परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती | Parbhani District Complete Information In Marathi

 

        नमस्कार मित्र मैत्रिनिनो आजच्या लेखात आपण महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती बघणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण परभणी जिल्ह्याच्या इतिहास बघणार आहे,त्यानंतर आपण परभणी जिल्ह्याची भौगोलिक माहितीपरभणी जिल्ह्याच्या सीमापरभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळतालुके किती व कोणतेजिल्ह्याची लोकसंख्या वनक्षेत्रनद्याधरणेहवामानपिके या सर्वांबद्दल माहिती घेणार आहे आणि शेवटी आपण परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती बघणार आहे. तर चला सुरु करूया आजचा लेख परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती |Parbhani District Complete Information In Marathi

parbhani jilhyachi mahiti, parbhani jilhyachi mahiti, parbhani district information in marathi, परभणी जिल्ह्याची माहिती, परभणी जिल्हा माहिती, parbhani jilha mahiti
परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती

 

परभणी जिल्ह्याचा इतिहास

परभणी जिल्हा भारताच्या पश्चिमेकडील महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात स्थित आहे. परभणी जिल्ह्याला पूर्वी “प्रभावतिनगर” असेही म्हटले जात होते; हे नाव या शहरातील प्रभावती देवीच्या नावावरुन पडले. मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांपैकी परभणी हा एक जिल्हा  आहे. परभणी जिल्हा पुरातत्विक दृष्ट्या वापरल्या जाणार्‍या प्राचीन ग्रामीण वस्त्रांच्या शोधासाठी  महत्त्वाचे ठिकाण आहे. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले आहे.  संपूर्ण मराठवाडा प्रदेश  पूर्वी निजामशाहीचा भाग होता. नंतर हैदराबाद राज्याचा एक भाग होता.  १९५६  मध्ये राज्यांचे पुनर्गठन झाल्यानंतर ते तत्कालीन मुंबई राज्याचा एक भाग बनले. आणि १९६० नंतर हा सध्याचा महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. प्राचीन इतिहासात पांडुपुत्र अर्जुन याने परभणी जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले अशी माहिती मिळते.

 

 

परभणी  जिल्ह्याची भौगोलिक माहिती

परभणी जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १२८·७२ किमी. दक्षिणोत्तर रुंदी १०४·५८ किमी. आहे. परभणी जिल्ह्यात १८.४५ आणि २०.१० उत्तर अक्षांश आणि  ७६.१३ आणि  ७७.३९  पूर्व रेखांश आहेत. जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या ४·१% आणि लोकसंख्या ३% असून, महाराष्ट्र राज्यात याचा क्षेत्रफळाप्रमाणे अकरावा आणि लोकसंख्येप्रमाणे एकोणिसावा क्रमांक लागतो. परभणी जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची हि 357 मी. इतकी आहे.

परभणी जिल्ह्याच्या सीमा

परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली हा जिल्हा आहे; पूर्वेस नांदेड जिल्हा दक्षिणेस लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा असून पश्चिमेला बीड आणि जालना जिल्हा हे दोन जिल्हे आहे.

 

परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ

परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळ पैकी परभणी जिल्ह्याने 4.1% भाग
व्यापलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील हा अकरावा क्रमांकाचा जिल्हा आहे.

 

परभणी जिल्ह्यातील तालुके

परभणी जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहे. 1) परभणी २) सोनपेठ  3) गंगाखेड 4) पालम 5) पूर्णा     6) सेलू 7) जिंतूर 8) मानवत 9) पाथरी  हे तालुके आहे सोबतच 4 उपविभाग असून 848  गावे आहे.

 

परभणी जिल्ह्याची लोकसंख्या

2011 च्या भारताच्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याची लोकसंख्या 18,35,982  एवढी आहे. तसेच जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 293 प्रती चौरस किमी. आहे.परभणी जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 1.06 एवढे आहे. आणि साक्षरता दर हा 75.22% आहे.

 

परभणी जिल्ह्यातील वनक्षेत्र

परभणी जिल्ह्याला खूप कमी वनक्षेत्र लाभलेले आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या नुसार परभणी जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या फक्त 1.60% क्षेत्र हे वनक्षेत्र म्हणून उपलब्ध आहे.

परभणी जिल्ह्यातील नद्या

गोदावरी ही जिल्‍ह्यातील  प्रमुख नदी आहे. ती पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी, गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्‍यातून पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे नांदेड जिल्‍ह्यात प्रवेश करते. जिल्‍ह्याच्‍या वायव्‍येकडील मध्‍य भागातून पूर्णा नदी व तिच्‍या
उपनद्या करपरा
, दुधना वाहत जातात. सेलू व जिंतूर तालुक्‍याचा काही भाग दुधना नदीच्‍या खो-यात येतो. जिल्‍ह्यातील लोकांचा प्रमुख व्‍यवसाय शेती आहे.

 

परभणी जिल्ह्यातील धरणे

परभणी जिल्ह्यातील पूर्णा नदीवर जिंतुर तालुक्यात येलदरी धरण बांधण्यात आले असून, हिंगोली तालुक्यात सिद्धेश्वर हे धरण आहे.तसेच गंगाखेड तालुक्यात मासळी नदीवर धरण बांधण्यात आले आहे.

 

परभणी जिल्ह्याचे हवामान

परभणी जिल्हा पठारावर असल्या कारणाने हवामान येथे उष्ण, कोरडे आणि विषम असते. मे महिन्यात दिवसाचे तापमान ४० डिग्री सेल्सियस असते, तर रात्री ते २५ डिग्री सेल्सियसपर्यंत उतरते. हिवाळ्यात दिवसाचे तापमान ३० डिग्री सेल्सियस असते, आणि रात्री १५ डिग्री सेल्सियसपर्यंत उतरते. उन्हाळ्यात तापमान कधीकधी ४५ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते. हिवाळ्यात रात्री १० डिग्री सेल्सियसपर्यंत उतरते. पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मोसमी वायुप्रवाहानुसार थोडासा पाऊस होतो. वार्षिक पर्जन्यमान सामान्यतः ८२.६६ सेंटिमीटर आहे, पण भूरचनेच्या आधारे त्यामध्ये फरक दिसतो. जिंतूर, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यांत पर्जन्यमान सामान्यपणे ११० सेंटिमीटरपेक्षा जास्त असते, तसेच बालाघाटच्या पर्जन्यछायेतील खोल्यांत ७५ ते ८० सेंटिमीटरपर्यंत असते.

 

परभणी जिल्ह्यातील पिके

परभणी जिल्ह्यात ज्वारी हे येथील मुख्य पीक असून बाजरी, गहू व भात ही पिकेही  काही प्रमाणात घेतली जातात. तूर, हरभरा यांसारखी द्विदल धान्येही पिकवली जातात. नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस व भुईमूग ही महत्त्वाची पिके येथे होत असून अन्न पिकांखालील जमिनीचे प्रमाण ६७·३% आहे. मात्र जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या भागांत नगदी पिकांखालील जमीन वाढत असून, त्यामानाने अन्नपिकांखालील जमीन घटत आहे.

 

परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

चारठाणा मंदिर: जिंतूर तालुक्यात स्थित हा मंदिर परभणी जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 62 किमी अंतरावर आहे.

साईबाबा मंदिर, पाथरी: पाथरी तालुक्यात स्थित हा मंदिर साई बाबा यांच्या जन्मस्थानाचा मान्यतेनुसार आहे.

मृत्यूंजय पारदेश्वर मंदिर (पारद शिवलिंग), परभणी: हा संगमरमरीत बांधलेला मंदिर आहे ज्यातील विशाल शिवलिंगाची ऊंची तब्बल 80 फुटे आहे.

हजरत तुरा बुल हक दर्गा, परभणी : हा दर्गा परभणी शहरात स्थित आहे. येथे वार्षिक मोठ्या यात्रेला जनतेची भरपूर सहभाग असते. या यात्रेचा १०८ वर्षांचा इतिहास आहे. २ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीच्या कालावधीत येथे विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन
यात्रोत्सवात सहभागी होतात. या दरगाला सर्व धर्मांचा एकतेचा प्रतीक मानला जातो.

नेमिनाथ भगवान दिगंबर, जैन मंदिर नावागढ : नावागढात स्थित या मंदिराचे विशेष कलात्मक बांधकाम प्रमुख आहे. हा मंदिर अतिशय विशाल आहे. मंदिराच्या परिसरात पद्मासनात बसलेली देवगिरी ही मुख्य देवता आहे. ३.५ फुटांची ही मूर्ती पाहून मनाला अतिशय आनंद मिळतो.

श्री दिंगबर जैन, नेमगिरी संस्थान, जिंतूर : जिंतूरपासून तीन किलोमीटरांच्या अंतराने या संस्थानाची स्थानिकता आहे. हे स्थान सह्याद्री पर्वतांच्या उपटेकडे आवरले आहे. हे स्थान प्राचीन काळी जैनपूर या नावाने प्रसिद्ध होते. हे स्थान राष्ट्रकूळ काळातील
अमोघ वर्षांच्या काळात विकसित झाले आहे.

श्री मुदगलेश्वर मंदिर, मुदगल: मुदगल येथे स्थित हा प्रसिद्ध मंदिर गोदावरी नदीच्या काठावर असलेला आणि त्याला देवभूमी म्हणून ओळखलेला जातो. या परिसरात भगवान नरसिंह आणि दोन गणेशाचे मंदिर आहेत.

श्री नृसिंह मंदिर, पोखर्णी: परभणीपासून 18 किलोमीटर अंतरावर स्थित हा देवस्थान नृसिंहाच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश आणि इतर ठिकाणांपासून भक्ते येतात.

कृषी विद्यापीठ परभणी : जिल्ह्यातील कृषी विद्यापीठात उच्च दर्जाचे संशोधन कार्यक्रम आयोजित केले जाते. जिल्ह्यात
मंदिरांपेक्षा इतर अनेक गोष्टी पाहण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. येलदरी येथे भव्य जलविद्युत प्रकल्प उभेरले गेले आहे. जिल्ह्यात कापसाच्या उत्पादनात मोठे प्रगतीशीलता आहे
, त्यामुळे येथे कापसाची मोठी बाजारपेठ आहे.

परभणी जिल्ह्याच्या संतांच्या भूमी म्हणून ओळखले जाते. नर्सीचे नामदेव महाराज, गंगाखेडचे संत जनाबाई, तसेच बोरीचे गणपती आणि भास्कराचार्य हे सर्व संतांचे स्मारक जिल्ह्यात आहेत. जर आपल्याला जिल्ह्यात भेट द्यायची आहे तर येथे प्रत्यक्ष हवाई मार्ग उपलब्ध नाही. औरंगाबाद जिल्ह्यातून उत्तरीकडे लोहमार्ग किंवा  रस्त्याने परभणी जिल्ह्यात पोहोचता येते. 

 

संबंधित प्रश्न-उत्तरे

 

प्रश्न 1: क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रात परभणी जिल्हा किती क्रमांकावर आहे?

उत्तर : क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रात परभणी जिल्हा अकराव्या (११) क्रमांकावर आहे.

प्रश्न  2: परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

उत्तर : परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा प्रशासकीय विभागात येतो.

प्रश्न 3: परभणी जिल्ह्यात किती तहसील आहे?

उत्तर : परभणी जिल्ह्यात एकूण नऊ तहसील आहे.

प्रश्न 4: परभणी जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर : परभणी जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

 

अशाप्रकारे आपला आजचा लेख पूर्ण झाला. आज आपण महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याची माहिती बघीतली. त्यामध्ये
सुरवातीला आपण परभणी जिल्ह्याचा इतिहास बघितला. त्यानंतर आपण भौगोलिक माहिती
, सीमापरभणी जिल्ह्याचे
क्षेत्रफळ
तालुके किती व कोणतेजिल्ह्याची लोकसंख्यावनक्षेत्रनद्याधरणेहवामानपिके या सर्वांबद्दल विस्तृत माहिती बघितली आणि शेवटी आपण परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती बघितली. अशाप्रकारे आपला आजचा लेख पूर्ण
झाला.

या लेखाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि या लेखात असलेल्या माहिती व्यतिरिक्त तुमचा जवळ परभणी
जिल्ह्याबद्दल जास्तीची माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा आम्ही या लेखात ती समाविष्ट करू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top