवा अधिक सम संख्येची बेरीज आणि गुणाकार केला
असल्यास येणारे उत्तर हे सम संख्याच असते. - कोणत्याही सम संख्येसोबत विषम संख्येचा गुणाकार केला असल्यास
उत्तर हे सम संख्याच येते. - कोणत्याही सम संख्येसोबत १ ने बेरीज किंवा वजाबाकी केली असतो उत्तर हे
विषम संख्याच येते.
विषम संख्या (Odd Number)
ज्या संख्येसोबत २ ने भागाकार केला असल्यास बाकी १ उरते त्या
संख्यांना ‘विषम संख्या’ (Visham Sankhya ) असे म्हणतात.
उदा : १,३,५,७,९…
वरील उदाहरणातील सर्व विषम संख्या आहे.
या सर्व विषम संख्यांची काही वैशिष्ट्य आणि गुणधर्म असतात ते पुढील
प्रमाणे.
- कोणत्याही विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 या विषम संख्या पैकी एखादा अंक असतो
- कोणत्याही दोन क्रमावर विषम संख्या दोन चा फरक असतो
- तुमचा ही दोन विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्यास उत्तर सम संख्या येते
- दोन क्रमवार विषम संख्या च्या बेरजेला 4 ने भाग जातो
- कोणत्याही विषम संख्येत एक मिळवल्यास किंवा वजाबाकी केल्यास उत्तर समसंख्या मिळते.
- कोणत्याही दोन विषम संख्याचा गुणाकार विषम संख्याची येते.
- कोणत्याही विषम संख्या समसंख्या मिळवली अथवा वजा केली असता उत्तर विषम संख्या येते.
मूळ संख्या (Root Number)
मूळ संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा एक नेस
भाग जातो त्या संख्येला ‘मूळ संख्या’ (Mul Sankhya) असे म्हणतात
उदा : 2 3 5 7 11 13…….. ह्या सर्व मूळ संख्या आहे
मूळ संख्या ची काही वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म पुढील प्रमाणे
- २ एकमेव व सम संख्या मूळ संख्या म्हणून ओळखली जाते.
- सर्वात लहान मूळ संख्या २ आहे
- मूळसंख्या अनंत असून १ ही मूळ संख्या नाही.
- मूळ संख्या ही धनपूर्णांक संख्या असते
संयुक्त संख्या (Composite
Number)
मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना ‘संयुक्त संख्या'(sanyukt sankhya) असे म्हणतात.
उदा: ४ ६ ९ १२ इत्यादी संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणून ओळखतो.
संयुक्त संख्यांची काही वैशिष्ट्ये आणि गुणधर्म पुढीलप्रमाणे
- १ ही संख्या मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या नसते.
- कोणतीही मूळ संख्या ही संयुक्त संख्या नसते.
- दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूळ संख्यांचा गुणाकार केल्यास संयुक्त
संख्या मिळते. - कोणतीही संयुक्त संख्या स्वतःपेक्षा
भिन्न अशा दोन संख्याच्या गुणाकाराने आणि दर्शविली जाते.
परिमेय संख्या (Rational Numbers)
कोणत्याही संख्याचा छेद 0 सोडून कोणताही असेल व त्या संख्या अंश आणि
छेदात लिहिल्या असेल तर त्या संख्यांना ‘परिमेय संख्या’ (parimey sankhya) असे म्हणतात.
उदा : 3/5, 4/9, 2/7, 6/-15 इत्यादींना परिमेय संख्या म्हणून
ओळखले.
परिमेय संख्यांची काही वैशिष्ट्ये आणि गुणधर्म पुढीलप्रमाणे
- सर्व धन किंवा ऋण संख्या
ह्या परिमेय संख्या असतात. - शून्य ही परिमेय संख्या आहे
कारण शून्याला 0/1 या स्वरूपात व्यक्त केले जाते - परंतु शून्य छेदा च्या जागी
असेल तर त्याला परिमेय संख्या म्हणता येणार नाही उदाहरणार्थ 9/0 या संख्येला
परिमेय संख्या म्हणता येणार नाही म्हणून शून्य छेद स्वरूपाला असल्यास त्याला
परिमेय संख्या म्हणता येणार नाही - परिमेय संख्या मध्ये किंवा छेद यापैकी धन किंवा ऋण स्वरूप असू शकते जेव्हा अंश
आणि छेद दोन्ही धन स्वरूपाचे असतील तर त्या संख्येला धन परिमेय संख्या असे
म्हणतात.
अपरिमेय संख्या (Irrational Numbers)
ज्या संख्येचे अंश आणि छेद
यांचे दशांश अपुर्णाकातील रुपांतर अनंत स्वरुपात असते अश्या संख्यांना ‘अपरिमेय
संख्या’ (Aparimey Sankhya) असे म्हणतात.
उदा : √३ /√८, ४/√९ ह्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात.
अपरिमेय संख्यांची काही वैशिष्टये व गुणधर्म पुढीलप्रमाणे
- अपरिमेय संख्या ह्या अंश किंवा छेद या स्वरुपातच असतात.
- अपरिमेय संख्यांची अंशाची आणि छेदाची किमत किंवा दशांश रुपांतर अनंत स्वरूपाचे असते अर्थात निश्चित किंमत दिसत नाही.
वास्तव संख्या (Real Number)
सर्व प्रकारच्या परिमेय
आणि अपरिमेय संख्या यांना मिळून ज्या संख्यांचा संग्रह तयार होतो त्याला आपण
वास्तव संख्या असे म्हणू शकतो
अशा परिमेय व अपरिमेय संख्या ह्या
अंशाच्या ठिकाणी किंवा छेदाच्या ठिकाणी असतात.
उदा: २/√३, √५/७, √१२/६ इत्यादी संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात.
विरुद्ध संख्या (Opposite Numbers)
ज्या दोन संख्यांची बेरीज
शून्य येते अशा संख्यांना परस्पर विरोधी संख्या किंवा विरुद्ध संख्या असे
म्हणतात
उदा: -६ आणि ६ या दोन
संख्यांची बेरीज(-६+६=०) केली असता त्यांचे उत्तर ० येते म्हणजे ६ आणि -६ ह्या विरुद्ध
संख्या आहे.
विरुद्ध संख्यांचे काही
वैशिष्ट्ये आणि गुणधर्म पुढील प्रमाणे
- परस्परांच्या विरुद्ध
संख्या सारख्याच असतात फक्त त्यांची चिन्हे वेगवेगळी असतात. - दोन विरुद्ध संख्या पैकी
एक धनसंख्या तर दुसरी ऋणसंख्या असते; परंतु संख्या एकच असते. - विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी
० (शून्य) येत असते.
व्यस्त संख्या (Vyast Sankhya)
ज्या दोन संख्यांचा
गुणाकार 1 असतो अशा
संख्यांना परस्परांच्या ‘व्यस्त संख्या’ असे म्हणतात.
व्यस्त संख्यांची काही
वैशिष्ट्ये आणि गुणधर्म पुढीलप्रमाणे
- ३/४ या संख्येचा गुणाकार
व्यस्त संख्या ४/३ राहील. - गुणाकार व्यस्त संख्या असेल तर
अंश आणि छेद संख्यांची अदलाबदल होत असते. - ३/४ आणि ४/३ यांचा गुणाकार केल्यास उत्तर हे १ येते.
त्रिकोणी संख्या (Triangular Number)
दोन क्रमवार नैसर्गिक
संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या(trikoni sankhya) असे म्हणतात.
अशा त्रिकोणी संख्यांची
काही वैशिष्ट्ये आणि गुणधर्म पुढीलप्रमाणे
- उदा: 2 व 3 क्रमवार
संख्या आहे त्यांचा गुणाकार केल्यास ६ हे उत्तर येईल आता या ६ संख्येची निमपट
म्हणजे ६/२=३ येते म्हणून ३ या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणता येईल. - ८ व ९ या क्रमवार संख्याचा
गुणाकार केल्यास उत्तर ७२ येते ७२ निमपट केल्यास उत्तर ३६ येते म्हणून ३६ ही त्रिकोणी
संख्या आहे - १,३,६,१०,१५,२१,२८,३६,४५ ह्या संख्यांना
त्रिकोणी संख्या असे म्हणतात.
चौरस संख्या (Chauras Sankhya)
कोणत्याही पूर्ण वर्ग
संख्याना चौरस संख्या असे म्हणतात.
उदा: 14 9 16 25 36 49 64 ह्या सर्व संख्या चौरस संख्या आहेत.
म्हणतो
जोडमूळ संख्या
संख्या जर 2 मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एक
आणि एकच संयुक्त संख्या असते अशा संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात.
थोडक्यात दोन मूळ संख्या मध्ये
केवळ एकच संख्या असते त्या संख्या त्या दोन संख्याना जोड मूळ संख्या असे म्हणता
येईल.
उदा: ७,८,९ या तीन संख्यांपैकी ७ आणि ९ या दोन्ही मूळ संख्या आहे व त्यामध्ये ८ हि एकच संख्या आहे म्हणून ७ आणि ९ ह्या दोन जोडमूळ संख्या आहे असे म्हणता येईल.
सहमूळ संख्या
ज्या दोन किंवा अधिक संख्यामध्ये १ संख्या सोडून इतर कोणतीही सामाईक संख्या दिसून येत नाही अशा दोन किंवा अधिक संख्यांना सहमूळ संख्या (Sahamul Sankhya) असे म्हणतात.
उदा: १२ आणि ३५ या दोन संख्यांचा आपण विचार करूया
१२ चे विभाजक = १,२,३,४,६,१२
३५ चे विभाजक = १,५,७,३५
वरील संख्यांमध्ये १ ही संख्या सोडली असता इतर कोणतीही संख्या सामाईक (सारखी) नाही म्हणून १२ आणि ३५ ह्या दोन सहमूळ संख्या आहे असे आपण म्हणू शकतो.
संबंधित प्रश्न-उत्तरे (FAQ)
१. नैसर्गिक संख्या म्हणजे काय ?
उत्तर: आपल्या आजूबाजूच्या निसर्गातील वस्तू किती आहे हे सांगण्यासाठी ज्या संख्यांचा उपयोग केला जातो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या या अनंत आहे.
२. पूर्ण संख्या म्हणजे काय ?
उत्तर: ज्या नैसर्गिक संख्येतून तीच नैसर्गिक संख्या वजा केली असता बाकी ० उरते अशा संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. ० ही नैसर्गिक संख्या नाही म्हणून ती पूर्ण संख्या देखील नाही.
३. संयुक्त संख्या म्हणजे काय ?
उत्तर: मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात.
४. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर: नैसर्गिक संख्या या अनंत आहे त्यामुळे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती हे सांगता येऊ शकत नाही.
५. पूर्णांक संख्या उदाहरण सांगा ?
उत्तर: -3,-2,-1,0,1,2,3